धुम्रपान, मद्यपान तसेच ड्रग्स सेवन शररीरासाठी हानिकारक असल्याचे म्हटले जाते. या व्यवसनांच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून कायम दिला जातो. मात्र असे असतानाही जगात कोट्यवधी लोक मद्यापान, धुम्रपान तसेच ड्रग्सचे सेवन करताना दिसतात. ड्रग्सजेवन ही एक प्रतिष्ठेची बाब असल्याचा भ्रम काही तरुणांच्या मनात असतो. मद्यापेक्षा ड्रग्ससेवन जास्त अपायकारक असते असा दावा करत मद्यसेवनाचे काहीजण समर्थन करतात. मात्र ड्रग्सपेक्षा मद्यप्राशनाची सवय ही जास्त हानिकारक आहे. मद्य हे जगातील सर्वात हानिकारक द्रव्य आहे, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> विश्लेषण: काय आहे गोधन न्याय योजना ?

ब्रिटनच्या इंडिपेंडन्ट सायंटिफिक कमिटी ऑन ड्रग्ज (ISCD) आणि ब्रिटीश सरकारचे माजी मुख्य औषध सल्लागार डेव्हिड नट यांच्यासह शास्त्रज्ञांच्या एका गटाने २०१० साली एकूण २० मादक पदार्थावर अभ्यास केला होता. या पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात, हे या अभ्यासात तपासण्यात आले. अभ्यासानंतर मद्य म्हणजेच दारू ही सर्वात हानिकारक असल्याचे या अभ्यास गटाने सांगितले होते. दारूनंतर हेरॉईन आणि क्रॅक कोकेन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर हानिकारक असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले होते.

हेही वाचा >> विश्लेषण: महाराष्ट्रानंतर झारखंड ?

बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश बाबू यांनी मद्यप्राशनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर अधिक माहिती दिली आहे. अल्कोहोल म्हणजेच दारूला शरीरावर सर्वाधिक परिणाम करणारे द्रव्य म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण अल्कोहोलमुळे हृदय, मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच दारू मधूमेहासही कारणीभूत ठरू शकते. दारूचे व्यापक, दीर्घकालीन सेवन केल्यामुळे शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे मत डॉ. व्यंकटेश बाबू यांनी नोंदवले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : देशात किती खटले प्रलंबित? सर्वोच्च, उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या किती? जाणून घ्या सविस्तर

मद्यसेवनामुळे शारीरिक त्रास होतो. एखाद्या व्यक्तीने मद्यसेवन केल्यामुळे इतर व्यक्तींच्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम होतो. मद्यसेवनामुळे झोप न गालणे, तणाव, नैराश्य, पॅनिक अटॅक अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असेदेखील डॉ. बाबू यांनी सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण : सक्तवसुली संचालनालय आता मोकाट?

नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया नुसार भारतात मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. या पोर्टलवर जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाण २३ ते ७४ टक्क्यांपर्यंत आहे. तस हे प्रमाण महिलांमध्ये २४ ते ४८ टक्क्यांपर्यंत आहे. जगातिक पातळीवर विचार करायचे झाल्यास ३ दसलक्ष मृत्यू हे मद्याच्या हानिकारक वापरामुळे होतात. तर ०.५ दसलक्ष मृत्यू हे ड्रग्समुळे होतात.

हेही वाचा >> विश्लेषण : चीनच्या रॉकेटचे तुकडे पुन्हा पृथ्वीवर कोसळले, अनियंत्रित अवकाश कचऱ्याचा धोका वाढत आहे

मद्य तसेच मादक द्रव्यांचा शरीरावर काय परिणाम होतो?

“मद्यामुळे यकृताचे आजार होण्याची शक्यता असते. मद्यामुळे यकृतामधील चरबीचे प्रमाण वाढते. तसेच मायटोकॉन्ड्रियाला हानी पोहोचते,” असे द्वारका येथील आकाश हेल्थकेअरमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हेपॅटोलॉजी आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपी विभागाच्या प्रमुख डॉ. शरद मल्होत्रा यांनी सांगितले. तर ड्रग्सच्या सेवनाबाबत बोलायचे झाल्यास कोकेन, हिरॉईन यासारखे ड्रग्ज थेट रक्तप्रवाहात मिसळतात. ड्रग्समुळे यकृताला इजा होते, हेपेटायटीस बी, सी आणि एचआयव्ही सारख्या रोगांनादेखील निमंत्रण दिले जाते.

हेही वाचा >> विश्लेषण : राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी? राष्ट्रपतींना नेमके कसे संबोधित करावे?

डॉ. बन्सल यांनी ड्रग्स आणि मद्यसेवनामुळे मानसिक आरोग्यावर कसे परिणाम होतात, यावर प्रकाश टाकला आहे. “दारू आणि ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मेंदू तसेच न्यूरोलॉजिकल मार्गावर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, भ्रम निर्माण होणे, स्मृतीभंश, वागण्या-बोलण्यात बदल होणे,” या समस्या उद्भवू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol is more hazardous than other drugs know detail information prd
First published on: 03-08-2022 at 16:34 IST