– राखी चव्हाण

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात. यंदाही हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला होता आणि तो आता प्रत्यक्षात देखील उतरत आहे. मात्र, हा पाऊस उन्हाळ्यात का पडतो, त्यामागील कारणेदेखील जाणून घेणे आवश्यक आहे. अवकाळी पाऊस उन्हाळ्यात यापूर्वीदेखील पडला, पण यावेळी वीज कडाडण्याचे, ढगांच्या गडगडण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच पावसाळ्यातील गारपिटीप्रमाणचे उन्हाळ्यात गारपीट होत आहे.

अवकाळी पाऊस म्हणजे काय?

हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हमखास येतो. त्याचे प्रमाण नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प असते आणि त्यामुळे होणारे नुकसान जास्त असते. अवकाळी म्हणजे काळ वेळ न बघता आलेला. यावर्षीदेखील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. मात्र, यावेळी एप्रिलमध्ये या अवकाळी पावसाने वेग धरला आहे.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज

अवकाळी पाऊस नेमका कसा पडतो?

पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध हे दोन भाग आहेत. उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात कर्कवृत्तांवर सूर्यकिरणे कमी जास्त प्रमाणात लंबरूप पडतात. त्यामुळे मध्य आणि आग्नेय आशियासह भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये तापमान जास्त असते. त्यामुळे मध्य आशियामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. याच काळात हिंदी महासागर आणि लगतच्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात तुलनात्मकरित्या शीत आणि हवेचा जास्त दाब विकसित होतो. या कमी दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. हे वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना ‘खारे वारे’ असेही म्हणतात. हे बाष्पयुक्त वारे महासागरावरून वाहतांना मोठया प्रमाणात आर्द्रता आणतात आणि भुपृष्ठावरून वाहतांना वरच्या दिशेने जातात. त्यामुळे वारे जसेजसे वर जातात तसे त्यांची बाष्पधारणा क्षमता कमी होते, वाऱ्यातील बाष्पाचे घनरूप पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडतो.

महाराष्ट्रात मार्च, एप्रिलमध्ये पाऊस का पडतो?

भारतीय द्वीपकल्पाच्या दोन बाजूंना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्प असते. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मार्च, एप्रिलमध्ये पाऊस पडताना दिसतो.

उन्हाळ्यात गारपीट होण्याचे प्रमाण का वाढले आहे?

पावसाळ्यात गारपीट होणे आपल्या सवयीचे आहे, पण उन्हाळ्यात गारपीट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विदर्भ असो, वा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच गारपीट होते. यावर्षी विदर्भात गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. हवा जास्त उंचीपर्यंत गेल्यास आणि दुसरी या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास गारपीट होण्याची शक्यता वाढते. बाष्पाचे प्रमाण वाढण्यासाठी बंगालच्या उपसागरावरुन तर कधीकधी अरबी समुद्रावरुन येणारे वारे कारणीभूत ठरतात, कारण येताना ते सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास आणि नंतर दक्षिणेकडे सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे ते वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ म्हणजे काय?

नावाप्रमाणेच वातावरणातील हा चक्रावात पश्चिमेकडून होतो. पश्चिमेकडून वाहणारे वारे थंड आणि शुष्क असतात. महाराष्ट्रात दमट आणि उष्ण हवा असते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ वाहत असतात आणि दक्षिणेकडे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ असते. हे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ आणि ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ एकमेकांत मिसळल्याने अवकाळी पाऊस पडतो. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ साधारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरवातीस येतात.

हेही वाचा : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मुसळधार, रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत

‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ म्हणजे काय?

वारे कसेही आणि कोणत्याही दिशेला वाहत नाही. हवा वक्राकार फिरत वर जाते. ही हवा वर जाताना वाटेतील सगळे बाष्प एकत्र करत करत पुढे जाते. याउलट ‘अँटी क्लॉकवाइज सर्क्युलेशन’ असते. येथे बाष्प केंद्रित होण्याऐवजी पसरते. एखादी गोष्ट पसरल्याने त्याचा प्रभाव कमी होतो, तर ती एकत्रित आल्याने त्याचा प्रभाव वाढतो. ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ एक प्रकारे हवामान नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे हवा एकाच जागी न राहता, ती फिरत राहते. त्यामुळे वारे, बाष्प, पाऊस इकडून तिकडे जाते आणि त्यामुळे गैरमोसमी पाऊस पडतो.

rakhi.chavhan@expressindia.com