– गौरव मुठे

रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला. त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि त्याचा आपल्यावरील परिणाम काय, यासह तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची ही उत्तरे…

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

तुमच्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोटेचे करायचे काय?

ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करून त्या बदल्यात अन्य नोटा मिळवता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने त्यासंबंधी पत्रकाच्या माध्यमातून बॅकांना सूचना दिली. नोटाबदलाची ही प्रक्रिया मंगळवार, २३ मेपासून सुरू होईल.

रिझर्व्ह बँकेचे ‘स्वच्छ नोट धोरण’ काय?

रिझर्व्ह बँकेच्या ‘स्वच्छ नोट धोरणा’च्या अनुषंगाने, २००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र २,००० रुपये मूल्याच्या नोटेला कायदेशीर मान्यता कायम असेल, असेही पत्रकात म्हटले आहे. तथापि या नोटा चलनातून काढून घेण्याच्या निर्णयामुळे सर्व बँकांना येत्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांकडून २,००० रुपये मूल्याच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेत या नोटा जमा करून इतर मूल्याच्या नोटा लोकांना मिळवता येतील. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक शाखांमध्येही नोटाबदलाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दोन हजारांच्या नोटांचे चलनातील प्रमाण किती?

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये १,००० रुपये आणि ५०० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपये मूल्याची नवीन नोट चलनात आणली होती. त्यावेळी २,००० रुपये मूल्याच्या नोटेचे चलनातील प्रमाण ८९ टक्के होते. चलनात असलेल्या २,००० च्या एकूण नोटांचे मूल्य ३१ मार्च २०१८ रोजी ६.७३ लाख कोटी रुपये होते. मात्र या उच्चांकी पातळीवरून कमी होत ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटींपर्यंत कमी झाले. म्हणजेच चलनातील २,००० रुपये मूल्याच्या नोटांचे प्रमाण ३७.३ टक्क्यांवरून १०.८ टक्क्यांपर्यंत कमी होत आले.

दोन हजार रुपयांच्या नोटाबदलाची मर्यादा किती?

२३ मेपासून नागरिकांना कोणत्याही बँक शाखेतून एकावेळी केवळ २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. ‘केवायसी’ पूर्तता असणारे बँक खातेधारक कितीही रकमेपर्यंत नोटाबदल करू शकतील. बँकांकडून ग्रामीण व दुर्गम भागांत नियुक्त व्यापार प्रतिनिधींकडून (बीसी) नोटाबदल शक्य असून, ते दिवसाला प्रत्येक खातेदाराला कमाल ४,००० रुपये मूल्याच्या दोन नोटा बदलून देऊ शकतील.

नोटा बदलण्यासाठी बँकेत खाते आवश्यक आहे का?

कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन दोन हजारांची नोट बदलून इतर कमी मूल्याच्या नोटा मिळवता येतील. त्यासाठी त्याच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. मात्र, अशावेळी केवळ २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील.

दोन हजार रुपयांची नोट आणलीच का?

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने १,००० रुपये आणि ५०० रुपये मूल्याच्या नोटांच्या निश्चलनीकरणाचा निर्णय अकस्मात घेऊन, तब्बल ८६ टक्के नोटा चलनातून बाद ठरविल्या. अशा वेळी नागरिकांना कमी वेळेत जास्तीत जास्त मूल्याच्या चलनी नोटा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने २,००० रुपयांची नवीन नोट त्यावेळी सर्वप्रथम चलनात आणली गेली. शिवाय इतर मूल्यांच्या नोटा चलनात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर २०१८-१९ पासून २,००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने बंद केली होती.

हेही वाचा : २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी…”

नोटा बदलण्यासाठी शुल्क द्यावे लागेल का?

कोणत्याही बँक शाखेतून दोन हजार रुपयांची नोट बदलून इतर लहान मूल्याचे चलन मिळविण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नोटा बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटबंदीबाबत नेमकी चर्चा काय?

प्रत्यक्षात काळ्या पैशाच्या साठेबाजीसाठी २,००० च्या नोटांचा वापर वाढत गेल्याचे आणि त्या सामान्य चलनांतून गायब झाल्याचे आढळून आल्याने, निश्चलनीकरणानंतर ही अधिक मूल्य असलेली नोट वाढीव प्रमाणात आणलीच कशाला, असे प्रश्न उपस्थित केले गेले. आता ही नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेऊन, आधी ती चलनात आणण्याचा निर्णय चुकीचा होता, याची रिझर्व्ह बँकेने कबुलीच दिली, अशी प्रतिक्रिया राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर दिली.

हेही वाचा : विश्लेषण : रिझर्व्ह बँकेचा केंद्राला ८७ हजार कोटींचा लाभांश का? तिप्पट लाभांश वितरणामागचे गणित काय?

जेष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे का?

ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अधिक कष्ट पडू नयेत, याबाबत बँकांना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना त्या विनासायास बदलता येतील.

gaurav.muthe@expressindia.com