william dalrymple Ancient Indian history: विल्यम डॅलरिम्पल हे स्कॉटिश इतिहासकार, लेखक आणि ब्रॉडकास्टर, भारत आणि ब्रिटीश साम्राज्याच्या इतिहासावरील संशोधनासाठी ओळखले जातात. १९६५ साली जन्मलेल्या विल्यम डॅलरिम्पल यांची द अनार्की, व्हाईट मुघल्स आणि द लास्ट मुघल ही काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांचे लेखन भारताच्या इतिहासावर, मुघल साम्राज्यावर आणि ब्रिटिश वसाहतवादावर केंद्रित आहे. डॅलरिम्पल हे जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे सह-संस्थापक देखील आहेत. ऐतिहासिक लेखन आणि प्रवास साहित्यातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चार पुस्तकांच्या यशस्वी प्र वासानंतर विल्यम डॅलरिम्पल यांनी भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाकडे लक्ष वळवले आहे.

यापूर्वी भारताच्या मुघल आणि ब्रिटिशकालीन इतिहासावर त्यांनी आपल्या संशोधक शैलीतून प्रकाश टाकला होता. अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात भारताच्या आर्थिक सुबत्तेवर त्यांनी भाष्य केले आहे. व्यापाराच्या माध्यमातून भारताने आपले तत्त्वज्ञान, धर्म आणि विज्ञानाची छाप संपूर्ण जगावर कशाप्रकारे उमटवली हा इतिहास या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. The Golden Road: How Ancient India Transformed the World हे पुस्तक म्हणजे जादूची पेटी उघडण्यासारखे आहे. या पेटाऱ्यात अनेक चित्र-विचित्र पात्र, विस्मरणात गेलेल्या कथा, धक्कादायक आणि प्रसंगी आश्चर्यकारक वाटतील अशी तथ्ये आहेत. या नवीन पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लेखकाने ऐतिहासिक साधनांचा वापर करून इतिहास जिवंत करून दाखवायची किमया दाखवली आहे. भूतकाळाबद्दल एकाच वेळी परिणामकारक आणि अत्यंत आकर्षक अशा प्रकारे लिहिणे शक्य आहे हे दाखवून दिले.

Actor Sachin Pilgaonkar is coming to Yavatmal on Wednesday to appreciate Geet Ranjan
यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला अभिनेता सचिन येणार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी
loksatta readers feedback
लोकमानस: अर्थकारणाच्या विकेंद्रीकरणातून ‘संघराज्य’
Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

विलक्षण चित्र

विल्यम डॅलरिम्पल हे ब्रिटीश कालखंडाचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांना एका मुलाखतीत याबद्दल विचारले असता ते म्हणाले, असं अजिबातच नाही. मोठा होत असताना माझं सगळं लक्ष हे प्रागैतिहासिक इतिहासावर होतं. मी लंडनला पहिला प्रवास केला तो तुतानखामेन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी. माझ्या किशोर वयातील सुट्ट्या काही पुरातत्त्व उत्खननात किंवा इतर ठिकाणी घालवल्या. भारतीय इतिहासातील सखोलता अभ्यासण्यापूर्वी मी पुरातत्त्व आणि प्रागैतिहासिक इतिहास यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. १९८४ साली मी भारतात आलो आणि सांची आणि अजिंठासारख्या स्थळांना भेट दिली. मला त्यावेळी आश्चर्य वाटले. मी माझे व्यावसायिक लक्ष १८ व्या शतकावर केंद्रित केले होते. लहान असताना मला भावलेल्या गोष्टींपेक्षा ते वेगळे होते. मी ‘द अनार्की’ लिहायला सुरुवात केल्यावर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी वीकेण्ड घालवण्यासाठी अजिंठा फिरायला गेलो. अजिंठा येथील लेणी क्रमांक ९ आणि १० मध्ये विलक्षण चित्र होती. मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. ही सर्वात जुनी बौद्ध चित्र असल्याने भारतीय पुरातत्त्व खात्याने या लेणींची साफसफाई केली होती.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

फक्त स्वारस्य असलेल्या गोष्टींचाच पाठपुरावा करत होतो…

अजिंठातील बहुतेक काम हे इसवी सनाच्या सहाव्या शतकातील आहे. परंतु ही चित्र मात्रं इसवी सनपूर्व १५० शतकातील आहेत. अजिंठाच्या परिसरावर कधीकाळी हैद्राबादच्या निजामाचे नियंत्रण होते. त्याने इटालियन संवर्धकांच्या मदतीने या चित्रांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी साफसफाईनंतर शेलॅक वार्निश वापरले. त्यामुळे पुढील १० वर्षात चित्र अस्पष्ट झाली. ती अस्पष्ट चित्र कोणत्याही पुस्तकात सापडत नाहीत. २०१४-१५ या वर्षी भारतीय पुरातत्त्व खात्याने कोणत्याही गाजावाज्याशिवाय त्या चित्रांचे संवर्धन केले. म्हणून मी त्या चित्रांबद्दल लेखांची संपूर्ण मालिका लिहिण्यासाठी अनार्कीमधून सहा महिन्यांची सुट्टी घेतली. प्रथम, मार्ग मधील अभ्यासपूर्ण लेख, नंतर गार्डियन आणि न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स आणि इतर ठिकाणी अधिक विस्तृत लिखाण केले. कारण ती केवळ जगातील सर्वात जुनी बौद्ध चित्र नव्हती तर ती भीमबेटका नंतरची सर्वात जुनी कला होती. ती एका अर्थाने भारतीयांची पहिली पोर्ट्रेट चित्र आहेत. यावेळी माझ्या एक लक्षात आले की, लोकांना या इतिहासाबद्दल फारसं काही माहीत नाही. ही चित्र अगदीच सुरुवातीची आहेत. जिथून जपान आणि पूर्व चीनपर्यंत व्यापक बौद्ध कला उदयास आली. या चित्रांनीच मला या मार्गावर आणले. परंतु हे करण्याचा जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय नव्हता. मी फक्त मला स्वारस्य असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करत होतो. माझ्या पुस्तकांना पाच वर्षे लागतात. विषयाच्या प्रेमात वेडे व्हावे लागते आणि हा विषय असा होता की, कोविडच्या काळात मी या विषयाचे वाचनच केले नाही तर आग्नेय आशियातील तसेच भारतातील सर्व प्रारंभिक बौद्ध स्थळांना भेटीही दिल्या.

पुस्तकात जे आहे ते मोजक्याच भारतीयांना माहीत असेल

मी चीनलाही अनेकदा भेट दिली आहे. चिनी प्रवासी ह्युआन श्वांग (Xuanzang) याने अनुसरलेला मार्ग अवलंबला. तो माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या प्रवासांपैकी एक होता. परंतु भारतीय इतिहास हाताळताना काही समस्यांना सामोरे जावे लागले. कनिष्क, विमा तख्तो यांसारख्या राजांचे चित्र उभं करताना पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. या पुस्तकातील अनेक पात्र ही भारतीयांना सुपरिचित नाहीत. अंगकोर वाट हे विष्णू मंदिर होते हे अनेक भारतीयांना माहीत असेल असे मला वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत मी कंबोडियामध्ये बराच वेळ घालवला. भिंतींवर चित्रित केलेले कुरुक्षेत्र आणि लंकेचे युद्ध पाहून भारतीय पर्यटक आश्चर्यचकित होतात.

आग्नेय आशियाच्या निर्मितीत भारताने किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे अनेकांना माहीत नसेल. कंबोडियामध्ये तुम्ही कोठेही जाल तिथे तुम्हाला अशा कथा सापडतील. अभ्यासकांना याविषयी माहीत आहे. परंतु शैक्षणिक अभ्याक्रमाच्या बाहेर क्वचितच लोकांना माहीत आहे. या पुस्तकात जे आहे ते अशोक आणि बुद्ध वगळता फार मोजक्याच भारतीयांना माहीत असेल. भारतात वू झेटियन हे नाव क्वचितच कोणी ऐकले असेल. भारतीय गुप्तांचं गणित बगदादला घेऊन जाणाऱ्या बर्माकिड्सच्या बाबतीतही हेच आहे. मला वाटत नाही की, लोकांना माहीत आहे की अल-ख्वारीझमीने हिंदू गणितावर एक पुस्तक लिहिलं, जे फिबोनाचीच्या हाती आले. या गोष्टी फारशा ज्ञात नाहीत.

भारतात प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल अभिमानाची राष्ट्रीय भावना आहे, जी खूप व्यापक आहे. एक समज आहे की, गणित आणि खगोलशास्त्रातील अनेक मोठ्या कल्पना भारताने खूप लवकर आणल्या. पण भारतीय विचारांमध्ये नेमके काय नवीन होते आणि बॅबिलोनियन किंवा ग्रीक काय आहे आणि या भारतीय विचारांचा प्रवास कसा झाला आणि त्यांनी चीनसारख्या ठिकाणी कितपत विजय मिळवला याचे तपशील अजिबात माहीत नाहीत. जेव्हा मी हा प्रवास सुरू केला तेव्हा मलाही हे नक्कीच माहीत नव्हते.

एक गोल्डन रोड आणि दुसरा इंडोस्फिअर

भारतीयांना त्यांच्या विज्ञान आणि गणिती प्रगतीचा इतिहास माहीत आहे. परंतु पाश्चिमात्य देशांचं काय त्यांना केवळ अरेबिक नंबर्स हे अरेबियातून आले इतकंच माहीत असतं. भारतीय व्यापारामुळे भारतीय कल्पना जगभर कशा पसरल्या याची ही कथा आहे. पुस्तकात दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. एक गोल्डन रोड आणि दुसरा इंडोस्फिअर. पहिले व्यापारी नेटवर्क आहे जे पावसाळ्यात चालते. तर दुसऱ्याच्या बाबतीत भारताला वाऱ्याच्या प्रवाहाचा आशीर्वाद आहे. ज्यामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारात एकीकडे पर्शियन गल्फ किंवा लाल समुद्रात किंवा जावा, इंडोनेशिया, मेकाँग डेल्टा आणि दुसरीकडे चीनचा प्रवास करणे शक्य होते.

अधिक वाचा: Harappan Civilization is ‘Sindhu-Sarasvati’: ‘हडप्पा ही सिंधू-सरस्वती संस्कृती’च; हे म्हणण्यामागे राजकारण नाही तर संशोधन आहे; NCERT समाजशास्त्र पॅनेलचे प्रमुख नक्की काय म्हणाले?

भारताला समृद्ध खनिज संसाधने, मसाले, हस्तिदंत आणि रत्ने यांचा मोठा फायदा झाला आहे. मान्सूनच्या वाऱ्यांवर मार्गक्रमण करण्याची कला समजल्यावर, भारतीय व्यापारी आणि त्यांच्या अनुषंगाने भारतीय विद्वान, ब्राह्मण, मिशनरी इत्यादींनी लवकरच प्रवास केला. भारत हा रोमचा प्रमुख व्यापारी भागीदार होता. याविषयी गेल्या १० वर्षांत अनेक पुरातत्त्वीय पुरावे समोर आले आहेत. ‘ऑक्सफर्ड स्टडीज ऑन द रोमन इकॉनॉमी’च्या नवीनतम आवृत्तीनुसार, रोमन शाही अर्थसंकल्पाचा एक तृतीयांश हिस्सा लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील सीमाशुल्क कराद्वारे गोळा केला गेला. हेड्रिअन वॉल पासून ते ऱ्हाइन फ्रंटिअर पर्यंत अगदी अल्जिरियामधील किल्ल्यांची असलेली साखळी यातील एक तृतीयांश निर्मिती ही रेशीम, कापड, हस्तिदंत आणि वन्यप्राण्यांच्या यांच्या आयातीच्या निमित्तानेच झालेली आहे. मला खात्री आहे की, यातूनच बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार पश्चिम आशियामध्ये झाला. बेरेनीके [इजिप्तमध्ये] येथे अलीकडेच सापडलेले पुरावे याची साक्ष देतात. चौथ्या शतकात रोमन साम्राज्य कोसळले आणि भारताला संपत्तीचा पर्यायी मार्ग शोधावा लागला… त्यानंतर व्यापाराचा ओघ पूर्वेकडे दिसू लागला. पाचव्या-सहाव्या शतकात बर्मा आणि जावाबरोबर मोठ्या प्रमाणावर भारतीय व्यापाराची सुरुवात झाली. मंदिर बांधली गेली. बोरोबुदुर आणि अंगकोर वाट येथील भव्य स्मारकांमध्ये वाढ झाली.