वन्यप्राणी आणि मनुष्याची मैत्री जमल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे माणसाचा लळा लागतो त्याप्रमाणेच वन्यप्राणी, पक्षीही माणसाळल्याची उदाहरणे आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये मोहम्मद आरिफ आणि सारस क्रौंच पक्ष्याची मैत्री चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या मैत्रीवरून उत्तर प्रदेशचे राजकारणही तापले आहे. सारस क्रौंच हा उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये, अमेठी जिल्ह्यातील मंढका गावात जखमी अवस्थेत असलेला एक सारस क्रौंच पक्षी आरिफला आढळून आला. आरिफने या पक्ष्याची शुश्रूषा करून त्याला बरे केले. बरे झाल्यानंतरही सारस क्रौंच पक्षी आरिफला सोडायला तयार नव्हता. दोघांच्या मैत्रीला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र कायद्याप्रमाणे वन्य प्राण्याला किंवा पक्ष्याला घरी किंवा मनुष्य वस्तीत ठेवता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्याला अवैधरीत्या घरी ठेवल्याबद्दल आरिफवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या सारस क्रौंच पक्ष्याला वनविभागाने जवळच्या प्राणिगृहात ठेवल्यानंतर त्याला कानपूर प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आले.

वन्यप्राण्याला वाचविणे गुन्हा आहे का?

वन्यप्राण्यांना माणसांनी वाचविणे, यावर जगभरात बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचे कारण म्हणजे वन्यप्राण्यांना बाहेरील व्यक्तीच्या मदतीची गरज नसते. तसेच वन्यप्राण्यांचा बचाव करण्यासाठी सामान्य लोक आवश्यक साधनसामग्रीने सुसज्ज नसतात. त्यामुळे अशा वेळी प्राण्याकडूनच लोकांना धोका उद्भवू शकतो. २०१९ मध्ये मलेशियात असाच एक प्रकार घडला होता. तेथील एका गायिकेने ‘सन बेअर’ (Sun Bear) या अस्वलाच्या प्रजातीला मेलिशियातील कौलालम्पूर (Kualalumpur) येथील इमारतीमध्ये स्वतः सोबत ठेवले. घायाळ अवस्थेत आढळलेल्या या अस्वलावर उपचार करून त्याला स्वतःसोबत ठेवण्याचा निर्णय या महिलेने घेतला होता. मलेशियन कोर्टाने वन्यजीव कायद्यांतर्गत सदर महिलेवर गुन्हा दाखल केला. तसेच २०२१ मध्ये, यूएसएमधील मिशिगन राज्यातदेखील एका महिलेवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारची परवानगी न घेता तब्बल सहा प्राण्यांना या महिलेने आपल्या घरात आसरा दिला होता. त्यामध्ये दोन आठवड्यांच्या हरणाच्या पाडसाचाही समावेश होता. नैसर्गिक संसाधन विभागाने या सहा प्राण्यांना आपल्या ताब्यात घेऊन महिलेवर गुन्हा दाखल केला.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

हे वाचा >> कुतूहल : वन्यजीव संरक्षण कायदा

भारतातील कायदे काय सांगतात?

वन्यजीव सरंक्षण कायद्याच्या कलम ३९ नुसार, राज्याची संपत्ती असलेले वन्यप्राणी बाळगण्याचा आणि त्यावर ताबा किंवा नियंत्रण मिळवण्याचा कोणात्याही व्यक्तीला अधिकार नाही. उत्तर प्रदेशमधील जे उदाहरण आता समोर आले आहे, त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने वन्यप्राण्यावर असा ताबा मिळवला असेल तर कुणालाही जवळच्या पोलीस स्थानकात त्याबद्दल तक्रार दाखल करता येते. संबंधित अधिकारी ४८ तासांच्या आत अवैधरीत्या ताब्यात ठेवलेल्या प्राण्याची सुटका करतात. याच कायद्यातील कलम ५७ नुसार, एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात वन्यजीवाचा ताबा किंवा नियंत्रण असल्याचे आढळून आल्यास गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्तीस दोषी मानण्यात येईल. तसेच आरोप चुकीचे आहेत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असेल.

याचाच अर्थ वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कुणालाही घायाळ वन्यपक्ष्याला स्वतःच्या घरी नेण्याचा किंवा राज्याच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय महिनाभर बाळगण्याचा अधिकार नाही. पण या प्रकरणाची गुंतागुंत थोडी वेगळी आहे. यात जखमी झालेला उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी आहे आणि त्याचा सांभाळ करणारा शेतकरी.

सारस क्रौंच पक्ष्याबाबत उत्तर प्रदेशमध्ये वेगळी भावना का आहे?

ब्रिटिशांच्या राजवटीत पक्षिविद्यातज्ज्ञ (ornithologist) एलएच इर्बी (LH Irby) यांनी अवध (उत्तर प्रदेश) मधील आपल्या निरीक्षणांची १८६१ साली नोंद करून ठेवली. ते म्हणतात, “हे छोटे पक्षी मनुष्याला हाताळता येतात. जर त्यांना खाऊ-पिऊ घातले तर ते माणसाळतात आणि मिसळून राहतात. अगदी कुत्र्याची मनुष्यासोबत नाळ जुळते त्याप्रमाणे.”

इर्बी यांनी नोंदविलेल्या निरीक्षणाच्या ७५ वर्षांनंतर ऑस्ट्रियन प्राणिशास्त्रज्ञ लॉरेन्झ कोनराड यांनीदेखील आपले निरीक्षण नोंदविले. हे छोटे प्रीसोशल (precocial) पक्षी (अंड्यातून बाहेर आल्यानंतर लगेच डोळे उघडतात आणि चालू-फिरू शकतात असे पक्षी) आपल्या आई-वडिलांचे लगेचच अनुकरण करायला शिकतात, असे लॉरेन्झ कोनराड यांनी नमूद केले आहे. वॉटरबर्ड्स सोसायटीचे मुख्य संपादक केएस गोपी सुंदर हे १९९८ पासून सारस क्रौंच पक्ष्यांच्या हालचालींचा अभ्यास करत आहेत. सारस क्रौंच पक्षी हे आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहणे पसंत करतात, अशी जगभर मान्यता होती. पण जोडीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणामुळे सारस पक्ष्याच्या जोडीमध्ये तिसऱ्याचाही प्रवेश होतो, असा दावा सुंदर यांनी आपल्या दीर्घकाळाच्या निरीक्षणानंतर केला. तसेच सारस पक्ष्याची शेतकऱ्यांसोबत खूप आधीपासून नाळ जोडलेली आहे. हरितक्रांतीनंतर या पक्ष्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे, सुंदर यांनी सांगितले.

सारसमुळे रामायणाची निर्मिती झाली?

भारतीय शेतकरी हे परंपरागतरीत्या आपल्या शेतामध्ये या पक्ष्यांना आश्रय देत आले आहेत. शेतातील पेरणीच्या हंगामानुसार भारतातील सारस पक्षी प्रजोत्पादन करतात. जगभरात इतर ठिकाणी सारस क्रौंच पक्षी प्रजोत्पादनासाठी पावसाळ्याची वाट पाहतात. पण भारतातील सारस क्रौंच पक्षी हे शेतकऱ्याची शेतातील हालचाल पाहून पावसाचा अंदाज घेतात आणि त्यानुसार प्रजननाची सुरुवात करतात.

महर्षी वाल्मीकी यांच्याबाबतची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. वाल्मीकी नदीत स्नान करत असताना किनाऱ्यावर सारस क्रौंच पक्ष्याची जोडी प्रणयक्रीडेत मग्न होती. त्या वेळी एका शिकाऱ्याने नर सारसाची बाणाने शिकार केली. शिकारीनंतर मादी सारसने चीत्कार केला. हा चीत्कार सहन न झाल्याने वाल्मीकी यांनी शिकाऱ्यास शाप दिला. संस्कृतमध्ये दिलेला हा शाप रामायणाचा पहिला श्लोक आहे, ज्यातून पुढे रामायण या महाकाव्याची निर्मिती झाली.

हे वाचा >> उपक्रम : वेध रामायणाचा

उत्तर भारतातील काही लहान शेतकरी पिकांच्या काळजीपोटी या सर्वभक्षी पक्ष्याच्या प्रजातीला शेतातून हुसकावून लावतात. असे असले तरी मोठ्या समुदायाने या प्रजातीला स्वीकारलेले आहे. सारस क्रौंच पक्षी एक प्रकारे शेतकऱ्यांना मदतच करतात. शेतातील उंदीर, छोटे कीटक हे सारसाचे प्रमुख भक्ष्य आहेत. तसेच रात्रीच्या वेळी नीलगाईंचा पिकात शिरल्यास सारस क्रौंच पक्षी मोठ्याने चीत्कार करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना संकट आल्याची माहिती मिळते. तसेच पिकावर आलेल्या गोगलगाई सारसाच्या भक्ष्य असल्यामुळे पिकांचेही रक्षण होते.

आरिफच्या प्रकरणात आता पुढे काय होणार?

सारस क्रौंच पक्षी याआधीही माणासांसोबत अतिशय प्रेमाणे राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. १९८९ साली, छायाचित्रकार रघु राय यांनी खजुराहो येथे एका कुटुंबासोबत सारस क्रौंच पक्षी राहत असल्याचा उल्लेख केला होता. त्या कुटुंबासोबत तो चपाती खात असल्याचेही रघु राय म्हणाले होते. एकंदर सारस पक्ष्याची प्रजाती हे उत्तर भारतीयांसाठी नवल किंवा धोका म्हणून गणले जात नाहीत.

गोपी सुंदर यांनी सांगितले की, जगभरातील अनेक प्राणिसंग्रहालयांत ठेवण्यात आलेल्या सारस क्रौंच पक्ष्यांची तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत नाळ जुळते. अशा वेळी हे पक्षी अचानक वन्यभागात सोडल्यास इतर पक्ष्यांसोबत त्यांना जुळवून घेणे कठीण जाते. आरिफने ज्या सारस पक्ष्याची काळजी घेतली, त्याला आता इतर वन्यप्राण्यांशी जुळवून घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. प्राणिसंग्रहालयात राहणारे पक्षी हे आनंदी राहत नाहीत. त्यामुळेच आरिफ आणि संबंधित सारस पक्ष्याला एकत्र राहण्याची मोकळीक दिली पाहिजे, असे गोपी सुंदर यांनी सुचविले आहे.