अमोल परांजपे

पूर्वीच्या सोव्हिएट राजवटीचा भाग असलेले दोन देश अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात पुन्हा युद्धाची ठिणगी पडली आहे. आठवडाभरात दोन्हीकडील २००पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्यानंतर आता शस्त्रसंधी झाला असला तरी कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, अशी स्थिती आहे. रशिया-युक्रेननंतर युरोपवर या दुसऱ्या युद्धाचे ढग जमा झाले आहेत.

Indians are eligible for multi-entry Schengen visa for longer validity Why Changes in Schengen Visa Rules Matter
विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?

१०० वर्षांपूर्वी कशी पडली वादाची ठिणगी?

१९२० साली रशियाचे तत्कालिन हुकुमशहा जोसेफ स्टॅलिन यांनी कॉकेशस प्रांतातील बराचसा प्रदेश सोव्हिएत नियंत्रणाखाली आणला. त्यात मुस्लिमबहुल अझरबैजान आणि ख्रिश्चनबहुल आर्मेनियाचा समावेश होता. त्यावेळी आर्मेनियावंशियांचे प्राबल्य असलेला नागोर्नो-कराबाख प्रांत स्टॅलिन यांनी अझरबैजानमध्ये गणला. ८०च्या दशकात सोव्हिएत विघटनानंतर हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. मात्र नागोर्नो-कराबाखची जखम एका शतकानंतरही ठसठसतेच आहे.

१९९४च्या युद्धानंतर कशी चिघळली परिस्थिती?

वादग्रस्त भूभागावरून दोन्ही देशांमध्ये लहानमोठ्या चकमकी होत असल्या, तरी १९८८ ते १९९४ या काळात झालेल्या युद्धात अझरबैजानच्या लष्कराला या भागातून हुसकावण्यात आर्मेनियाला यश आले. या युद्धामुळे हजारो लोक मारले गेले तर लाखो विस्थापित झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा भाग अझरबैजानमध्ये असला तरी सध्या तिथे आर्मेनियावंशीय बंडखोरांचे राज्य आहे. ते याला ‘नागोर्नो-कराबाख स्वायत्त प्रांत’ असे संबोधतात. त्यानंतर सुमारे १५ वर्षे तणावपूर्ण शांततेत गेली आणि २०१०नंतर पुन्हा चकमकींचे सत्र सुरू झाले. या काळात दोन्हीकडील शेकडो सैनिक मारले जात होते. आणखी १० वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या युद्धाची ठिणगी पडली.

विश्लेषण : १७ सप्टेंबर – ‘हैदराबाद मुक्ती दिन’ की ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’?

आर्मेनियातील क्रांतीनंतर वाद का चिघळला?

१९९८ साली आर्मेनियामध्ये कथित ‘मखमली क्रांती’ (व्हेल्वेट रिव्होल्यूशन) झाली आणि निकोल पाशिनियान राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी सुरुवातीला वाटाघाटीतून मार्ग काढण्याचे जाहीर केले. मात्र नंतर आपला शब्द फिरवला आणि वादग्रस्त भाग आर्मेनियाचाच असल्याचे मांडायला सुरुवात केली. त्यामुळे वाद अधिक चिघळला आणि २०२०साली मोठे युद्ध भडकले. या युद्धात दोन्हीकडे मिळून सुमारे ६,५०० सैनिक मारले गेले. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाल्यानंतर तणाव निवळला असला तरी पुन्हा एकदा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

आर्मेनिया-अझरबैजानच्या पाठीवर कुणाचा हात?

छोट्या देशांच्या आडून अनेकदा शक्तिशाली देश आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. अझरबैजान-आर्मेनिया वादातही अशा दोन शक्ती आहेत. अझरबैजानला तुर्कस्तानचा पाठिंबा आहे, तर रशिया आर्मेनियाला साथ देत आला आहे. अर्थात, रशिया दोघांशीही चांगले संबंध असल्याचा दावा करत असला तरी पुतीन आर्मेनियाला बळ देण्याचाच प्रयत्न करताना दिसतात. बड्या राष्ट्रांचे लष्करी पाठबळ असल्यामुळे हे दोघे अनेकदा बेटकुळ्या फुगवून एकमेकांसमोर उभे राहतात.

रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न?

यंदाच्या मार्च महिन्यात अझरबैजानच्या लष्कराने वदग्रस्त भागातील फारूख हे गाव ताब्यात घेतले. हे संपूर्ण गाव आर्मेनियावंशियांचे आहे. मात्र त्याला भौगोलिक धोरणात्मक महत्त्व असल्यामुळे दोन्ही देशांची त्यावर नजर आहे. शिवाय रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये अडकल्याचा फायदा घेत अझरबैजान आणखी प्रदेश बळकावेल, अशी भीती आर्मेनियाला आहे. एप्रिलमध्ये युरोपीय महासंघाने नेमलेल्या मध्यस्थांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑगस्टमध्ये अझरबैजानने नागोर्नो-कराबाखमध्ये आक्रमक हालचाली केल्या. लाचिन भागात आपला सैनिक ठार झाल्याचा आरोप आर्मेनियाने केला. गेल्या आठवडाभरात दोन्ही देशांची सीमा पुन्हा अस्थिर झाली. दोन्ही देश ताज्या हिंसेला परस्परांना जबाबदार धरत आहेत. या धुमश्चक्रीत आर्मेनियाने १३५ तर अझरबैजानने ७७ सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे.

विश्लेषण : चित्त्यांच्या आगमनाची उत्सुकता… आणि काही अनुत्तरित प्रश्नही!

युरोपात आणखी एका युद्धाचा भडका उडणार?

करोनाची साथ आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. आर्मेनिया-अझरबैजान यांच्यात गेल्या २-३ दिवसांपासून चकमकी झडल्या नसल्या तरी कोणत्याही क्षणी पुन्हा परिस्थिती चिखळण्याची शक्यता आहे. त्यातच आता मुस्लिमबहुल देश अझरबैजानच्या बाजुने आणि ख्रिश्चनबहुल राष्ट्रे आर्मेनियाच्या पाठीशी उभे रहात असल्याचे चित्र आहे. आणखी एका युद्धाचा भडका उडाला, तर ते सर्वांनाच महागात पडण्याची भीती आहे.

Live Updates