-चिन्मय पाटणकर
India gets worlds first liquid mirror telescope: लघुग्रह, ताऱ्यांचे विस्फोट, अवकाशातील कचरा आणि अन्य अवकाशीय वस्तूंचे भारतात पहिल्यांदाच द्रव आरसा दुर्बिणीद्वारे (आरसा म्हणून पाऱ्याचा वापर केलेली दुर्बीण) निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी हिमालयात २ हजार ४५० मीटर उंचीवरील नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्समध्ये (एआरआयईएस) देवस्थल वेधशाळेत आंतरराष्ट्रीय द्रव आरसा दुर्बीण (इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप) बसवण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबरपासून या दुर्बिणीच्या सहाय्याने निरीक्षणांची सुरुवात केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय द्रव आरसा दुर्बीण (इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप) ही कार्यान्वित असलेली जगातील एकमेव दुर्बीण आहे. केवळ खगोलशास्त्रासाठी तयार केलेली पहिली दुर्बीण हा मान तिला मिळाला आहे.

इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप काय आहे?

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

स्थिर राहणारी ही दुर्बीण केवळ रात्रीच्या वेळी निरीक्षणे घेऊन त्यांची छायाचित्रे संकलित करेल. म्हणजेच या दुर्बिणीकडून अवकाशातील सर्व तारे, दीर्घिका, ताऱ्यांचे विस्फोट, लघुग्रह, अवकाशातील कचरा अशा साऱ्या घटकांच्या नोंदी घेऊन त्यांची छायाचित्रे घेईल. आयएलएमटीचा आरसा पाऱ्यापासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची प्रकाशाच्या परावर्तनाची क्षमता उच्च आहे. जवळपास ५० लिटर (अंदाजे ७०० किलोग्रॅम) पारा एका कंटेनरमध्ये भरून आयएलएमटीच्या उभ्या अक्षाबरोबर ठरावीक वेगाने फिरवला जाईल. त्यामुळे पाऱ्याचा कंटेनरमध्ये थर तयार होऊन तो आरशाप्रमाणे काम करेल. पाऱ्याचा हा पृष्ठभाग प्रकाश संकलित करण्यासाठी आदर्शवत आहे. या आरशाचा व्यास चार मीटर आहे.

पारंपरिक दुर्बीण आणि आयएलएमटी यांच्यात फरक काय?

इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप ही अवकाशीय निरीक्षणांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक दुर्बिणींसारखी नाही. पारंपरिक दुर्बिणींमध्ये उच्च दर्जाच्या आरशाचा वापर केलेला असतो. हा आरसा एक किंवा वेगवेगळ्या कोनातून वक्र केलेला असतो. ही दुर्बीण ठरावीक रात्री नियंत्रित पद्धतीने अवकाशीय वस्तूला केंद्रित ठेवली जाते. त्यावर पडणाऱ्या प्रकाशाचे छायाचित्रात रूपांतर केले जाते. तर आयएलएमटीमध्ये आरसा म्हणून पाऱ्याचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक दुर्बीण आणि आयएलएमटी यांच्या निरीक्षणांच्या किंवा नोंदी घेण्याच्या वेळाही वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, पारंपरिक दुर्बीण अभ्यासाच्या गरजेनुसार ठरावीक वेळी वापरली जाते. तर आयएलएमटी ही ऑक्टोबरपासून पुढील पाच वर्षे रोज रात्री कार्यान्वित असेल. केवळ पावसाळ्यातील आर्द्रतेपासून बचाव करण्यासाठी जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये ती बंद ठेवली जाईल. या पूर्वी एकदाच लिक्विड मिरर टेलिस्कोपची निर्मिती करण्यात आली होती. त्याचा वापर प्रामुख्याने उपग्रहांचा माग काढण्यासाठी किंवा लष्करी उद्देशाने करण्यात आल्याचे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सचे प्रकल्प संशोधक डॉ. कुंतल मिश्रा यांनी सांगितले.

देवस्थलमध्ये कार्यान्वित दुर्बिणी कोणत्या?

देवस्थलमध्ये यापूर्वी दोन दुर्बिणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यात ३.६ मीटर देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप (डीओटी) ही भारतातील सर्वांत मोठी दुर्बीण २०१६मध्ये सुरू झाली. तर त्या आधी २०१०मध्ये १.३ मीटर देवस्थल फास्ट ऑप्टिकल टेलिस्कोप (डीएफओटी) सुरू झाली. त्यानंतर आता आयएलएमटी ही दुर्बीण कार्यान्वित करण्यात येत आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी देवस्थल हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते, असे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सचे संचालक प्रा. दीपांकर बॅनर्जी यांनी सांगितलं.

आयएलएमटीमध्ये कोणत्या देशांचा, संशोधन संस्थांचा सहभाग आहे?

इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपद्वारे विविध देशांतील संशोधन संस्थांच्या सहकार्यातून संशोधन करण्यात येईल. त्यात भारतातील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्स, बेल्जियममधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स आणि जिओफिजिक्स, लिएज युनिव्हर्सिटी, कॅनडातील कॅनेडियन ॲस्ट्रोनॉमिकल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश कोलंबिया, लावल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रियल, युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, युनिव्हर्सिटी ऑफ व्हिक्टोरिया, यॉर्क युनिव्हर्सिटी, पोलंडमधील पोझ्नन वेधशाळा, उझबेकिस्तानमधील उलुघ बेग ॲस्ट्रोनॉमिकल इन्स्टिट्यूट ऑफ उझबेक ॲकॅडमी ऑफ सायन्स आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ उझबेकिस्तान यांचा सहभाग आहे.

आयएलएमटी कसे काम करेल?

नियमित वैज्ञानिक नोंदींचे काम सुरू झाल्यावर आयएमएलटीकडून रोज रात्री जवळपास १० गिगाबाईट विदा संकलित होईल. या विदाचे तातडीने विश्लेषण करून अवकाशीय बदल किंवा नव्या स्रोतांचा अभ्यास केला जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात विदा जमा होणार असल्याने त्याच्या विश्लेषणासाठी बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विदा विश्लेषण करून त्याचा वापर अभ्यासासाठी केला जाईल.