१९९९ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्वबळावर सत्तेत आले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) २० पक्ष सामील होते. जुलैमध्ये कारगिलचे युद्ध समाप्त झाल्यानंतर ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर १९९९ या दरम्यान ही निवडणूक घेण्यात आली. १७ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयींचे आधीचे सरकार फक्त एका मताने कोसळले होते. १९९९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३३९ जागांवर निवडणूक लढवली; तर इतर जागा एनडीएतील इतर घटक पक्षांना देण्यात आल्या होत्या.

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी ७५ वर्षीय अटलबिहारी वाजपेयी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याच काळात भाजपामध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी राहू लागली. जुलै २००२ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवार करून आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाला आणखी शक्ती मिळाली. दुसरीकडे सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करीत महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी २० मे १९९९ रोजी आणखी दोन नेत्यांसमवेत काँग्रेसशी फारकत घेतली. त्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) स्थापना केली.

Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Narendra modi
“सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार”, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधींची भूमिका काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यापुरती मर्यादित होती. मात्र, १९९९ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षावर ताबा मिळवला. या निवडणुकीमध्ये ५४३ पैकी ४५३ जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आजवरच्या सर्वांत कमी जागा प्राप्त झाल्या. मात्र, पक्षावर आपली मजबूत पकड निर्माण करण्यात त्यांना यश आले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष भाजपाला तगडी टक्कर देण्याइतपत पुन्हा सशक्त झाला होता.

हेही वाचा : माणसाचं शरीर किती उकाडा सहन करु शकतं? उन्हामुळे मृत्यू कसा होतो?

निवडणूक आणि मतमोजणी

कारगिल युद्ध २६ जुलै १९९९ रोजी समाप्त झाले. त्यानंतर ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक घेण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठ टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार होती. त्यातील तीन टप्प्यांमध्ये एकूण चारच जागांसाठी निवडणूक होणार होती; त्यामुळे वास्तवात ती पाच टप्प्यांत पार पडणारी निवडणूक होती, असे म्हणता येते. ६ ऑक्टोबर १९९९ रोजी मतमोजणीस सुरुवात झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच निकाल घोषित करण्यात आला.

या निवडणुकीमध्ये ६१.९५ कोटी मतदारांपैकी ३७.१६ कोटी (५९.९९ टक्के) मतदारांनी मतदान केले. त्यातील २९.५७ कोटी महिला मतदार होत्या. या निवडणुकीमध्ये ४,६४८ उमेदवार होते. उत्तर प्रदेशातील गोंडा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३२ उमेदवार रिंगणात होते. अलीकडेच कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे चर्चेत आलेले ब्रिजभूषण सिंह याच निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदा विजयी झाले होते. एकूण २८४ महिला उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांनी विजय मिळवला.

१२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ या काळात टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांची कारकीर्द वादळी मानली जाते. निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही लक्षात ठेवले जाते. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टी. एन. शेषन यांना काँग्रेसकडून गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये लालकृष्ण आडवाणींविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा बलिया मतदारसंघातून विजय झाला. समाजवादी पार्टीने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. लखनौ मतदारसंघातून अटलबिहारी वाजपेयी; तर अलाहाबाद मतदारसंघातून मुरली मनोहर जोशी विजयी झाले. १९९९ च्या या लोकसभा निवडणुकीतच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधींनी उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या.

भाजपाला तेवढ्याच जागा; काँग्रेसवर नामुष्की

१९९८ च्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा १८२ जागा मिळाल्या. मात्र, काँग्रेसच्या जागा १४१ वरून ११४ वर घसरल्या. माकपने ३३, तेलुगू देसम पार्टीने २९, सपाने २६, संयुक्त जनता दलाने २१, शिवसेनेने १५, बहुजन समाज पार्टीने १४, द्रविड मुन्नेत्र कळघमने १२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तृणमूल काँग्रेस पक्षाने प्रत्येकी आठ, तर राष्ट्रीय जनता दल व भाकपने चार जागा मिळवल्या. उत्तर प्रदेशमधील निकाल भाजपासाठी धक्कादायक होते. मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील वादामुळे पक्षाला फटका बसला होता. उत्तर प्रदेशमधील ८५ जागांपैकी फक्त २९ जागांवर भाजपाला विजय मिळाला. याआधीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला ५८ जागा मिळवता आल्या होत्या; मात्र तरीही सत्ता स्थापन करण्याइतपत ३०३ जागांचे बहुमत वाजपेयींना मिळाले होते.

मोदींच्या नेतृत्वाचा उदय

वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यापासूनच हादरे बसायला सुरुवात झाली. भाजपाचे नेते बंगारू लक्ष्मण यांनी एक लाख रुपयांची लाच घेतल्याचे स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झाले. २००१ मधील हे ‘तहलका’ प्रकरण चांगलेच गाजले. उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल (सध्याचे नाव उत्तराखंड), बिहारमधून झारखंड व मध्य प्रदेशमधून छत्तीसगढ अशा राज्यांची निर्मिती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अटलबिहारी वाजपेयी की लालकृष्ण आडवाणी, असा एक सुप्त संघर्षही उफाळून आला. यादरम्यानच गुजरातमध्ये काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले. ऑक्टोबर २००१ मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना पायउतार व्हायला लावून नरेंद्र मोदी (तेव्हाचे वय ५१ वर्षे) या नव्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवण्यात आली. येणाऱ्या काळात हे नेतृत्व प्रचंड वादग्रस्त ठरणार होते. या वादांवरही मात करीत देशाचे नेतृत्व करण्यासाठीही ते सज्ज होणार होते.

काँग्रेसमधील गोंधळ

सोनिया गांधी यांचे नेतृत्व अनेकांना मान्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात बंड होताना दिसले. सीताराम केसरी यांच्याकडून १९९८ साली सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. भारतीय हवाई दल अधिकारी राहिलेले राजेश पायलट, राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंह राव यांचे राजकीय सल्लागार राहिलेले जितेंद्र प्रसाद हे सोनिया गांधी यांचे सर्वांत मोठे टीकाकार होते. २००० च्या उत्तरार्धात पक्षाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीवर या दोघांचेही लक्ष होते. जून २००० मध्ये पायलट यांचा अपघातात मृत्यू झाला; तेव्हा जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींविरुद्ध निवडणूक लढवली; पण त्यांना फक्त ९४ मते मिळाली. ९८ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवीत पक्षावर आपली मजबूत पकड असल्याचे त्यांनी सिद्ध केले. जानेवारी २००१ मध्ये जितेंद्र प्रसाद यांचेही निधन झाले.

हेही वाचा : Menstrual Hygiene Day: ‘फ्री ब्लीडिंग’ म्हणजे काय? त्याचा काय फायदा होतो?

राष्ट्रपतिपदाची गाजलेली निवडणूक

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेला उमेदवार आश्चर्यचकित करणारा होता. सर्व मातब्बर राजकारण्यांना बाजूला सारून त्यांनी शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवार म्हणून घोषित केले. विरोधकांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी राहिलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळे एपीजे अब्दुल कलाम यांचा विजय झाला. उपराष्ट्रपती पदासाठी भैरवसिंह शेखावत यांची निवड झाली. ते भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. २००२ मध्ये भाजपाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा फायदा मुलायम सिंह यादव यांना झाला. ऑगस्ट २००३ मध्ये जेव्हा बसपा-भाजपा सरकार कोसळले तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी भाजपसोबत २९ ऑगस्ट २००३ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाच्या पहिल्या फळीतील नेते वयोमानानुसार थकत चालले होते आणि दुसऱ्या फळीतील तरुण नेते पक्षामध्ये लोकप्रिय होऊ लागले होते. गुजरात (मुख्यमंत्री नरेंद्र मोदी), मध्य प्रदेश (मुख्यमंत्री उमा भारती) व राजस्थान (मुख्यमंत्री वसुंधरा राजे) या राज्यांमध्ये नव्या नेत्यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतली. यादरम्यानच २००२ साली झालेल्या गुजरात दंगलींमुळे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व वादात सापडले. भाजपा पक्षांतर्गतही नरेंद्र मोदींवर बरीच टीका झाली.

एप्रिल २००२ मध्ये गोव्यात झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा मुद्दा चर्चेला आला. दुसऱ्या फळीतील नेते एम. व्यंकय्या नायडू व अरुण जेटली यांनी मोदींवर टीका केली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. एकीकडे काँग्रेसने समविचारी पक्षांची मोट बांधत तयारी सुरू केली होती; तर दुसरीकडे आपलाच विजय होणार असल्याचा अतिआत्मविश्वास भाजपाला होता. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘इंडिया शायनिंग’चा नारा दिला. सप्टेंबर-ऑक्टोबर २००४ मध्ये निवडणूक होणार होती. मात्र, विजयाचा आत्मविश्वास अधिक असल्याने सहा महिन्यांच्या आधीच वाजपेयींनी लोकसभा बरखास्त केली आणि एप्रिल-मे महिन्यांत निवडणूक घेतली. या निवडणुकीत एनडीएचा पराभव झाला आणि यूपीए सरकार सत्तेवर आले.