BCCI president Roger Binny gets conflict of interest notice for daughter-in-law Mayanti's Star Sports connection | Loksatta

विश्लेषण: अध्यक्षांनाच BCCI नं पाठवली ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ची नोटीस; मयंती लँगरमुळे रॉजर बिन्नी अडचणीत! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Mayanti Langer BCCI Conflict: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची नोटीस बजावण्यात आली आहे.

विश्लेषण: अध्यक्षांनाच BCCI नं पाठवली ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ची नोटीस; मयंती लँगरमुळे रॉजर बिन्नी अडचणीत! नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सुनेमुळे रॉजर बिन्नी अडचणीत! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक बोर्डातील अंतर्गत गोष्टींवर नुकतीच विराट कोहली प्रकरणामुळे मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यानं पद सोडलं की त्याला सोडायला लावलं? यावरून मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातून बीसीसीआयमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं. त्याआधीही रवी शास्त्रीला हटवून राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करतानाही बराच वाद झाला. आता पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अंतर्गत व्यवस्थेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यंदा बीसीसीआयच्या एका यंत्रणेनं चक्क अध्यक्षांनाच ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ची नोटीस पाठवली आहे!

रॉजर बिन्नी यांचं अध्यक्षपद धोक्यात?

अवघ्या दीड महिन्यापूर्वी म्हणजेच १८ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपल्यानंतर रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात सौरव गांगुलीच्या गच्छंतीवरून बरीच चर्चा झाली. त्यामुळे साहजिकच रॉजर बिन्नी यांच्या नियुक्तीचीही तितकीच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर आता त्यांना बजावण्यात आलेल्या ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ नोटिशीमुळे पुन्हा एकदा रॉजर बिन्नी चर्चेत आले असून त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे काय?

सामान्यपणे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात ही संकल्पना वेळोवेळी ऐकायला मिळते. बीसीसीआयच्या नियमावलीमध्येही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. सामन्यांच्या प्रसारणासंदर्भात बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्स यांच्यामध्ये झालेल्या करारामुळे या प्रकरणात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची तक्रार करण्यात आली आहे.

विश्लेषण : बिहारी ‘गब्बर’च्या मुसक्या आवळणारे ‘दबंग’ अधिकारी; ‘बिहार डायरीज’चे खऱ्या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण?

का बजावली नोटीस?

तसं पाहिलं तर रॉजर बिन्नी स्वत: BCCI चे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना स्वत: बीसीसीआयनेच नोटीस बजावणं काहीसं वेगळं वाटत असलं, तरी बीसीसीआयच्या नियमावलीनुसारच ही नोटीस बजावण्यात आली आहे.बीसीसीआयचे एथिक्स अधिकारी विनीत सरन यांनी रॉजर बिन्नी यांना Conflict of Interest ची नोटीस पाठवली आहे. “तुम्हाला हे कळवण्यात येत आहे की बीसीसीआय नियम ३९(२)(बी) नुसार एथिक्स अधिकाऱ्यांकडे संजीव गुप्ता नामक व्यक्तीकडून तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीत तुम्ही बीसीसीआयच्या नियमावलीतील नियम ३८(१)(अ) आणि नियम ३८ (२) यांचं उल्लंघन केल्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाला आहे. या नोटिसीवर २० डिसेंबरपर्यंत लिखित उत्त द्यावं”, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सुनेमुळे रॉजर बिन्नी अडचणीत!

भारतानं १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. या टीममध्ये मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्यापासूनच सौरव गांगुलीवरून वाद सुरू झाला होता. सौरव गांगुली कार्यकाळ संपल्यामुळे पायउतार झाला की त्याची गच्छंती झाली, यावरून तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता सुनेमुळे रॉजर बिन्नी अडचणीत आले आहेत.

कोण आहे मयंती लँगर-बिन्नी?

रॉजर बिन्नी यांची सून अर्थात स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर ही सध्या स्टार स्पोर्ट्ससाठी अँकर म्हणून काम करते. मयंती मूळची दिल्लीची आहे. २००८ सालापासून तिने इंडियन प्रिमियर लीगमध्ये अँकरिंग करायला सुरुवात केली होती. आयपीएल कव्हरेजच्या दरम्यान मयंतीने स्टुअर्ट बिन्नीची मुलाखत घेतली होती. २०१२मध्ये त्या दोघांचं लग्न झालं.

विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

BCCI आणि Star Sports ची डील!

दरम्यान, नोटीस पाठवण्याचं खरं कारण बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्समधील डील ठरलं आहे. स्टार स्पोर्ट्सकडे बीसीसीआयचे माध्यम प्रसारणाचे हक्क आहेत. शिवाय, आयपीएलच्या प्रसारणाचेही सर्व हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. त्यामुळे व्यावसायिक हितसंबंधांच्या संघर्षामुळे रॉजर बिन्नी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, मयंती लँगर आधीपासूनच स्टार स्पोर्ट्सची अँकर म्हणून काम करत असता रॉजर बिन्नी यांच्याविरोधात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची तक्रार का करण्यात आली? बिन्नी यांच्या निवडीवेळीच ही बाब निकषांमध्ये का तपासण्यात आली नाही? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:25 IST
Next Story
विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?