Bijamandal Temple Controversy वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीबरोबरच भारतातील अनेक प्राचीन वास्तूंभोवती मंदिर- मशिदीचा वाद गुंफला गेला आहे. याच यादीतील मध्य प्रदेशातील बीजा मंडलचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. विदिशा जिल्ह्यातील बीजा मंडल मंदिरात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी हिंदू भाविक पूजा-विधी करतात. ही वार्षिक पूजा अनेक वर्षांपासून परंपरेने मंदिराबाहेर होत आहे. या वर्षी मात्र एका हिंदू गटाने मंदिरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. या मागणीवर उत्तर म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) खात्याकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रात बीजा मंडल हे मंदिर नसून मशीद आहे असे म्हटले आहे. त्यामुळे एएसआयच्या पत्राचा हवाला देत जिल्हाधिकाऱ्यांनी बीजा मंडल हे मंदिर नसून मशीद असल्याचे सांगून आत पूजा करण्यास परवानगी नाकारली. या निर्णयामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

बीजा मंडल किंवा विजया मंदिर म्हणजे काय?

बीज मंडल हे खजुराहोजवळील जाटकारा गावातील एक उद्ध्वस्त झालेले मंदिर आहे. मंदिराची लांबी ३४.६० मीटर आहे. बीज मंडल हे विजया मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, विदिशा-अशोकनगर रस्त्यावर ईदगाह चौकापासून सुमारे २ किमी अंतरावर आहे. विदिशा शहरातच सम्राट अशोकाने त्याची पत्नी देवी हिची भेट घेतली होती, येथेच सांचीच्या महान स्तूपाचे काम केले. बीजा मंडल (किंवा बीजा मंडळ) हे ११ व्या शतकात बांधले गेलेले एक भव्य मंदिर होय. या भव्य मंदिराचे आज केवळ अवशेष शिल्लक आहेत. या मंदिराच्या स्थळावर एका मोठ्या संरचनेचा पाया आपण पाहू शकतो, प्रत्यक्ष या अवशेषांपेक्षा मंदिर मोठे असल्याचा तर्क अभ्यासक व्यक्त करतात.

Vandalism of vehicles in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवड: वाहन तोडफोडे सत्र सुरूच; १३ ते १४ वाहनांची कोयत्याने तोडफोड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Gosht Mumbaichi
गोष्ट मुंबईची! भाग १५३ : इन्फोसिसच्या नावाची चर्चाही झाली याच गणपतीच्या साक्षीनं!
Pune, liquor, Ganesh utsav, violation,
पुणे : गणेशोत्सवात मध्यभागात मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
ganesh idols made from paper
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
gambling addict who killed contractor in nallasopara arrested
वसई : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचा उलगडा; जुगाराच्या नादाने केली हत्या
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा
pune married women suicide with her daughter
पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन?

चर्चिका /विजया मंदिर

या संरचनेच्या पायावर एकेकाळी अनेक खांब असल्याचे लक्षात येते आणि हे खांब त्यांच्यावरील अप्रतिम शिल्पकामासाठी ओळखले जातात, या स्तंभांचे अवशेष आजही या स्थळावर पाहायला मिळतात. काही अभ्यासक सांगतात की, येथील मूळ मंदिर ८ व्या शतकात बांधले गेले होते आणि नंतर परमार काळात सम्राट नरवर्मनने (११ व्या शतकाच्या उत्तरार्धात) या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. सम्राट नरवर्मन हे चार्चिका देवीचे भक्त होते, जिला विजया असेही म्हणतात, म्हणूनच हे विजया मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कनिंगहॅम आणि फणिकांत मिश्रा हे या मंदिराला ग्रहपती कोक्कला शिलालेखात नमूद केलेले वैद्यनाथ मंदिर मानतात.

आलमगीर मशीद

१७ व्या शतकात मशिदीच्या बांधकामासाठी मंदिराच्या मूळ दगडांचा वापर करून मुघलांनी मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. इतकेच नाही तर मुख्य मशिदीच्या परिसरातील खांब, जवळपासच्या विविध लहान मंदिरांमधून गोळा केले गेले, परिणामी मशिदीच्या डिझाइनमध्ये एकसमानपणाचा अभाव आहे. औरंगजेबाने मूळ मंदिर पाडून मंदिराच्या उध्वस्त अवशेषांवर मशीद तयार केली होती आणि त्या मशिदीला ‘आलमगीर मशीद’ (१६६२) असे नाव दिले.

मंदिर कसे उघडकीस आले?

१९९१ साली विदिशा शहरात रात्री अतिमुसळधार पाऊस पडला त्यामुळे मशिदीची एक भिंत पडली. यात मशिदीच्या आत ३०० वर्षांहून अधिक काळ असलेल्या अनेक हिंदू मूर्ती उघड झाल्या आणि हे हिंदू मंदिर असल्याचे लोकांच्या लक्षात आले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) खात्याच्या तपासणीत असे आढळून आले की, हिंदू मूर्ती उत्तरेकडील प्लॅटफॉर्मच्या खाली पुरल्या गेल्या होत्या, मूर्ती असलेला हा हॉल ईदच्या दिवशी प्रार्थनेसाठी वापरला जातो, १९७२ -१९७४ उत्खननादरम्यान देवी महिषासुर मर्दिनी आणि गणपतीच्याही मूर्ती सापडल्या. दुर्दैवाने हे संशोधन करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला अधिक शोधास स्थगिती देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण तपास सुरू असतानाच आदेशानुसार नगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. हिंदू-मुस्लिम दंगली होऊ नयेत म्हणून सरकारने ही स्थगिती लागू केली होती. प्रकरण अद्याप न्यायालयात आहे, परंतु शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी हे प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे.

अधिक वाचा: ‘सुपारीबाज’ या शब्दावरून राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ पण सुपारी देणं ते अंडरवर्ल्ड; या शब्दाचा प्रवास नेमका कसा झाला?

मुस्लिम काय म्हणतात?

मुस्लिम समाजाचे प्रवक्ते शोएब अहमद बबलू यांनी स्पष्ट केले की, बीजा मंडल वाद हा त्यांचा विषय नाही. त्यांनी नमूद केले की १९६५ साली एक करार झाला होता आणि त्यांना नमाजासाठी स्वतंत्र ईदगाह देण्यात आला होता, जिथे ते नमाज अदा करतात. बीजा मंडलाचा सध्याचा संघर्ष हा प्रशासन आणि हिंदू समाजातील आहे.

डिझाइन नवीन संसदेसारखे आहे

बीजा मंडळाच्या मंदिराची रचना नवीन संसद भवनासारखीच असल्याचे लक्षात येते, हे विशेष. मंदिरातील पूजेला परवानगी नाकारणे आणि त्याला मशीद असे नाव दिल्याने हिंदू संघटना नाराज असल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे.