Billionaire Bill Gates’ Divorce Regret: नातं हे एखाद्या काचेच्या वस्तूप्रमाणे असतं. एकदा तडा गेला की, तो कायमचाच. त्यामुळे त्याची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येकाच्या हातात असतं. अशीच एक गोष्ट आहे ती सुप्रसिद्ध अब्जाधीशाची..२७ वर्षाचा संसार आणि प्रेम त्याच्या हातून निसटून गेलं आणि मागे राहिली आहे ती पोकळी..कधीही भरून न येणारी पोकळी!

बिल गेट्स हे एक सुपरिचित नावं. त्यांनी अलीकडेच आपला २७ वर्षांचा संसार उध्वस्त झाला याविषयी खंत व्यक्त केली. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक चढ-उतारात ज्या व्यक्तीने साथ दिली. त्या नात्याला किंमत लावता येत नाही, हेच यातून सिद्ध होते. मेलिंडा फ्रेंच गेट्स या बिल गेट्स यांच्या पूर्व पत्नी. त्यांच्याबरोबरचा काडीमोड हा संपूर्ण आयुष्यातील सर्वात खेदजनक क्षण असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, आमची पहिली भेट १९८७ साली झाली. त्यावेळी मी आजच्या इतका प्रसिद्ध, संपन्न नव्हतो. यशस्वी होतो, परंतु आजच्या सारखे अभूतपूर्व यश मिळायला अजून अवकाश होता. तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्या व्यक्तीबरोबर घालवण्यात जादू असते, तुमच्या एकत्र आठवणी, एकत्र मुलं वाढवण्याचा अनुभव यात बरंच काही असतं. माझ्या आयुष्यातील प्रचंड यश मी मिलिंडा माझ्या आयुष्यात असताना मिळवले. तिने मला आयुष्यातील अनेक टप्प्यांमधून जाताना पाहिले आणि साथ दिली, असे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश असलेल्या गेट्स यांनी द टाईम्स ऑफ लंडनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

बिल गेट्स यांची हळवी आठवण

बिल गेट्स हे त्यांच्या जुन्या नात्याविषयीच्या हळव्या आठवणी व्यक्त करतात. संपत्ती किंवा यश मिळण्याच्या आधी आयुष्यात आलेल्या नात्याला ते महत्त्व देतात. अनेक यशस्वी लोकांसाठी नातं हे प्रेमाच्या किंवा मैत्रीच्या पवित्र स्वरूपात असतं. शेवटी, काळाच्या कसोटीवर टिकलेलं नातं हे पैशांनी विकत न घेता येणारी एक दुर्मीळ चैनीची वस्तू आहे. संपत्ती आणि प्रसिद्धी नव्याने मिळवलेल्या लोकांची एक मोठी चूक म्हणजे ते सुरुवातीपासून बरोबर असलेल्या जोडीदाराला सोडून देतात. संघर्षाच्या काळात तो त्यांच्याबरोबर होता, त्यांना यश मिळण्याआधी त्याने साथ दिली होती. परंतु ते त्याऐवजी तरुण किंवा अधिक आकर्षक साथीदाराची निवड करतात. बिल गेट्स यांच्या बाबतीत हे अचूक लागू होत नसले तरी ज्यावेळेस १९८७ साली मेलिंडा फ्रेंच गेट्स यांना ते भेटले तेव्हा ते आधीच श्रीमंत होते, परंतु तेव्हाच्या तुलनेत २०२१ साली त्यांची सत्ता आणि प्रभाव खूपच वाढलेला होता.

(Source: AP)

घटस्फोटाची कारणे आणि वास्तव

महत्त्वाचे म्हणजे बिल गेट्स यांनी स्वतःहून घटस्फोट घेतलेला नाही. मेलिंडा फ्रेंच गेट्स या त्यांच्या पतीने (बिल गेट्स यांनी) मनी मॅनेजरवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांना हाताळणे तसेच शिक्षा भोगलेल्या लैंगिक गुन्हेगार आणि बदनामी झालेल्या गुंतवणूकदार जेफ्री एप्स्टीन याच्याबरोबर संबंध ठेवणे यासाठी अस्वस्थ होत्या. याच कारणांमुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रेमकथांचा प्रभाव

लोकांना संघर्षातून यश मिळवलेल्या प्रेमकथांचे विशेष आकर्षण असते. यात जोडीदार एकमेकांना सुरुवातीपासूनच साथ देतात. उदाहरणार्थ, १९८९ साली मिशेल रॉबिन्सन या तरुण लॉ करणाऱ्या विद्यार्थ्याला अर्थात ‘बराक ओबामा’ यांना त्या पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय सामान्य होती आणि त्यांनी चालवलेली गाडी इतकी जुनी होती की, गाडीच्या फ्लोअरबोर्डला चार-इंचाचा डेन्ट पडलेला होता. बराक ओबामा भविष्यात काही मोठी कमाई करू शकतील अशी शंका असली तरीही भविष्यातील मिसेस ओबामा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या…हेच त्या नात्यांचे सौंदर्य आहे.

संघर्षाच्या काळात जोडीदाराची साथ: जोखीम घ्यावी की नाही?

“बराकबरोबरचे आयुष्य कधीही कंटाळवाणे होणार नाही,” असे मिशेल ओबामा यांनी त्यांच्या २०१८ साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात ‘Becoming’ मध्ये लिहिलं आहे. परंतु, दरवेळी अशी साथ देणं योग्य ठरतं का? हल्ली अनेकांकडून भविष्याच्या तरतुदी साठी सल्ला दिला जातो. जोडीदाराकडे भविष्यासाठी ठोस दिशा नसेल तर त्याच्याबरोबर वेळ घालवणं धोकादायक ठरू शकतं असं सांगितलं जात. TikTok वरील डेटिंग कोच साब्रिना जोहार सांगतात की, अशा परिस्थितीपासून लांब राहणेच चांगले, कारण “तुम्ही केवळ एका कल्पित भविष्यावर पैज लावत असता. तुम्ही सतत त्या नात्यात गुंतून राहू नका आणि स्वतःला ‘त्याने स्वतःला सिद्ध करावे’ या मानसिकतेत अडकवू नका.” (जर मिशेल रॉबिन्सन यांनी अशाच प्रकारच्या सल्ल्याकडे लक्ष दिले असते, तर कदाचित आज मिशेल ओबामा फर्स्ट लेडी झाल्या नसत्या किंवा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही झाले नसते!)

(Photo: Twitter/@melindagates)

यशानंतर फक्त नातीच नाहीत, तर मैत्रीदेखील महत्त्वाची!

फक्त दीर्घकाळ टिकणारे प्रेमसंबंधच नव्हे, तर मैत्रीदेखील लोकांसाठी तितकीच मौल्यवान असते. प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाल्यानंतरही जुने मित्र बरोबर आहेत का, यासाठी लोक अधिक जागरूक असतात. २०१८ साली Beyoncé आणि Jay-Z यांच्या ‘Friends’ या गाण्यातही हेच प्रतिबिंबित होते. या गाण्यात त्यांनी अनेक वर्षे पाठीशी उभ्या असलेल्या मित्रांचे कौतुक केले आहे आणि नवीन, कमी विश्वासार्ह मित्रांकडे तुच्छतेने पाहिले आहे. नात्याच्या बाबतीतही मैत्री महत्त्वाची ठरते.

मेलिंडा आणि बिल गेट्स:

बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांची भेट ज्या वर्षी झाली, त्यावेळी त्या नुकत्याच मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीस लागल्या होत्या, तेव्हा गेट्स हे जगातील सर्वांत तरुण अब्जाधीश होण्याच्या उंबरठ्यावर होते. मायक्रोसॉफ्टने Internet Explorer सादर केले, राणी एलिझाबेथ II यांनी बिल गेट्स यांना ‘नाइट’ पदवी बहाल केली, Time मॅगझिनने दोघांना (बोनोसह!) त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘Person of the Year’ म्हणून गौरवले. या प्रत्येक क्षणी ते एकत्र होते. २७ वर्षांच्या संसारानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या वेळी त्यांची तीनही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.

बिल गेट्स यांची खंत: मेलिंडा यांचे कायमचे दूर जाणे

बिल गेट्स यांच्यासाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्या आयुष्यातून निघून जाण्याची खंत त्यांच्याबरोबरच्या सामाजिक कार्यामुळे थोडीफार कमी झाली असावी. २००० मध्ये त्यांनी मिळून सुरू केलेल्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनमध्ये त्या कार्यरत राहिल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षी जेव्हा मेलिंडा यांनी सहअध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या नात्याचा एक जुना आणि महत्त्वाचा दुवा तुटला. “मला वाईट वाटले की तिने दूर जाण्याचा पर्याय निवडला,” असे गेट्स यांनी द टाईम्स ऑफ लंडनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Story img Loader