सगळ्याच बाबतीत भलामोठा व्याप असलेल्या मुंबई शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही अवाढव्य आहे. एका शहराचा संपूर्ण अर्थसंकल्प जितका असतो तितका निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका वापरत असते. दरदिवशी निर्माण होणाऱ्या तब्बल सहा हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान मुंबई महानगरपालिका पेलत असते. येत्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढणार असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेने कचऱ्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी येत्या २० वर्षांकरीता कृती आराखडा तयार करण्यास या अभ्यासाची मदत होणार आहे. मुंबईच्या या कचऱ्यात नेमके असते तरी काय त्याचा आढावा…

मुंबईत दररोज किती कचरा तयार होतो?

मुंबईत दरदिवशी सुमारे ६५०० मेट्रिक टन कचरा  तयार होतो. मुंबईत २०१७ मध्ये दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९४०० मेट्रिक टन इतके होते. मात्र ओला व सुका कचरा वर्गीकरण, मोठ्या सोसायट्यांना त्यांच्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट तिथेच लावण्यासाठी त्यांना मालमत्ता करात दिलेली सवलत, राडोरोडा उचलण्यासाठी केलेली स्वतंत्र व्यवस्था अशा विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. दररोज वाहनांच्या सुमारे साडेनऊशे फेऱ्या करून हा कचरा कांजूर व देवनार येथील कचराभूमीवर नेला जातो. मात्र या कचराभूमीची क्षमता संपत आली असून तिथे साठलेले कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवणे ही भविष्यातील गरज आहे.

Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
mulund Dumping Ground Waste Processing Deadline Mumbai municipal corporation
मुलुंड क्षेपणभूमीची जून २०२५ची मुदत गाठण्यासाठी दरदिवशी १५ हजार मेट्रीक टन कचऱ्याच्या विल्हवाटीचे लक्ष्य
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Khadakpada residents in Kalyan West express displeasure over delayed waste collection
कल्याणमध्ये खडकपाडा भागात कचऱ्यांच्या ढीग, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिक नाराज
No appointment of guardian minister yet Mumbai news
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळेना

हेही वाचा >>> सुखबीर बादल यांना सुवर्ण मंदिरात शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश; कारण काय?

पालिकेच्या घनकचरा विभागाची व्याप्ती किती?

मुंबई महापालिकेचा घनकचरा विभाग हा आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या अन्य विभागांइतकाच महत्त्वाचा व अत्यावश्यक सेवा देणारा विभाग आहे. या विभागासाठी वार्षिक तब्बल पाच हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात येत असून या विभागाच्या कामाची व्याप्तीही प्रचंड मोठी आहे. वर्षाचे ३६५ दिवस, चोवीस तास अखंड हा विभाग कार्यरत असतो. मुंबईत सव्वाकोटीची अचल लोकसंख्या आणि दररोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची सुमारे ५० लाखापर्यंतची चल लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभाग पार पाडत असतो. पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी असे मिळून सुमारे ४४ हजार कामगार तीन पाळ्यांमध्ये या विभागात काम करतात. सर्वाधिक कामगार असलेला हा विभाग आहे. सकाळी साडेसहा वाजता कामाला सुरुवात करून दररोज सुमारे २८०० किमी लांबीचे रस्ते व गल्ल्या हे कर्मचारी सकाळीच स्वच्छ करतात. घरोघरी कचरा संकलन करून त्याचे वर्गीकरण करून हा कचरा बंद वाहनांमधून पूर्व उपनगरातील कचराभूमीवर नेला जात असतो. तब्बल सहा हजार विविध प्रकारची वाहने, हजारो कचरा पेट्या, ४६ कचरा वर्गीकरण केंद्रे, चार ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे अशी मोठी व्याप्ती या विभागाची आहे. कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प, दैनंदिन नियोजन आणि कामगारांचे पगार असा भांडवली व महसुली खर्च मिळून तब्बल पाच ते साडेपाच हजार कोटींचा निधी या विभागासाठी प्रस्तावित करावा लागतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मार्शल लॉ’ जारी करणाऱ्या अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात! दक्षिण कोरियात नेमके काय घडले?

मुंबईच्या कचऱ्यात काय काय असते?

प्रत्येक शहरातील कचऱ्याचीही वेगळी ओळख असते. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून इथे मोठमोठ्या कंपन्या, मोठ्या संख्येने दुकानदार, फेरीवाले, उपाहारगृहे, हॉटेल, खाऊगल्ल्या, झोपडपट्टया, उच्चभ्रू इमारती आहेत. रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये सुमारे ७२ टक्के ओला कचरा विशेषतः स्वयंपाकघरातील कचऱ्याचा समावेश असतो. त्यात भाज्यांचा, फळांचा कचरा याचाही समावेश असतो. तसेच गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॅनिटरी नॅपकीन अशा प्रकारच्या कचऱ्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात किंवा सणावाराला या कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढते. हॉटेल व्यवसायामुळे ओल्या कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

कचऱ्याच्या अभ्यासाची गरज काय ?

मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना, प्रकल्प, मोहिमा राबवल्या. मात्र तरीही कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’च आहे.  पालिकेच्या कचराभूमीची क्षमताही आता संपत आली असून या कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी अद्याप ठोस यंत्रणा उभी राहिलेली नाही. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट नियोजनबद्ध पद्धतीने करून घनकचरा शून्यावर आणण्याकरीता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता कचऱ्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आहे. हे प्रमाण कमी करण्यात यश आलेले असले तरी कचराभूमीवर नेण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची गरज आहे. तसेच मुंबईत कोणत्या विभागातून जास्त कचरा निर्माण होतो, कोणत्या प्रकारचा कचरा कोणत्या विभागात जास्त निर्माण होतो हे समजल्यास त्या दृष्टीने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रयत्न करता येतील. रुग्णालयांची संख्या अधिक असलेल्या भागात घातक असा जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. वसाहतींमध्ये जास्त कचरा असतो, तर नरिमन पॉईंट, बीकेसीसारख्या व्यावसायिक विभागातील सुट्टीच्या दिवशी कचरा कमी असतो, दादरसारख्या भागात रस्त्यावरचा कचरा, भाज्या, फुलांचा कचरा खूपच असतो, खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सुका कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो, पावसाळ्यात चौपाटी परिसरात अधिक कचरा असतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

विल्हेवाटीसाठी सध्याचे प्रकल्प कोणते?

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार अशा दोनच कचराभूमी आहेत. गोराई कचराभूमी बंद करण्यात आली आहे. तर मुलुंड कचराभूमीवर कचरा टाकणे बंद करण्यात आले असून तेथे कचऱ्याच्या  विल्हेवाटीचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. तसेच देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. तर मुंबईत ठिकठिकाणी निर्माण होणाऱ्या राडारोड्याची (डेब्रीज) विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई दोन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

Story img Loader