युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये राजेशाही हा एक अविभाज्य घटक आहे. राजघराण्याशी संबंधित प्रतिमा, प्रतीके आणि रॉयल सायफर म्हणजे राणी वा राजाच्या आद्याक्षरांच्या चिन्हाचा वापर जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये गुंफलेला आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.

ध्वज आणि संकेत

इंग्लंडमधल्या सगळ्या पोलिस स्थानकांमध्ये, नौदलाच्या जहाजांवर, शासकीय कार्यालयांवर जो ध्वज फडकावला जातो त्यावर ‘EIIR’ हे रॉयल सायफर किंवा राणीची आद्याक्षरं लिहिलेली असतात. ब्रिटिश सैन्यही ही आद्याक्षरं सोनेरी अक्षरात लिहिलेले ध्वज दिमाखात फडकावतं. राष्ट्रकुलातले ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश राणीच्या भेटीदरम्यान ‘E Flag’ फडकावत असत.

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या ध्वजामध्ये अर्धा हिस्सा इंग्लंडचं तर उर्वरीत प्रत्येकी पाव हिस्सा स्कॉटलंड व आयर्लंडचं प्रतिनिधित्व करतो, यातही आता बदल होणं शक्य आहे. नवीन राजा कदाचित ध्वजामध्ये वेल्सचाही समावेश करू शकतो असं गार्डियननं म्हटलं आहे.

विश्लेषण: इंग्लंडमध्ये बंदूक गुन्ह्यांचे चिंताजनक वाढते प्रमाण!

ब्रिटिशांचं राष्ट्रगीत

बिटनच्या राष्ट्रगीतात “God save our gracious Queen” हे शब्द आहेत, जे आता बदलून “God save our gracious King” असे केले जातील. सतराव्या शतकापासून प्रचलित “God Save the King” या दिशेने पुन्हा हा प्रवास होणार आहे. सध्याचं राष्ट्रगीत १७४५ पासून गायलं जात असून मूळ गीतामध्ये वाक्य होतं “God save great George our king, Long live our noble king, God save the king.” हा बदल लगेच व इतक्या सरळ होईल का? ब्रिटिश जनता सार्वजनिक समारंभांमध्ये राष्ट्रगीत गाताना हा बदल लगेच स्वीकारतील का? हे बघावं लागेल, याकडे गार्डियननं लक्ष वेधलं आहे.

युनायटेड किंगडमचं चलन

ब्रिटनच्या चलनावर राणीचं चित्र आहे. सध्या ४.५ अब्ज इतक्या नोटा वापरात आहेत, ज्याचं मूल्य ८० अब्ज पौंडांच्या घरात आहे. या नोटा बदलाव्या लागतील आणि ही प्रक्रिया अनेक वर्षं चालेल. १९६० पासून राणीचं चित्र नोटांवर छापण्यात येत असून राष्ट्रकुलातील काही देशांच्या चलनावरही तिची छबी आहे. काही नाण्यांवरही राणीची छबी असून ही नाणी बदलण्यास मात्र कागदी नोटांपेक्षा जास्त काळ लागेल हे उघड आहे.

विश्लेषण : राणी एलिझाबेथ कालवश… पुढे काय होणार?

टपालपेट्यांचं काय होणार?

रॉयल मेल पोस्ट बॉक्सेसवर ‘ER’ ही क्वीन एलिझाबेथची आद्याक्षरं आहेत. ब्रिटनमधल्या प्रसारमाध्यमांच्या दाव्यानुसार या टपालपेट्या अशाच राहतील. गार्डियननं सोदाहरण दाखवलंय की काही टपाल पेट्या ‘GR’ ही किंग जॉर्ज सहावा याची आद्याक्षरं मिरवत आहेत. पोस्टाच्या तिकिटांवर मात्र आता राणीचं नाही तर नव्या राजाचं छायाचित्र दिसेल.

“कुठलाही राजमुकुट काटेरी असतो आणि तो…”, राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना आदरांजली!

राणीच्या नावे प्रतिज्ञा

ब्रिटनमधील सगळ्या खासदारांना राजमुकुटाशी प्रतिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. देवाच्या नावे शपथ घेऊन राणी व तिच्या वारशांप्रती निष्ठावान राहू अशी प्रतिज्ञा खासदारांना घ्यावी लागते. यातही आता बदल होईल. दोन्ही सभागृहातल्या खासदारांना आता नव्या राजाच्या, अर्थात किंग चार्ल्स यांच्या नावे प्रतिज्ञा घ्यावी लागणार आहे. तसेच इंग्लंडचे नवे नागरिक, सैन्यदलातील जवान आदींना राणीच्या नाही तर राजाच्या चरणी निष्ठा वाहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल.