खाणीत हिरे सापडतात हे आपण ऐकून होतो. पण आता चक्क प्रयोगशाळेत कृत्रीम मानवनिर्मित हिरे बनविण्यात येणार आहेत. संसदेत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मानवनिर्मित कृत्रीम हिऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आयआयटीला अनुदान देणार असल्याची घोषणा केली. प्रयोगशाळेत बनविण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या बाजारात सध्या तेजी असल्यामुळे या क्षेत्राची वाढ करण्यासाठी हे अनुदान देण्यात आलेले आहे. जेणेकरुन असे हिरे बनविणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात येईल.

हिरे बनविणाऱ्या प्रयोगशाळांना तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे, त्यासाठीच आयआयटीला अनुदान दिल्याचे सांगितले जात आहे. आयआयटीशिवाय दुसरी कोणतीही संस्था हे काम करु शकत नाही. प्रयोगशाळेत लागणाऱ्या उपकरणावरील आयात कर कमी करावा किंवा तो शून्यावर आणावा, अशी मागणी हिरे व्यापाऱ्यांनी अर्थमंत्री सीतारमण यांना केली होती. त्यामुळे आता जर आयआयटीच अशी उपकरणे आणि स्वदेशी प्रयोगशाळा बनवत असेल तर परदेशातून उपकरणे आयात करण्याची गरज भासणार नाही.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
unique information, exhibition hall, State Excise Department
१८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती
AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!

प्रयोगशाळेत हिरे कसे बनवतात?

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हिरे हे खऱ्या हिऱ्यासारखेच दिसतात. प्रयोगशाळेत हिरे बनविण्याच्या पद्धतीला Lab Grown Diamonds म्हणतात. यालाच आर्टिफिशियल डायमंड देखील म्हणतात. जमिनीखाली कार्बनचे अनेक अणू एकत्र येऊन त्यांच्यावर उच्च तापमान आणि दाब पडतो, तेव्हा त्यातून हिरा बनतो. आता प्रयोगशाळेत ही प्रक्रिया रासायनिक स्वरुपात निर्माण केली जाणार आहे. खाणीतून हिरे काढण्यासाठी वेळेची खूप हानी होते. खाण खोदण्यासाठी झाडांची कत्तल करावी लागते, शेकडो मजुरांची कामाला जुंपावे लागते. त्यानंतरही हिरे सापडतील, याची काही शाश्वती नसते. अशावेळी प्रयोगशाळेत जर यशस्वीरित्या हिऱ्यांचे उत्पादन केले, तर या क्षेत्राला मोठी उभारी मिळेल.

प्रयोगशाळेत हिरे तयार करण्याची पहिली आणि सर्वात स्वस्त पद्धत म्हणजे, “उच्च तापमान आणि उच्च दाब (HPHT)” या पद्धतीच्या नावानुसारच याचा वापर होतो. हिरा तयार करण्यासाठी ग्रॅफाईटचा वापर बियाणांसारखा केला जोता. ज्याला किमान १५०० अशं सेल्सियस तापमानात ठेवले जाते आणि त्यावर ७ लाख ३० हजार PSI (Pound-force per square inch) पर्यंत दाब दिला जातो. या प्रक्रियेनंतर एका साधारण कार्बनचे महागड्या कार्बनमध्ये अर्था हिऱ्यात रुपांतर होते. दुसऱ्या पद्धतीमध्ये केमिकल व्हेपर डिपॉझिशन (CVD) ही पद्धत वापरली जाते.

भारत बनणार कृत्रीम हिऱ्यांचा हब

भारतात प्रयोगशाळेत बनणाऱ्या हिऱ्यांचे मार्केट वाढत आहे. सर्वात आधी २००४ साली प्रयोगशाळेत हिरा बनविला गेला होता. याचे श्रेय भथवारी टेक्नॉलॉजीला जाते. या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रयोगशाळेत हिरे बनविले जात होते. भारताला आता या क्षेत्रात अधिक पुढे जायचे आहे. एलाईड मार्केट रिसर्चच्या माहितीनुसार २०२१ ते २०२० पर्यंत प्रयोगशाळेत बनविण्यात येणाऱ्या हिऱ्यांचा मार्केटमध्ये वर्षाला नऊ टक्क्यांची वाढ होऊ शकते. २०३० पर्यंत हिऱ्यांचे हे मार्केट चार लाख कोटींचे झालेले असेल, असाही अंदाज वर्तिवण्यात येत आहे.

पृथ्वीरील नैसर्गिक हिऱ्यांचा साठा संपुष्टात येत असल्याने प्रयोगशाळेतील हिऱ्यांना आता महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणेच प्रयोगशाळेतील कृत्रीम हिऱ्यांना देखील पॉलिश आणि पैलू पाडण्याचे काम केले जाते. ज्यामुळे हिऱ्यांना विशिष्टप्रकारची चमक प्राप्त होते.