मंगल हनवते

ठाणे, पुणे आणि नवी मुंबईतून पूर्वमुक्त मार्गाने (ईस्टर्न फ्री-वे) मुंबईत येताना चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रवास केवळ २० ते २५ मिनिटांत पार होतो. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर पी. डिमेलो रस्त्यावरील ऑरेंज गेट येथे प्रचंड वाहन कोंडीला सामोरे जावे लागते. नरिमन पॉइंटला जाण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागतो. वाहनचालकांचा हा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट अशा भुयारी मार्गाचा पर्याय पुढे आणला आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट हे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता येणार आहे. या मार्गामुळे चेंबूर ते नरिमन पॉइंट प्रवास थेट आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येणार आहे. वाहनचालकांचा प्रवास सुकर करणारा हा भुयारी मार्ग कसा असेल याचा आढावा…

mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय काय?

जागतिक स्तरावरील महत्त्वाचे शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जात असले तरी मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. गेली २५-३० वर्षे हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध सरकारी यंत्रणा वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मेट्रो, उड्डाणपूल, उन्नत रस्ते, सागरी मार्ग, सागरी सेतू, द्रुतगती महामार्ग, भुयारी मार्ग असे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र त्यानंतरही मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटताना दिसत नाही. त्यामुळे आता मेट्रो आणि रस्त्यांचे जाळे वाढविले जात आहे. याचाच भाग म्हणून पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. सीएसटीच्या बाजूने ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्गाच्या माध्यमातून पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्यात येत आहे.

विश्लेषण: ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र म्हणजे काय?

पूर्वमुक्त मार्ग प्रकल्प नेमका कसा आहे?

ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने एमएमआरडीएने चेंबूर ते पी. डिमेलो रोड असा पूर्वमुक्त मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४३६ कोटी रुपये खर्च करून १६.८ किमीचा पूर्वमुक्त मार्ग एमएमआरडीएने बांधला. टप्प्याटप्प्यात या प्रकल्पाचे काम करण्यात आले. त्यानुसार १२ जून २०१३ रोजी पी. डिमेलो रस्ता ते चेंबूरच्या पांजरपोळापर्यंतचा १३.५९ किमी लांबीचा टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. तर १६ जून २०१४ रोजी उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले. संपूर्ण १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग वापरात आला. पूर्णपणे नियंत्रित असलेला हा मार्ग खुला झाल्याने चेंबूर ते सीएसटी प्रवासात मोठ्या प्रमाणात वेळेची कपात होऊ लागली. या मार्गावरून आजच्या घडीला मोठ्या संख्येने वाहने धावत असून वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग मानला जातो. आता या मार्गाचा विस्तार होणार आहे.

पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार कसा होणार?

पूर्वमुक्त मार्गामुळे चेंबूर ते सीएसटी प्रवासाचा वेग वाढला आहे. मात्र चेंबूरवरून पुढे ठाण्याला जाण्यासाठी तसेच पी. डिमेलो रस्त्यावरून नरिमन पॉइंटला जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांचा त्रास दूर करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे चेंबूर, छेडानगर ते ठाणे आणि पी. डिमेलो रस्ता, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असा विस्तार होणार आहे. ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असा विस्तार भुयारी मार्गाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग कसा असेल?

पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग एकूण ३.५ किमी लांबीचा आहे. चार मार्गिकांचा हा मार्ग असून त्यासाठी ४५०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. पूर्वमुक्त मार्ग येथील चिंचबंदर रेल्वे ओलांडणी पुलाच्या पूर्वेकडून भुयारी मार्ग सुरू होईल. पुढे सरदार वल्लभभाई पटेल रस्त्यावरून हार्बर आणि मध्य रेल्वे मार्ग ओलांडून, मोहम्मद अली रस्ता, पठ्ठे बापूराव मार्ग, राजा राजमोहन मार्ग, विठ्ठलभाई पटेल रस्ता, न्यू क्वीन रस्ता, पश्चिम रेल्वेवरील वरेकर रेल्वे पूल ओलांडून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग येथे दक्षिण दिशेला आणि पश्चिम दिशेला नेपियनसी रस्ता ओलांडून सागरी किनारा मार्ग प्रकल्पास जोडण्यात येणार आहे.

विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट प्रवास केवळ पाच मिनिटांत कधी होणार?

ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग प्रकल्प आता मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तसेच सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी मे. बिवर इन्फ्रा कन्सल्टंट प्रा.लि. आणि मे. पडॅको कंपनी, जपान यांच्या निविदा सादर झाल्या होत्या. यात जपानच्या पडॅको कंपनीने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या कार्यकारी समितीच्या १५३व्या बैठकीत या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जपानच्या या सल्लागार कंपनीकडून आता चार महिन्यांत प्रकल्पाचा आराखडा सादर होईल. आराखडा मंजूर झाल्यानंतर कामास सुरुवात होईल. त्यासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल.

साधारण जून – जुलै २०२३ मध्ये कामास सुरूवात होईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे २०२५ अखेर हा भुयारी मार्ग सेवेत दाखल होईल आणि ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंटदरम्यान प्रवासाचा कालावधी पाच मिनिटे होईल. या प्रकल्पामुळे चेंबूर ते नरिमन पॉइंट अंतर केवळ ३० ते ३५ मिनिटांत पार करता येईल. पुढे हा मार्ग नरिमन पॉइंटवरून मुंबई महानगरपालिकेच्या सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात पोहोचणे वाहनचालकांसाठी सोपे होईल.