History of chess in India: अलीकडेच ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजूने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत बुद्धीबळातील जगज्जेतेपद खेचून आणले. हा केवळ त्याचा विजय नाही तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा बुद्धिबळाच्या जन्मभूमीकडे जगज्जेतेपद परतले आहे. जागतिक पातळीवर बुद्धिबळाचे जन्मस्थान भारत असे मानले जरी जात असले तरी चीनकडून मात्र या खेळाचे जन्मस्थान चीनमध्येच असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे, त्याच पार्श्वभूमीवर या खेळाची नक्की जन्मभूमी कोणती? याचा घेतलेला हा आढावा! नशिबावरही मात करता येऊ शकते, हे शिकवणारा एकमेव खेळ म्हणजे बुद्धिबळ. केवळ बुद्धी आणि तंत्रकौशल्याच्या बळावर या खेळात यश मिळवता येते. म्हणूनच अगदी प्राचीन कालखंडापासून या खेळाचे बाळकडू देण्याची परंपरा भारतात होती. चतुरंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाने पर्शिया (इराण), अरेबिया, युरोप असा दीर्घ प्रवास करत आजचे आधुनिक स्वरूप प्राप्त केले आहे. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स, ऑक्सफर्डचे टॉमस हाइड तसेच मरी, स्टॉन्टन इ. अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम भारतातच झाल्याचे त्यांच्या संशोधनातून दाखवून दिले आहे. डॅनियल किंग यांनी त्यांच्या सुलतान खान या पुस्तकात १९२९ च्या ब्रिटिश चेस मॅगझिनचा संदर्भ दिला आहे. ब्रिटिश चेस मॅगझिनच्या अहवालातही भारताला बुद्धिबळाची भूमी असे संबोधले आहे. त्यामुळेच भारतातील बुद्धिबळाचे प्राचीन पुरावे काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

अधिक वाचा: History of Wrestling: कुस्तीचे मूळ इराणचे? की भारतातील?

Trump wants Ukraine minerals reason (1)
युक्रेनमधील ‘या’ खजिन्यावर ट्रम्प यांची नजर, लष्करी मदतीच्या बदल्यात केली मागणी; कारण काय?
Ranveer Allahbadias comments obscene
अश्लील वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियाला शिक्षा होणार? कायदा काय…
pm modi trump visit
मोदींचा अमेरिका दौरा भारतासाठी किती महत्त्वाचा? ट्रम्प यांच्याशी कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा?
Who named planet 'Earth'_
पृथ्वीला इंग्रजीत ‘Earth’ हे नाव कोणी दिले? या नावाच्या व्युत्पत्तीचा इतिहास नेमकं काय सांगतो?
History of Yesubai Saheb
Chhaava: कुलमुखत्यार ‘येसूबाईंचा’ दुर्लक्षित इतिहास नेमकं काय सांगतो?
leopard killing increased in pakistan
पाकिस्तानातही होतेय बिबट्यांची बेसुमार हत्या; काय आहेत कारणं?
gujarat disturbed areas act
मुस्लिमांना मालमत्ता विकण्यास हिंदूंना बंदी; गुजरातमधील ‘डिस्टर्ब्ड एरिया अ‍ॅक्ट’ काय आहे?
bmc declared 15 year old building in andheri dangerous
मजबूत इमारतीही ‘धोकादायक’ घोषित का होतात? महापालिकेचे नेमके निकष काय असतात?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला? नेमकी कारणे कोणती?

बुद्धिबळाचा जन्म: चतुरंग ते शतरंज

भारतीय इतिहासात कुठल्याही गोष्टीची पाळंमुळं शोधताना आपल्याला सिंधू संस्कृतीत डोकावून पाहावे लागते. बुद्धिबळ या खेळाचा इतिहास सिंधू संस्कृतीच्या इतिहासाइतका प्राचीन असल्याचे अभ्यासक मानतात. या संस्कृतीच्या स्थळांवर झालेल्या उत्खननात फलकावर सोंगट्या मांडून खेळले जाणारे खेळ अस्तित्त्वात होते, याचे पुरावे सापडले आहेत. ‘अ हिस्टरी ऑफ चेस: फ्रॉम चतुरंग टू द प्रेझेंट डे’ या पुस्तकात युरी आवेरबाख यांनी या खेळाचे संदर्भ वेदांमध्ये सापडतात असे म्हटले आहे. सिंहासन बत्तिशी व काही पुराणांतही या खेळाचे उल्लेख सापडतात. बाणाने लिहिलेल्या हर्षचरित्रात (इ.स. ६२५) या खेळाच्या प्राचीन स्वरूपाचे वर्णन करण्यात आलेले आहे. हा खेळ ८×८ पटलावर-बोर्डवर खेळला जात होता. या खेळाच्या विकासाची सुरुवात अष्टापदापासून झाली असे अभ्यासक मानतात. सुरुवातीला या खेळात फासे वापरले जात होते.

चतुरंग

ना. रा. वडनप यांनी चतुरंगाची सविस्तर माहिती दिली आहे. ‘चतुरंग या प्राचीन खेळात चार खेळाडू आणि चार रंगांच्या (काळा, हिरवा, तांबडा व पिवळा) सोंगट्या असत. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका आणि चार प्यादी अशा आठ सोंगट्या असत. पटात चौसष्ट घरे असत. चार खेळाडूंपैकी एकमेकांसमोरचे खेळाडू भागीदार होऊन त्यांच्याकडे हिरव्या-काळ्या आणि तांबड्या -पिवळ्या सोंगट्या येत. पटाच्या चार कोपऱ्यांमध्ये पहिल्या ओळीत राजा, हत्ती, घोडा, नौका किंवा रथ व पुढच्या ओळीत समोर चार प्यादी अशी मांडणी करून, फासे टाकून खेळत असत. राजा, हत्ती, घोडा, नौका आणि प्यादी यांना अनुक्रमे ५,४,३,२, व १ असे गुण दिले जात. दान पडेल त्याप्रमाणे प्यादे, हत्ती, घोडा किंवा नौका (रथ) यांची खेळी असे. घोडा, हत्ती, राजा यांच्या चाली सध्याच्या बुद्धिबळाप्रमाणेच होत्या. रथ किंवा नौका किंवा उंट या मोहऱ्याची चालही तिरपी असे, परंतु ते उडी मारून दोनच घरे जात असे. या सर्व खेळी दान पडेल त्याप्रमाणे खेळावयाच्या असल्याने हळूहळू हा खेळ पूर्णपणे द्यूतमय होऊ लागला. याला ‘अष्टपद’ किंवा ‘अष्टक्रीडा’ असेही म्हणत असत.’

चतुरंग आणि जुगार

चतुरंग या खेळाचा उल्लेख संस्कृत, पाली आणि इतर बौद्ध वाङ्मयातही सापडतो. सुरुवातीला या खेळात द्युताप्रमाणे फासे वापरले जात होते. कालांतराने खेळाचे स्वरूप युद्धभूमीत परिवर्तीत झाले. या खेळात प्रतिस्पर्ध्याच्या राजाला पकडल्याशिवाय विजय मिळवता येत नव्हता. महाभारतात फाशांच्या खेळाचा ‘द्यूताचा’ संदर्भ आहे. कधीकाळी चतुरंगाचा संबंध हा जुगाराशी जोडला गेला होता. यात संपत्तीपासून अवयवांपर्यंत सारे काही पणाला लावले जात होते. याच कारणामुळे उत्तर भारतातील काही भागांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती. प्रत्यक्षात हा युद्धनीतिचा खेळ राजकुमार आणि राजांना लष्करी डावपेच शिकवण्यासाठी खेळला जात होता, कालांतराने त्याला जुगाराचे स्वरूप आले.

बौद्धिक कौशल्यास प्राधान्य

१० व्या शतकात भारतास भेट देऊ गेलेल्या अल्-मसूदीने भारतातील बुद्धिबळाचे वर्णन केले आहे. या खेळादरम्यान संपत्ती, अगदी शारीरिक अवयव पणाला लावण्याची पद्धत असल्याचे त्याने म्हटले आहे. महाभारतातील संदर्भानुसार द्यूतात फासे वापरल्यामुळे नळ आणि युधिष्ठिर हरले आणि नशिबी आत्यंतिक परिस्थिती आली. त्यामुळेच अखेरीस चतुरंगामधून फासे वापर रद्द करण्यात आला आणि खेळ पूर्णतः कौशल्यावर आधारित झाला. कडक राजकीय निर्बंधामुळे चतुरंगामधून फाशांचे उच्चाटन करण्यात आले. चौघांऐवजी हा खेळ दोघांमध्ये खेळला जाऊ लागला. प्रत्येकाचे दोन हत्ती, दोन रथ , दोन घोडे, एक राजा, एक वजीर व आठ प्यादी असे चतुरंगाचे बुद्धिबळामध्ये परिवर्तन साधारणपणे सहाव्या-सातव्या शतकात घडले असावे. मात्र खेळाचे नाव चतुरंग हेच राहिले. मोहऱ्यांच्या आणि प्याद्यांच्या हालचालीही निश्चित करण्यात आल्या, फासे वापरण्यावर बंदी आल्याने खेळातील दैवाधीनता संपुष्टात येऊन केवळ बौद्धिक कौशल्यासच प्राधान्य आले.

पारसी आणि अरबी परंपरा

नंतरच्या कालखंडात या खेळात अनेक परिवर्तने घडून आली. मुघल शासनकर्ते या खेळाचे चाहते होते. ब्रिटिश बुद्धिबळ इतिहासकार एच.जे.आर. मरे यांनी त्यांच्या अ हिस्टरी ऑफ चेस या पुस्तकात म्हटले आहे की, हा खेळ प्रथम पारसिकांनी (इराणी) स्वीकारला, नंतर मुस्लिम जगात प्रसारित झाला आणि अखेरीस ख्रिश्चन युरोपात पोहोचला. पारसीमध्ये चतुरंगचे रूपांतर चत्रंग किंवा शत्रंज, छतरंग या नावाने झाले. तर अरबीमध्ये ‘शतरंज’, मलायीत ‘छतोर’, मंगोलमध्ये ‘शतर’ असे झाले. पारसी आणि अरबी परंपराही भारताला बुद्धिबळाची जन्मभूमी मानतात.

An illustration from a Persian manuscript “A treatise on chess” (Source: Wikipedia)
पर्शियन हस्तलिखितातील लघुचित्र (स्रोत: विकिपीडिया)

चीन जन्मभूमी असल्याचा दावा

परंतु, अमेरिकन लेखक डेव्हिड शेंक यांनी द इमॉर्टल गेम: अ हिस्टरी ऑफ चेस या पुस्तकात सुचवले आहे की, बुद्धिबळ कदाचित चीनमधून प्रसारित झाला असावा. ते असा युक्तिवाद करतात की, हा खेळ सिल्क रोडवर विकसित झाला. रेशीम मार्गावर केवळ दालचिनी, मिरी आणि रेशीम यांसारख्या वस्तूंची देवाणघेवाणच केली नाही तर सांस्कृतिक प्रथा आणि विरंगुळ्यांचेही आदानप्रदान झाले. मात्र, चतुरंग आणि शतरंजने या प्रदेशातील पूर्वीच्या बोर्ड गेम्सपासून वेगळेपण दर्शवले. कारण या खेळांमध्ये फासे किंवा इतर कोणतीही नशीबावर आधारित साधने नव्हती, असे शेंक नमूद करतात.

अधिक वाचा: १२ महिने, ३६५ दिवस; कॅलेंडरचं हे स्वरुप कोणी ठरवलं?

आशियामध्ये अशा प्रकारचे खेळ आजही खेळले जातात. त्यात बर्मी सिट्निन, मलेशियन चाटोर, तिबेटी चंदराकी, चिनी सिआंग की, कोरियन त्ज्यांग केई आणि जपानी शो-गी यांचा समावेश होतो. एकूणच चीनने बुद्धिबळाची मुळे त्यांच्या प्राचीन संस्कृतीत असल्याचा दावा केला आहे. यासाठी ते झियांगकी-xiangqi (चिनी बुद्धिबळ) नावाच्या प्राचीन खेळाचा दाखला देतात. हा खेळ भारताच्या चतुरंग या खेळापूर्वीच अस्तित्त्वात असल्याचा दावा करण्यात येतो. इसवी सनपूर्व चौथ्या ते दुसऱ्या या कालखंडात हा खेळ अस्तित्त्वात असल्याचे चिनी ऐतिहासिक पुरावे सूचित करतात. त्या काळातील खेळाचे नियम आणि रचना आधुनिक बुद्धिबळापेक्षा वेगळी असली तरी चौरस फलक, सैनिकी थीम असलेले मोहरे आधुनिक बुद्धिबळाशी साम्य दर्शवतात. चिनी उगम सिद्धांताचे समर्थक या प्राचीन चिनी खेळांच्या घडणीत कन्फ्यूशियन तत्त्वज्ञान आणि लष्करी रणनीतिच्या भूमिकेवर भर देतात.

झियांगकी आणि चतुरंग

जरी xiangqi हा एक प्राचीन आणि प्रगत खेळ असला तरी ऐतिहासिक पुरावे बुद्धिबळाचा उगम भारतात असल्याचे स्पष्टपणे दर्शवतात. बुद्धिबळासारख्या खेळाचा सर्वात जुना ठोस संदर्भ भारतातील चतुरंग या खेळामध्ये सापडतो. चतुरंग म्हणजे चार अंग (पायदळ, अश्वदळ, हत्ती, आणि रथ) होय. हा खेळ आधुनिक बुद्धिबळाच्या रचना आणि रणनीतिशी थेट संबंधित आहे. बुद्धिबळाचा भारतातून पर्शियामध्ये त्यानंतर अरब जगत आणि युरोपात प्रसार झाल्याचे पुरावे आहेत. पर्शियन ग्रंथ शाहनामे यामध्ये बुद्धिबळ पर्शियामध्ये भारतीय राजाकडून भेट म्हणून आल्याचे वर्णन आहे, त्यामुळे याचा भारतीय उगम असल्याचा दावा अधिक मजबूत होतो.

मध्ययुगात युरोपात दाखल

पर्शियातून हा खेळ इस्लामिक सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून मध्ययुगीन काळात युरोपात पसरला. याच्या उलट xiangqi स्वतंत्रपणे चीनमध्ये विकसित झाला असून त्याची रचना पूर्णपणे वेगळी आहे. या खेळात फलकावर नदी असते जी त्या फलकाचे विभाजन करते, तसेच त्याचे नियम वेगळे आहेत. xiangqi आणि बुद्धिबळामध्ये वरवरचे साम्य असले तरी त्यांचा विकासाचा मार्ग वेगळा आहे असे तज्ज्ञ सांगतात. किंबहुना xiangqi ने भारतातील बुद्धिबळाच्या विकासावर किंवा इतर प्रदेशांमध्ये त्याच्या प्रसारावर प्रभाव टाकला असे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. या खेळाचा चिनी उगम असलेल्या सिद्धांताचे समर्थक चौरस फलक, सैनिकी थीम असलेले मोहरे आणि चतुरंगपूर्वीच्या अस्तित्त्वाचे दाखले देऊन बुद्धिबळाचे जन्मस्थान चीन असल्याचा दावा करतात. त्यांचा हा तर्क खरा मानला तर एक गोष्ट विसरून चालत नाही ती म्हणजे सोंगट्यांसह चौरस फलकावर खेळल्या जाणाऱ्या खेळाचे पुरावे सिंधू संस्कृतीच्या स्थळांवर सापडले आहेत. ज्यांचा कालखंड जवळपास झियांगकी पेक्षा १०००-१२०० वर्ष प्राचीन आहे.

बुद्धिबळाच्या पुनरुज्जीवनाचा काळ

१५ व्या शतकाच्या उत्तरार्धात परिवर्तनशील काळ सुरू झाला. नवीन तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पाश्चात्त्य युरोपमध्ये पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला. याच वेळी बुद्धिबळामध्ये मोठे बदल झाले. विशेषतः उंटाच्या (बिशप) आणि राणी किंवा वजिराच्या हालचालीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. नवीन नियम बदलांमुळे बुद्धिबळ अधिक गतिमान आणि गुंतागुंतीचा खेळ झाला. मरे म्हणतात की, “बुद्धिबळाच्या सुधारित स्वरूपाने कदाचित या खेळाला विस्मृतीत जाण्यापासून वाचवले असावे.” बुद्धिबळाच्या खेळावर पहिले पुस्तक १५७४ मध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हापासून आजपावेतो या खेळावर विपुल ग्रंथनिर्मिती झाली आहे, जी अन्य कोठल्याही इतर खेळावर झाल्याचे दिसून येत नाही. याच सुमारास फ्रेंच, जर्मन व रशियन भाषांतही अनेक पुस्तके लिहिली गेली.

अधिक वाचा: Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?

दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असलेल्या त्रिवेंगडाचार्यानी बुद्धिबळावर संस्कृतमध्ये विलासमणिमन्जरी नामक ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी या खेळाचे पाश्चात्य, चिनी तसेच दाक्षिणात्य, कर्नाटक, मिश्र कर्नाटक महाविलास (१० ×१० म्हणजेच १०० घरांचा पट) इ. प्रकारांचा तौलनिक परामर्श घेतला आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर एम्.डी. क्रूझ यांनी १८१४ मध्ये प्रसिद्ध केले. १८५० पासून बुद्धिबळावरील मराठी, बंगाली, उर्दू आणि हिंदी यांसारख्या विविध भारतीय भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित होऊ लागली. त्याच वेळी १८३३ पासून सुरू झालेल्या पहिल्या भारतीय वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे बुद्धिबळाचे स्तंभ प्रकाशित होऊ लागले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस पाश्चात्य बुद्धिबळ नियमांनुसार स्पर्धा अधिक नियमित होत होत्या.

राष्ट्रीय जाणीव वाढू लागल्यावर भारतीयांनी स्वतःच्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. पहिली ‘अखिल भारतीय’ स्पर्धा १९०९ साली मुंबईतील बीमन बुद्धिबळ क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. १९२४ साली विनायक काशिनाथ खाडिलकर हे ब्रिटिश बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणारे पहिले भारतीय ठरले. सुरुवातीस अपयश आले तरी त्यांनी १९२० सालाचे ब्रिटिश चॅम्पियन आरएचव्ही स्कॉट यांच्यासह अनेक नामांकित प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. सुरुवातीच्या अडथळ्यांनंतरही त्यांचे हे प्रदर्शन जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिबळासाठी एक मोठे यश होते.

Story img Loader