ख्रिस्तियन एरिक्सन मंगळवारी (२२ नोव्हेंबर) त्यांच्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात डॅनिश संघाच्या मिडफिल्डच्या मध्यभागी खेळला. दीड वर्षापूर्वी, कोपनहेगनमध्ये फिनलंड विरुद्ध डेन्मार्कच्या युरो २०२० च्या पहिल्या सामन्यादरम्यान तो मैदानावर कोसळला होता. टीम डॉक्टर मॉर्टन बोसेन यांच्या म्हणण्यानुसार, काही मिनिटांसाठी त्याने जीव गमावला होता मात्र हृदयाच्या पुनरुत्थानानंतर त्याला पुनर्जीवित करण्यात यश आले. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि या प्रसंगाने जगभरातील चाहते थक्क झाले होते. जागतिक दर्जाच्या खेळाडूंना त्यांच्या आयुष्याच्या उमेदीच्या काळात अशा आजाराने ग्रासणे हे बरोबर नाही असे वाटून अनेकजण चिंताग्रस्त झाले होते. त्या दुर्दैवी दिवशी नेमके काय घडले होते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एरिक्सनचा गेलेला जीव अक्षरशः कसा परतला हे आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगतो.

त्या दिवशी नेमके काय झाले होते?

२९ वर्षांचा एरिक्सन, डाव्या मिडफिल्डमध्ये खेळत असताना तो अचानक जमिनीवर पडला. त्याला नेमके काय झाले आहे ते लगेच स्पष्ट झाले नाही, कारण चेंडू त्याच्या जवळ कुठेही नव्हता आणि त्याला शारीरिक संपर्काचा त्रास झाला असेही वाटत नव्हते. वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून काहीतरी गंभीर असल्याचे जाणवले.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

एरिक्सनला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका हा नेहमीपेक्षा वेगळा होता. जेव्हा रक्त शरीरातून जसे पाहिजे तसे पंप करणे थांबते तेव्हा तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येतो . जेव्हा हृदयाचे ठोके नियंत्रित करणारे विद्युत आवेग योग्यरित्या कार्य करत नाहीत किंवा जेव्हा हृदयाच्या भिंती खराब होतात तेव्हा सौम्य झटका येऊ शकतो. मैदानावर त्याला सीपीआर आणि डिफिब्रिलेशन उपचार मिळाल्यानंतर, स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्या अवतीभवती इतर डॅनिश खेळाडू होते. एरिक्सनवर अखेरीस शस्त्रक्रिया झाली आणि नंतर ३ महिने त्याला पूर्ववत होण्यास लागले. पण त्यावेळेस फुटबॉलमध्ये परतणे हे स्वप्न अगदी अशक्य वाटत होते.

तरुण खेळाडूंमध्ये हृदयविकाराचा झटका सामान्य आहे का?

अलीकडच्या काळात तरुण लोकांमध्ये अचानक हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तरीही उच्च व्यावसायिक क्रीडापटूंमध्ये हे आढळणे दुर्मिळ आहे. तथापि, हे अगदीच कानावर आलेले नाही असे नाही. बऱ्याचवेळा अनुवंशिक परिस्थितीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा संसर्ग होऊ शकतो, त्यावेळी शारीरिक तंदुरुस्तीची पर्वा न करता ते कोणालाही प्रभावित करू शकते. टोरंटो विद्यापीठातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम शरीरविज्ञानाचे प्राध्यापक जॅक गुडमन यांच्या म्हणण्यानुसार, “अचानक येणाऱ्या ट्रिगरमुळे अशा गोष्टी उद्भवत असतात ज्यामुळे गंभीर एरिथमिया होतो आणि ते (अॅथलीट) त्यावेळी असुरक्षित होतात ज्यामुळे अटक येऊ शकतो आणि त्याचे घातक परिणामात रुपांतर होते.”

ख्रिस्तियनएरिक्सनचे फुटबॉलमधील पहिले प्रकरण नाही

२०१९ मध्ये, रियल माद्रिद आणि स्पेनचा महान खेळाडू इकर कॅसिलासला पोर्टोच्या प्रशिक्षण मैदानावर हृदयविकाराचा झटका आला होता. तो वाचला पण एका वर्षासाठी त्याला फुटबॉल पासून बाजूला व्हावे लागले होते आणि त्यानंतर २०२० मध्ये तो पुन्हा काहीही न खेळता निवृत्त झाला. २०१२ मध्ये, बोल्टन वँडरर्सचा २३ वर्षीय मिडफिल्डर फॅब्रिस मुआंबाला बोल्टन आणि टॉटेनहॅम यांच्यातील टेलिव्हिजन एफए कप खेळादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्याचे हृदय तब्बल ७८ मिनिटे थांबले होते पण चमत्कारिकरित्या मुआंबा बचावला. मात्र, या झटक्यानंतर त्याच्या कारकिर्दीचा अकाली अंत केला. जून २००३ मध्ये, कॅमेरून आणि कोलंबिया यांच्यातील फिफा कॉन्फेडरेशनच्या खेळादरम्यान, कॅमेरोनियन बचावात्मक मिडफिल्डर मार्क-व्हिव्हियन फो ल्योनमधील मैदानात कोसळला होता. त्याला पुनरुज्जीवित करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आणि त्याचे दुःखद निधन झाले.

ख्रिस्तियन एरिक्सन कसा परतला?

एरिक्सनला झालेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर खेळाडूंना खेळात परतणे किती कठीण असते हे वरील प्रकरणांवरून दिसून येते. तो केवळ परतला नाही तर त्याच्या कामगिरीच्या सर्व अपेक्षा ओलांडण्यात यशस्वी झाला, डॅनिश संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याने परतीचा मार्ग शोधला. काही वर्षांपूर्वी, हे कदाचित शक्य झाले नसते. त्याच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर, एरिक्सनला शस्त्रक्रिया करून जेसीडी (इम्प्लांटेड-कार्डिओव्हर्टर-डिफिब्रिलेटर) बसवण्यात आले. याला कधीकधी “शॉक बॉक्स” म्हटले जाते, हृदयाच्या लयीची काळजी घेते. जर त्या उपकरणाला काही प्रोब्लेम जाणवला, तर ते हृदयाला धक्के देऊन परत सामान्य अवस्थेत आणू शकते.

२०१५ पर्यंत, डॉक्टर सामान्यतः आयसीडी असलेल्या व्यक्तींना कोणताही कठोर व्यायाम न करण्याचा सल्ला देत असत. तथापि, येल विद्यापीठाने आयसीडी असलेल्या ४४० लोकांच्या बाबतीत संशोधन केले ज्यात ऍथलीट्स देखील समाविष्ट होते. त्यात असे दिसून आले आहे की आयसीडी असणाऱ्या लोकांसोबत कोणतीही प्रतिकूल घटना घडण्याचा धोका कमी आहे आणि ते अयशस्वी होण्याचा धोका देखील नाही. दुर्दैवाने एरिक्सन ज्या लीग कडून खेळत होता, तेथे खेळाडूंना अशा उपकरणासह खेळण्यापासून रोखण्यात आले होते.

त्यानंतर २०२२ जानेवारीमध्ये, एरिक्सनने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये नव्याने पदोन्नत झालेल्या ब्रेंटफोर्डसोबत करार केला आणि फेब्रुवारीमध्ये त्याने फुटबॉलमध्ये पुनरागमन केले. या संघासाठी काही सामने खेळल्यानंतर, तो २०२२ च्या उन्हाळ्यात मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला. या हंगामाच्या सुरुवातीपासून, एरिक्सनने त्याची सर्वोत्तम कामगिरी दाखवून दिली आहे जी मँचेस्टर युनायटेड अनेक वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत होती.

फिफा विश्वचषकासारख्या मोठ्या टप्प्यावर डॅनिश संघात त्याचे पुनरागमन हे त्याच्या कारकिर्दीची नव्याने सुरुवात मानता येऊ शकते. डॅनिश संघाने त्याच्या अनुपस्थितीत प्रशंसनीय कामगिरी केली. डॅनिश संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून अतिरिक्त वेळेत पराभव पत्करावा लागला होता. तथापि, एरिक्सनचे या स्पर्धेसाठी संघात पुनरागमन केल्याने त्यांच्या संघालाच केवळ बळ मिळाले नाही, तर यामुळे जगातील इतर अनेक फुटबॉलपटूंना हे प्रोत्साहनपर ठरेल.