Columbus Day: ऑक्टोबरचा दुसरा सोमवार हा अमेरिकेत कोलंबस दिवस म्हणून साजरा केला जातो. १२ ऑक्टोबर १४९२ रोजी ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या स्मरणार्थ सरकारी सुट्टी दिली जाते. अनेकांसाठी कोलंबसचे अमेरिकेत झालेले आगमन हे सभ्यतेच्या आगमनाचे प्रतीक होते. परंतु,अलीकडच्या दशकांमध्ये, कोलंबसच्या अमेरिकेतील आगमनाभोवती एके काळचा क्रूर विजय आणि त्यानंतर झालेल्या वसाहतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या गंभीर लेखांमुळे नव्याने प्रकाश पडला आहे. याशिवाय अलीकडील नव्या संशोधनात कोलंबस हा स्पॅनिश ज्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे कोलंबस हे नाव विशेष चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोलंबसशी संबंधित मिथकं आणि वाद यांचा घेतलेला वेध!

अमेरिकेचा शोध

१५ व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये पश्चिम आणि मध्य आशियामध्ये ओटोमन साम्राज्याच्या उदयामुळे युरोप आणि आशियामधील शतकानुशतके जुने व्यापारी मार्ग खंडित झाले. यामुळे आशियाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची धडपड सुरू झाली. १४८८ साली आफ्रिकेच्या टोकावर असलेल्या केप ऑफ गुड होप पार करणारा ‘बार्टोलोम्यू डायस’ हा पहिला युरोपियन ठरला. त्यामुळेच वास्को द गामाला १४९८ साली भारतात पोहोचण्यास मदत झाली. त्यापूर्वी नेव्हिगेटर ख्रिस्तोफर कोलंबस यालाही भारतात येणारा नवीन मार्ग शोधायचा होता. परंतु,आफ्रिकेभोवती नौकानयन करण्याऐवजी, त्याने अटलांटिकमध्ये पश्चिमेकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ३ ऑगस्ट १४९२ रोजी स्पेनच्या अँडलुसिया येथून तो निघाला. या मोहिमेसाठी स्पॅनिश राजघराण्याने त्याला निधी दिला होता.

Donald Trump's Diwali message to Hindu Americans
Donald Trump on Diwali: अमेरिकेतील हिंदूंनी भोगलेला धर्मद्वेषाचा इतिहास काय सांगतो?
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा…
Tunic Worn by Alexander the Great
Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
ख्रिस्तोफर कोलंबस सांता मारिया दे ला राबिडा मॉनेस्ट्रीच्या गेटजवळ (विकिपीडिया)

अधिक वाचा: Christopher Columbus: अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस इटालियन नव्हे तर स्पॅनिश ज्यू?

कॅनरी बेटे ही त्या काळात युरोपियन लोकांसाठी पश्चिमेकडील सर्वात ज्ञात ठिकाणांपैकी एक होती. तिथे थोडा वेळ थांबल्यानंतर, कोलंबसच्या तीन जहाजांनी सांतामारिया, पिंटा आणि निना यांनी अटलांटिक पार केले आणि १२ ऑक्टोबर रोजी आज बहामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी पोहोचली. पुढील काही महिन्यांत कोलंबसने क्यूबा, हिस्पॅनिओला आणि कॅरिबियनमधील इतर बेटांवर प्रवास केला. स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यांना कैद केले (ज्यांना त्याने ‘लॉस इंडिओस’ असे संबोधले) आणि स्पेनला परत नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मीळ वस्तू गोळा केल्या. तो मार्च १४९३ साली स्पेनमध्ये परतला. त्याने अमेरिकेला आणखी तीन वेळा प्रवास केला. हे तिन्ही प्रवास खंडातील स्पॅनिश वसाहतींची पायाभरणी करण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले. कोलंबसला त्याने नक्की काय केले आहे, याची कल्पना नव्हती. त्याने एका नव्या जगाचा शोध लावला होता. त्याने नव्या शोधलेल्या प्रदेशाचा उल्लेख ‘at the end of the Orient’- ओरिएंटच्या शेवटी असा केला आहे.

कोलंबसशी संबंधित मिथकं

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोलंबस हे इतिहासातील एक गौण व्यक्तिमत्त्व होते. अमेरिकन क्रांतीनेच (१७७५-८३) आधुनिक काळातील कोलंबसच्या मिथकाची निर्मिती केली. ब्रिटनशी कोणताही स्पष्ट संबंध नसलेल्या राष्ट्रीय इतिहासाची गरज असताना, नव्याने अस्तित्त्वात आलेल्या अमेरिकेने आपली ओळख निर्माण करण्यासाठी कोलंबसला एक आदर्श व्यक्ती म्हणून निवडले. विल्यम रॉबर्टसन यांनी १७७७ साली लिहिलेल्या कोलंबसच्या चरित्राचा या बाबतीत मोठा प्रभाव होता. त्यांनी कोलंबसला एका नव्या सभ्य-संस्कृतीचा दाता म्हणून चित्रित केले. त्याला अमेरिकेच्या आदर्शांचे प्रतीक म्हणून चित्रित करण्यात आले होते.

न्यूयॉर्क शहरातील कोलंबस डे परेड (विकिपीडिया)

१८व्या शतकाच्या अखेरच्या दशकांपर्यंत अमेरिकेत कोलंबसचा प्रभाव ठसठशीत होता. कोलंबसच्या नावावर असंख्य गावं आणि रस्त्यांची नावे ठेवण्यात आली. ज्यात दक्षिण कॅरोलिना (१७८६) आणि ओहायो (१८१२) राज्यांची राजधानीसुद्धा समाविष्ट होती. १७८४ साली न्यूयॉर्क शहरातील किंग्स कॉलेजने आपले नाव बदलून कोलंबिया विद्यापीठ ठेवले. अनेक प्रकाशनांनी त्याचे नाव वापरले. १७९१ साली, कोलंबिया प्रदेश (नंतर जिल्हा) राष्ट्रीय राजधानी म्हणून स्थापन करण्यात आला. १७९८ साली, जोसेफ हॉपकिन्सनने मूळ राष्ट्रगीत ‘हेल कोलंबिया’ लिहिले,” असे ‘द नेशन’ मासिकाच्या एका लेखात म्हटले आहे. याच लेखात म्हटले आहे की, कोलंबसला अमेरिकन ओळखीच्या कणखर धाग्यात विणण्यासाठी जी एक गोष्ट महत्त्वाची ठरली ती म्हणजे वॉशिंग्टन इरविंग यांचे ‘द लाइफ अँड व्हॉयेजेस ऑफ ख्रिस्तोफर कोलंबस’ हे पुस्तक. हे पुस्तक १८२८ साली प्रकाशित झाले. किंबहुना हेच पुस्तक अमेरिकेत लोकप्रिय विषयाचा आधार ठरले आणि पिढ्यानपिढ्या तोच इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवण्यात आला. या पुस्तकात कोलंबस हा शूर, निर्भय, जुन्या युरोपला सोडण्यासाठी उत्सुक म्हणून दर्शवण्यात आले आणि हेच गुण अमेरिकेने स्वतःमध्ये पाहिले.

सांस्कृतिक वारशाचा उत्सव

कोलंबसच्या प्रवासाच्या ४००व्या वर्धापन दिनानिमित्त तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांनी १२ ऑक्टोबर हा एकदाच साजरा होणारा राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित केला. न्यू ऑर्लिन्समध्ये ११ इटालियन स्थलांतरितांच्या हत्त्यांनंतर इटालियन- अमेरिकन समुदायाचे सांत्वन करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग होता. अटलांटिक पार करून अमेरिकेत चांगले जीवन घडवण्यासाठी प्रवास करणाऱ्या इटालियन स्थलांतरितांसाठी कोलंबस एक आदर्श होता. अनेक इटालियन-अमेरिकन लोकांसाठी, कोलंबस डे हा कोलंबसपेक्षा त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे. १९७१ साली कोलंबस डे हा अमेरिकेत सरकारमान्य सुट्टीचा दिवस ठरला. जो दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो.

क्रूरतेचा कळस

कोलंबसच्या मिथकाला मात्र २० व्या आणि २१ व्या शतकात हळूहळू धक्का बसू लागला. कारण कोलंबसने अमेरिकन लोकांवर केलेल्या अत्याचारांचे आणि कोलंबसच्या प्रवासामुळे तिथे आधीपासून राहणाऱ्या लाखो मूळ रहिवाश्यांच्या जीवनावर झालेल्या परिणामांवर अधिकाधिक संशोधन होऊ लागले. या संशोधनातून अमेरिकेतील स्थानिकांच्या संदर्भात झालेली हिंसा, गुलामगिरी आणि बळजबरीने झालेले धर्मांतरण अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडला. तसेच युरोपियन लोकांमुळे झालेल्या रोगांच्या प्रसारामुळे अनेक स्थानिक अमेरिकन लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील पहिल्याच दिवशी कोलंबसने सहा स्थानिकांना कैद केले. १२ ऑक्टोबर, १४९२ च्या त्याने केलेल्या नोंदीत म्हटले आहे की, हे चांगले आणि हुशार सेवक असावेत, मला विश्वास आहे की ख्रिश्चन धर्म स्वीकारतील, कारण मला असे वाटले की त्यांचा कोणताही धर्म नाही. (according to the translation by Oliver Dunn and James E Kelley Jr in 1989).

अधिक वाचा: Vasco da Gama: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?

कोलंबसच्या पुढील प्रवासांमध्ये हजारो स्थानिक लोकांना त्याने गुलाम केले, ठार मारले, बलात्कार केला आणि नव्याने स्थापन झालेल्या स्पॅनिश वसाहतींमध्ये सोन्याच्या खाणींमध्ये आणि मळ्यांवर काम करण्यास पाठवले. कोलंबसच्या आगमनानंतरच्या ६० वर्षांच्या आतच दोन लाख ५० हजार तैनोंपैकी (कॅरिबियनमधील सर्वात मोठी स्थानिक जमात) फक्त काही शेकडाच लोक बेटांवर शिल्लक राहिले, यास फक्त आणि फक्त कोलंबसच कारणीभूत होता. कोलंबसने इतक्या क्रूरपणे राज्य केले की, अगदी स्पॅनिश साम्राज्यालाही त्याचे वागणे अतिरेकी वाटले आणि १५०० साली त्यांनी त्याला अमेरिकेतील गव्हर्नरपदावरून हटवले.

स्थानिक लोकांचा मृत्यू जुन्या जगातील आजारांमुळे देखील झाला. हे आजार कोलंबस आणि त्याची माणसे (तसेच त्यानंतरचे युरोपियन वसाहतवादी) अमेरिकेत घेऊन आले होते. भरभराटीला आलेल्या संस्कृतींचे रोगांमुळे, विशेषतः देवीसारख्या आजारांमुळे जवळपास एका रात्रीत पतन झाले. इतिहासकार नोबल डेव्हिड कूक यांनी त्यांच्या बॉर्न टू डाय: डिसीझेस अँड न्यू वर्ल्ड कॉन्क्वेस्ट १४९२-१६५० (१९९८) या पुस्तकात लिहिले आहे: “जुन्या आणि नव्या जगाच्या संपर्कानंतर पहिल्या शतकात मृत झालेल्या लाखो लोकांना ठार मारण्यासाठी फार थोडे स्पॅनिश होते.

ख्रिस्तोफर कोलंबसचे पोर्ट्रेट (विकिपीडिया)

अधिक वाचा: विश्लेषण: दालचिनीचं ग्रीक कनेक्शन; भारतीय मसाल्यांना हजारो वर्षांचा इतिहास!

एकूणात, कोलंबसने चांगल्या अर्थानेच नव्हे तर वाईट अर्थानेही जगाचा इतिहास बदलला, असे नवे संशोधन सांगते आहे.

Story img Loader