Delhi Sultanpuri Kanjhawala Death Case: दिल्लीच्या कांझावाला सुलतानपुरी भागातील एका २० वर्षीय तरुणीचा कारने चिरडल्याने भीषण मृत्यू झाला होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंजली नामक या तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. कार चालकाने अपघातानंतर तब्बल १२ किमीपर्यंत अंजलीचा मृतदेह फरपटत नेला होता. या धक्कादायक अपघाताच्या नंतर अंजलीचा मृतदेह अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती

सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार अंजलीचा मृतदेह विवस्त्र आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप दाखल करण्यात आले होते, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर हे आरोप फेटाळण्यात आले .दिल्ली कांजवाला प्रकरणातील पाचही आरोपी पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत. भारतीय दंडसंहितेनुसार या आरोपींना नेमकी काय व किती शिक्षा होऊ शकते हे आपण सविस्तर जाणून घेऊयात..

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

दिल्ली सुलतानपुरी कांझावाला प्रकरणातील पाचही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णन (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल अशी या पाच आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरीही त्यांच्या निष्ककाळजीपणाने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीन्वये या आरोपींवर कलम ३०४ अ आणि कलम २७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीनुसार, निष्काळजीपणे ड्रायव्हिंगसाठी कारावासाची शिक्षा आहे जी सहा महिन्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. शिवाय अंजलीच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

आयपीसी ३०४ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. सध्या पाच आरोपींवर केवळ कलम ३०४ अ आणि कलम २७९ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही या प्रकरणी तपास सुरु असल्याने आरोपींवर अन्यही कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

हे ही वाचा<< विश्लेषण: रक्ताने काढलेली चित्रं का ठरतायत प्रेमाचं प्रतीक? विक्रीत प्रचंड वाढ होताच सरकारने काय घेतला निर्णय?

अंजलीचा मृत्यू कसा झाला?

अंजली व तिची मैत्रीण निधी स्कुटीवरून जात असताना एका कारने अंजलीला १२ किमी फरपटत नेले होते. या घटनेनंतर अंजलीच्या मैत्रिणीने तिथून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दीपक खन्ना (२६ वर्ष), अमित खन्ना (२५ वर्ष), कृष्ण (२७ वर्ष), मिथुन (२६ वर्ष) व मनोज मित्तल या ५ जणांना अटक केली होती. यानंतर आशुतोष व अंकुश खन्ना नामक तरुणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली. अंकुश खन्ना याने शुक्रवारी पोलिसांसमोर आपला गुन्हा काबुल केला आहे. अंकुश हा अपघाताच्या वेळी कार चालवत होता व मुख्य आरोपी अमित याचा तो भाऊ आहे असे समजतेय.

हे ही वाचा<< Delhi Accident: आधी लेकीचा मृत्यू, आता चोरांनी घातला गंडा.. अंजलीच्या कुटुंबाची पोलिसांवर संतप्त टीका

अंजलीच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा

दरम्यान, या अपघातापूर्वी अंजलीने मद्यप्राशन केले होते, असा दावा अंजलीची मैत्रीण निधिने केला होता. मात्र, अंजलीच्या आईने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा अपघात षडयंत्र असून आजवर मी निधीला कधीच भेटले नव्हते. अंजली कधीच मद्यपान करायची नाही त्यामुळे हा अपघात ठरवून केलेला आहे असा दावा अंजलीच्या आईने केला आहे.