रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. याच कारणामुळे युरोपीयन देश सध्या भयछायेत आहेत. दोन्ही देशांतील युद्ध अजूनही थांबलेले नसून वाढत्या अणुद्धाच्या शक्यतेमुळे युरोपीयन देशांमध्ये पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी वाढली आहे. अण्वस्त्र हल्ला आणि पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांचा नेमका संबंध काय? हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबिंगची प्रेक्षकांमध्ये क्रेझ; डबिंगमागची नेमकी प्रक्रिया काय? कशी बदलते चित्रपटांची भाषा?

काही महिन्यांपूर्वी युरोपीयन कमिशनने युरोपीयन देशांना पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांचा साठा करण्याचे सांगितले होते. पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांसोबतच किरणोत्सारामुळे होणारा धोका टाळण्यासाठी इतर उपायोजना करण्याचेही सांगण्यात आले होते. युरोपीयन कमिशनच्या या आवाहनानंतर युक्रेनमध्ये पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांच्या मागणीत उल्लेखणीय वाढ झालेली आहे. पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे युक्रेनमधील कीव येथील फार्मासिस्ट सांगत आहेत. तसे वृत्त दी न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: ऐन दिवाळीत फटाके वाजवू नका असं वारंवार का सांगितलं जातंय? नेमका फटाक्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

मागील आठवड्यात कीव शहरातील काऊन्सिलनेही पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या वाटण्याचे जाहीर केले होते. अण्वस्त्र हल्ला झालाच तर या गोळ्या येथील नागरिकांना दिल्या जातील, असे कीव शहराच्या काऊन्सिलने सांगितले होते. युरोपमधील काही देशांनी याआधीच पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. फिनलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना या गोळ्या खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर येथे या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: आता खरंच ‘नो टेन्शन’! तणावातही आनंदी ठेवते डेन्मार्कची लोकप्रिय ‘Hygge’ पद्धत; नेमकं हे घडतं कसं?

आयोडीनच्या गोळ्यांना मागणी का वाढली?

अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात किरणोत्सार होतो. किरणोत्सातून निघालेले कण नंतर वातावरणातील कणांशी एकत्र होतात. हे किरोणत्सारी कण थंड झाल्यानंतर ते पृथ्वीवर परतात. त्यालाच फॉलआऊट (किरणोत्सारी धूळ जमिनीवर येणे) म्हणतात. पुढे या कणांच्या संपर्कात येणारी व्यक्ती आजारी पडू शकते. कालांतराने या व्यक्तीचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते.

हेही वाचा >>> विश्लेषण: विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध खेळी सर्वांत अविस्मरणीय? आधीच्या कोणत्या खेळी निर्णायक होत्या?

मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथी किरणोत्सारी आयोडीनला लवकर शोषून घेते. पोटॅशियम आयोडाईड हे किरणोत्सारी आयोडीनला शरीरात येण्यापासून रोखू शकते. हे संयुग थायरॉईड ग्रंथीला काही प्रमाणात सुरक्षा पुरवते. नॉर्वेजियन रेडिएशन अँड न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या मानवाला थायरॉईडचा कर्करोग होण्यापासून वाचवू शकतात. अणुस्फोटानंतर निघणाऱ्या किरणोत्सारामुळे थायरॉईडचा कर्करोग होण्याची शक्यता असते. मात्र या गोळ्या थायरॉईड ग्रंथीला त्यापासून वाचवू शकतात.

दरम्यान, याच कारणामुळे पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्यांची मागणी रशिया, अमेरिका, योरीपीयन देशांत वाढली आहे. तर बेल्जियम, बुल्गेरिया, झेक प्रजासत्ताक तसेच इतर काही देशांनी आमच्याकडे या गोळ्यांचा साठा संपलेला आहे, असे सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of iodine tablets increased amid ukraine and russia war known cause prd
First published on: 25-10-2022 at 18:00 IST