भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या नेझल म्हणजेच नाकावाटे घेण्याच्या लशीला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याअंतर्गत प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यास भारत औषध नियंत्रक (डीसीजीआय) विभागाने मान्यता दिली आहे. या लशीच्या दोन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या असून नाकावाटे दिली जाणारी ही पहिली भारतीय लस आहे. आता लवकरच ही लस कोव्हॅक्सिन लशीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून उपलब्ध होणार आहे.

नाकावाटे घेण्याची लस (नेझल डोस) म्हणजे काय? –

आतापर्यंत वापरात असलेल्या बहुतांश लशी या स्नायूमध्ये टोचून देण्यात येणाऱ्या आहेत. पोलिओ, रोटाव्हायरस अशा काही आजारांच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या लशी या तोंडाद्वारे पाजल्या जातात. ‘नेझल डोस’ हा नाकावाटे दिला जातो. यामध्ये लशीचे काही थेंब नाकामध्ये सोडले जातात आणि श्वासाद्वारे आत खेचले जातात.

Slum sale allowed if name in eligibility list till 2010 under Slum Rehabilitation Scheme Mumbai
पात्रता यादीत नाव असल्यास झोपडी विकण्याची मुभा मिळणार! घर विकण्यासाठी मात्र पाच वर्षांचीच मुदत
How Japan is set to make millions of vending machines obsolete
पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
crime , money, justice, Abolition,
पैशाच्या बदल्यात गुन्हा रद्द करणे म्हणजे न्याय विक्रीला काढल्यासारखे…
Kotak Group is the beneficiary of Adani stock fall The Hindenburg revelations claim that the costs outweigh the benefits
‘के’ म्हणजे कोटक समूहच अदानींच्या समभाग पडझडीची लाभार्थी! हिंडेनबर्गच्या खुलाशात नफ्यापेक्षा खर्चच अधिक झाल्याचा दावा
Man Lost 13kgs In 21 Days With Water Diet
२१ दिवसांत १३ किलो वजन घटवणारा ‘मिलर’ आला चर्चेत! वजन कमी करण्यासाठी वापरलेला ‘हा’ फंडा तुम्हाला साजेसा आहे का?
Jio New 5G Plans
Jio New 5G Plans: जिओकडून नव्या ५ जी प्लॅन्सची घोषणा; नव्या दरांमुळे लागणार युजर्सच्या खिशाला कात्री; वाचा संपूर्ण यादी!
Careers And Jobs After Liberal Arts Degree
चौकट मोडताना : परदेशी जाण्याचा खर्चिक मार्ग
Reliance Jio provides offers a range of prepaid data booster plans to keep users connected without interruptions checkout list
Reliance Jio Down : इंटरनेट सेवा खंडीत झाल्याने ग्राहकांच्या तक्रारींचा पूर, जिओ फायबरही काम करेना!

नेझल डोस वेगळा कसा? –

करोनासारखे विषाणू हे श्वसनयंत्रणेच्या आवरणाच्या (म्युकोझा)माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. यामध्ये नाकपुड्या, श्वसन पोकळ्या, वायुनलिका, फुप्फुसे आणि वायुकोश यांचा समावेश असतो. स्नायूंमध्ये दिल्या जाणाऱ्या लशी रक्तामध्ये प्रतिपिंडे निर्माण करतात आणि शरीरातील रोगप्रतिकार पेशींची क्षमता वाढवितात. उदाहरणार्थ बी पेशी या विषाणूचा शोध घेण्यासाठी प्रतिपिंडे तयार करतात. तर टी पेशी या बी पेशींना प्रतिपिंडे तयार करण्यात मदत करतात किंवा संक्रमित पेशी शोधून त्यांचा नाश करतात. पण या लसीमुळे विषाणूविरोधात प्रतिकार करण्यासाठी श्वसनयंत्रणा फारशी सक्षम होत नाही. मात्र नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशी या श्वसनयंत्रणेजवळील ऊतींमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात. या भागातील बी आणि टी पेशी यामुळे अधिक कार्यक्षम होतात. या भागातील बी पेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात, ज्या श्वसनमार्गातील विषाणूंना नष्ट करण्यात मदत करतात, तर टी पेशी या विषाणूंचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्यास मदत करतात.

तज्ज्ञांच्या मते स्नायूवाटे दिल्या जाणाऱ्या लशी या करोनाची तीव्रता कमी करण्यास फायदेशीर असल्या तरी पूर्णपणे प्रतिबंधात्मक नाहीत. लस घेतलेल्यांनाही पुन्हा लागण होत आहे. परंतु नाकावाटे दिली जाणारी लस ही करोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंध करण्यास अधिक कार्यक्षम असेल.

कोव्हॅक्सिनचा ‘नेझल डोस’ कसा आहे? –

कोव्हॅक्सिनचा ‘नेझल डोस’ म्हणजे भारतात मानवी वैद्यकीय चाचण्या झालेली पहिलीच करोना प्रतिबंधात्मक लस आहे. या लसनिर्मितीचे अमेरिकेतील सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठाचे परवानाधारक तंत्रज्ञान भारत बायोटेककडे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या १८ ते ६० वर्षे वयोगटातल्या व्यक्तींवर पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ही लस कोणाला दिली जाणार आहे? –

कोव्हॅक्सिनची ही लस सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांअंतर्गत वर्धक मात्रा म्हणून वापरण्यासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रा घेतलेल्या ६० वर्षांवरील दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती यांना वर्धक मात्रा म्हणून ही लस दिली जाणार आहे. राज्यात दहा ठिकाणीच या लशीच्या वापरास मान्यता दिलेली आहे.

नाकावाटे लशीसाठी मागणी अधिक का आहे? –

स्नायूंमध्ये टोचून लस देणाच्या तुलनेत नाकावाटे लस देणे सोपे आहे. त्यामुळे लशीबाबत असलेली भीतीही कमी होईल आणि अधिकाधिक वेगाने लसीकरण करण्यास यामुळे मदत होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच लहान बालकांमध्येही ही लस देणे अधिक सोपे असल्यामुळेही या लशीची मागणी जगभरात केली जात आहे.