Learn the latest insights on Diabetes Treatment Evolution and how patients leverage Ozempic Metformin Benefits: “माझ्या आईलासुद्धा डायाबेटिस होता. दोन प्रकारच्या गोळ्या आणि क्वचित गरजेला इन्सुलिन एवढ्यावर भागलं तिचं! मला रोज दहा-बारा गोळ्या घ्याव्या लागतात. शिवाय अधूनमधून इंजेक्शनं असतातच. त्या सगळ्या औषधांच्या माऱ्याने माझ्या शरीरावर दुष्परिणाम नाही का होणार?” शालूआत्या डोक्याला हात लावून म्हणाल्या. वजन वाढणं, रक्तातली साखर कोसळणं या भीतीपोटी अनेक रुग्ण चिंतेत असतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या ‘मधुमेह उपचार क्रांती’मुळे आता रुग्णांना अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित औषधोपचार मिळणे शक्य झाले आहे.

“माझ्या आईलासुद्धा डायाबेटिस होता. दोन प्रकारच्या गोळ्या आणि क्वचित गरजेला इन्सुलिन एवढ्यावर भागलं तिचं! मला रोज दहा-बारा गोळ्या घ्याव्या लागतात. शिवाय अधूनमधून इंजेक्शनं असतातच. त्या सगळ्या औषधांच्या माऱ्याने माझ्या शरीरावर दुष्परिणाम नाही का होणार? ” शालूआत्या डोक्याला हात लावून म्हणाल्या.  

वजन वाढणं, रक्तातली साखर कोसळणं

शालूआत्यांच्या आईच्या, येसूआजींच्या काळात ‘मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणं’ अशी खुद्द डॉक्टरांचीही ठाम समजूत होती. म्हणून इन्सुलिन आणि पँक्रियासकडून अधिक इन्सुलिन तयार करून घेणारी  ग्लायबेनक्लामाईड (Afdiex, Betanase), ग्लिक्लाझाईड (Azukon, Dianorm) सारखी औषधं (sulphonylurias) यांच्यावर सगळी भिस्त होती. त्यांच्यामुळे वजन वाढणं, रक्तातली साखर कोसळणं यासारखे त्रास होत असत.

Diabetes Treatment Evolution modern medicine breakthrough | Advanced Ozempic Metformin Benefits for sugar control | मधुमेह उपचार क्रांती नवीन औषध पद्धती | ओझेम्पिक मेटफॉर्मिन फायदे आणि दुष्परिणाम
मधुमेह उपचार क्रांती: ओझेम्पिक आणि मेटफॉर्मिनचे आरोग्याला फायदे (Image- Gemini)

 इन्सुलिनविरुध्द असहकार चळवळ

१९६० पासून मधुमेहाविषयीचं ज्ञान टप्प्याटप्प्याने वाढत गेलं. तो केवळ साखरेचा आजार नाही, हे कळलं.  प्रकृती उत्तम असताना शरीरातल्या अवयवांचं एकमेकांशी सतत सलोख्याने सल्लामसलत चालू असते. ते एकमेकांचं ऐकतात आणि गुण्यागोविंदाने वागतात. त्या सुखी संसाराला पोटात साठलेल्या खलनायिका चरबीची दृष्ट लागते. ती कळलावेपणा करते. पँक्रियास, आतडी, लिव्हर, मूत्रपिंड, स्नायू, मेंदू, हृदय वगैरे अवयव एकमेकांचं ऐकेनासे होतात आणि इन्सुलिनविरुध्द असहकाराची चळवळ पुकारतात. त्या विसंवादामुळे त्यांच्यातल्या प्रत्येकाला आणि रक्तवाहिन्यांनाही त्रास होतो. तो विसंवाद म्हणजेच मधुमेह. 

प्रकृतीनुसार वेगळी औषधं

आता शालूआत्यांचे डॉक्टर अनशापोटी- भरल्यापोटी साखर तर सांभाळतातच पण भविष्यातली कॉम्प्लिकेशन्स टाळायला इतरही बऱ्याच आघाड्या लढवतात. मधुमेहामुळे विसंवादी झालेल्या वेगवेगळ्या अवयवांची मनधरणी करायला ते योग्य तीच, वेगवेगळी औषधं देतात. प्रत्येक माणसाला त्याच्या प्रकृतीनुसार वेगळी औषधं द्यावी लागतात. प्रत्येक औषधाला गुणांसोबत दोषही असतातच. पण ती औषधं एकमेकांना मदत करतात.  त्यामुळे प्रत्येक औषधाचा डोस योग्य तेवढाच, अगदी गरजेपुरताच ठेवून जास्तीत जास्त फायदा मिळवत अनेक दुष्परिणाम टाळताही येतात. 

कसं काम करतात ती सुसंवादी औषधं? 

त्या मोहिमेतला १९५८ सालचा, सलामीचा फलंदाज म्हणजे मेटफॉर्मिन(Gluconorm, Gluformin). मधुमेहातली असहकारी लिव्हर सतत रक्तात साखर ओतत राहते. तो असहकार मेटफॉर्मिन कमी करतं. त्याच्यामुळे रक्तातली साखर कमी होते पण कोसळत नाही. वजनही थोडंसं कमी होतं. ते गुणी औषध अजूनही वापरात आहे. मेटफॉर्मिनमुळे काहीजणांना पित्त, पोटदुखी, जुलाब होतात. मूत्रपिंडाचा आजार असला तर मेटफॉर्मिन टाळणं बरं. 

शरीरभर दवंडी

गेल्या साठ-सत्तर वर्षांतल्या, निरंतर, व्यापक संशोधनामुळे अनेक गुणी औषधं वैद्यकशास्त्राच्या बटव्यात जमा झाली आहेत. ती मधुमेहामुळे विसंवादी झालेल्या शरीरात कुशल दूतांचं काम करतात. पोटात अन्न पोहोचलं की तशी दोन प्रकारची गुणी रसायनं (GIP, GLP-1, GLP-२) खरं तर आपल्या शरीरातच तयार होतात. त्यातलं GIP हे हॉर्मोन तर आपल्या आतड्यातच भरल्यापोटी तयार होतं. इन्सुलिनचा पाझर वाढवणारी म्हणून त्यांना INCRETINs (INsulin seCRETion INcrease) म्हणतात. अलीकडे त्यांचा फार बोलबाला आहे. ती रसायनं, ‘अन्न आलं, पोट भरलं’ अशी शरीरभर दवंडी पिटतात.

भूक कमी लागत…

‘रक्तातली साखर जेवढी वाढली आहे तेवढंच इन्सुलिन वाढव,’ असं पँक्रियासला सांगतात. त्यामुळे साखर आटोक्यात येते पण नको इतकी खालावत नाही. रक्तातली साखर वाढवणाऱ्या glucagonचं प्रमाण उगाचच वाढत असलं तर तेसुध्दा ती कमी करतात. ती इन्क्रेटिन रसायनं आतडं ते मेंदू अशी हॉटलाईनच बनतात आणि मेंदूला समजावून भूक कमी करतात. पण आतडी, पँक्रियास, मेंदू अशा सगळ्यांचं सहकार्य मिळवणाऱ्या त्या उपकारक रसायनांवर (DPP-4)नावाचं एक रक्तातलं एन्झाइम हल्ला करतं आणि  त्यांचा झपाट्याने नाश करतं. म्हणून त्यांचे फायदे क्षणभंगुर ठरतात.  

भूक भागल्याची तृप्ती

त्या आपल्याच गुणकारी रसायनांना अधिक काळ तग धरायला लावलं तर? संशोधकांनी (DPP-4)चं काम कमी करणारी औषधं (DPP-4 inhibitors) शोधली. त्याला यश आलं आणि २००६मध्ये Sitagliptine (Januvia) बाजारात आलं. तशी तोंडी घ्यायची इतरही vildagliptine(Galvus, Jalra, Zomelus), linagliptine(Trajenta), teneligliptine(Teneza, Afoglip, Accteneg) औषधं आहेत. ती चांगलं काम करतात; स्वस्तही असतात. त्यांच्यामुळे भूक भागल्याची तृप्ती अधिक काळ टिकून राहते. पण ती सौम्य आहेत. फार जोमाने काम करू शकत नाहीत.   

भूक कमी करणारं रसायन

म्हणून संशोधक INCRETINsसारखंच पण अधिक काळ टिकणारं औषध हुडकत होते. योगायोगाने त्याचवेळी नैरृत्य अमेरिकेतली Gila monster नावाची अत्यंत विषारी पाल मदतीला सरसावली. ती वर्षातून फक्त पाच ते दहा वेळा खाते. मधल्या काळात तिला भूक लागत नाही. तिच्या लाळेत भूक कमी करणारं रसायन(extendin-4) संशोधकांना सापडलं. त्याचं काम  GLP-1सारखंच होतं, पण ते GLP-1सारखं नाशिवंत नव्हतं. शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काम करून त्याला २००५मध्ये Exenatide(Bayeta)नावाने अमेरिकन बाजारात आणलं. त्याचं साखर घटवायचं आणि भूक कमी करायचं काम तब्बल ८ तास चालतं.

रक्तात टिकून राहणारी प्रथिनं  

मग संशोधकांनी त्याच्याच सारखी, पण पालीच्या लाळेपेक्षा माणसाला अधिक जवळची, एन्झाइमच्या हल्ल्यांना टक्कर देऊन, रक्तातल्या प्रथिनांशी जोडी जुळवून रक्तात अधिक काळ टिकून राहणारी, पटकन लघवीत धुपून न जाणारी अनेक रसायनं शोधली, घडवली. त्या समुद्रमंथनात  Semaglutide(Ozempic) हे रत्न हाती लागलं. आता त्याचे liraglutide(Victoza, Lirafit), dulaglutide(Trulicity) वगैरे भाऊसुद्धा जन्माला आले आहेत.

अनावश्यक खादाडी टाळता येते

ते Ozempic-बांधव GLP-1 च्या स्थानावरच, त्याच्यासारखीच कामगिरी करतात. त्यांचं काम एकाच वेळी अनेक अवयवांवर चालतं. त्यांच्यामुळे खाल्ल्यावर तृप्त समाधान लाभतं. त्यांच्या मेंदूवरच्या परिणामामुळे भूक मरते, वखवख होत नाही. अधलीमधली अनावश्यक खादाडी टाळता येते. जठरातलं अन्न आतड्यांत अधिक सावकाश ढकललं जातं. त्यामुळे पोट भरलेलं राहतं, जेवणानंतर रक्तातली साखरही सावकाशच वाढते आणि तिच्यापुरतंच इन्सुलिन पँक्रियासकडून मागवलं जातं.  रक्तातलं ग्लुकॅगॉनचं प्रमाणही घटतं. त्यामुळे लिव्हरकडून रक्तात येणारा साखरेचा लोंढा कमी होतो. रक्तातली साखरही घटते, वजनही कमी होतं आणि काही हृदयविकाराच्या रुग्णांनाही अप्रत्यक्ष फायदा होतो. 

औषधाचा डोस हळूहळू वाढवावा लागतो

ओझेम्पिकसारखी बहुतेक औषधं इंजेक्शनाने द्यावी लागतात. semaglutide चा Rybelsus हा तोंडावाटे घ्यायचा अवतारही अस्तित्वात आहे. ही औषधं बहुगुणी असली तरी आखूडशिंगी मात्र नाहीत. सुरुवातीला त्यांच्यामुळे पोटाला तडस लागणं, मळमळ, आम्लपित्त, वांत्या वगैरे त्रास होतात. म्हणून त्यांचा डोस हळूहळूच वाढवावा लागतो. 

आतडी, पँक्रियास, चरबी, लिव्हर, मेंदूचा संवाद

Ozempic वगैरे फक्त GLP-1 च्या स्थानावरच काम करतात. पण आता tirzepatide (Mounjaro/Zepbound) नावाचा नवा गडी रिंगणात उतरला आहे. तो तर GLP-1 आणि GIP या दोन्ही गुणी रसायनांची कामगिरी एकट्याने बजावतो. त्याच्या कामामुळे रक्तातली  साखर इन्सुलिनपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे कह्यात ठेवता येते. इन्सुलिनमुळे वजन वाढतं. Tirzepatideने वजन कमी होतं. 
थोडक्यात सांगायचं तर ही औषधं(INCRETINs) आतडी, पँक्रियास, चरबी, लिव्हर, मेंदू या सगळ्यांचा एकमेकांशी योग्य पध्दतीने संवाद सुरू करून देतात.

मधुमेहाच्या उपचारांमध्ये क्रांती

मधुमेह या शापाचं मूळ कारण म्हणजे लठ्ठपणा. GIP, GLP पध्दतीने काम करणारी औषधं बिनबोभाट वजन कमी करतात. अप्रत्यक्षपणे रक्तवाहिन्यांना आणि हृदयालासुद्धा त्यांचा फायदा होतो. INCRETINs मुळे मधुमेहाच्या उपचारपद्धतीत क्रांती झाली आहे.