World Milk Day, 2023 माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांनी नुकत्याच केलेल्या एका अजब विधानामुळे त्या भलत्याच चर्चेत आहेत. गाढवांची संख्या सध्या घटते आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इतिहासात होऊन गेलेल्या प्रसिद्ध राणी क्लिओपात्राच्या सौंदर्याचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आला. लडाख येथील एका स्थानिक समूहाकडून गाढविणीच्या दुधापासून साबण तयार करण्यात येतो. या साबणाची किंमत दिल्लीसारख्या शहरात ५०० रुपये आहे. या साबणाच्या वापरामुळे सौंदर्य चिरकाल अबाधित राहते, असा दावा मनेका गांधी यांनी केला. गाढविणीच्या दुधाचे हे महत्त्व सांगताना राणी क्लिओपात्रा ही गाढविणीचे दूध अंघोळीसाठी वापरत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर क्लिओपात्रा खरंच गाढविणीचे दूध वापरत होती का ? हे समजून घेणे रोचक ठरावे.

क्लिओपात्रा नेमकी कोण होती?
क्लिओपात्रा हिचा संबंध हा इजिप्तमधील टॉलेमी घराण्याशी होता. इतिहासात या घराण्याचा आढावा घेतल्यास लक्षात येणारी मुख्य गोष्ट म्हणजे क्लिओपात्रा ही एकच राणी नाही. हे विश्लेषण धारण करणाऱ्या अनेक राण्या व राजकन्या या घराण्यात होऊन गेल्या. या सर्वांमध्ये ऑलिटिझ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या टॉलेमीची (टॉलेमी बारावा) कन्या क्लिओपात्रा थे फिलोपेटर (सातवी) इतिहासात प्रसिद्ध आहे. हिचा जन्म इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाला. हिच्या आधी झालेल्या सहा क्लिओपात्रांचा संदर्भ उपलब्ध आहे. क्लिओपात्रा थे फिलोपेटर ही प्रचंड महत्त्वाकांक्षी राणी होती तरी दुर्दैवाने इजिप्तच्या टॉलेमिक सम्राज्याची ती शेवटची राणी ठरली. त्यानंतर इजिप्त हा पूर्णतः रोमन साम्राज्याचा भाग बनला.

Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Names For Baby Girls inspired by Goddess Gauri
Baby Girl Names : गौरीच्या नावावरून ठेवा तुमच्या मुलींचे नाव, पहा एकापेक्षा एक सुंदर नावांची लिस्ट
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग
Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
pune married women suicide with her daughter
पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
Goddess Lakshmi will give money
शुक्र देणार बक्कळ पैसा; कन्या राशीत निर्माण होणार युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची असणार कृपा
argument in the relationship between brothers and sisters
भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?

आणखी वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

क्लिओपात्राचे टॉलेमी घराणं
टॉलेमी पहिला म्हणजेच ज्याने या साम्राज्याची स्थापना केली तो ‘अलेक्झांडर द ग्रेट’ याच्या सेनापतींपैकी एक होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर टॉलेमी पहिला याने इजिप्तवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि तेथून टॉलेमी साम्राज्याची सुरुवात झाली. या घराण्यात एकूण १५ टॉलेमी होऊन गेले.

क्लिओपात्राचा सख्ख्या भावांशी झालेला विवाह
इ. स. पू. ५१ मध्ये क्लिओपात्राने तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर इजिप्तचा राज्य कारभार सांभाळायला सुरुवात केली. तिचा विवाह तिच्या लहान भावांसोबत (टॉलेमी XIII आणि टॉलेमी XIV)झाला होता. तिने राज्य कारभार भावांसोबत संयुक्तिकरीत्या केला. टॉलेमी घराण्यात वंश शुद्ध राहावा यासाठी भावंडांमध्येच विवाह करण्याची प्रथा होती. टॉलेमी तेरावा आणि टॉलेमी चौदावा यांच्या मृत्यूनंतर क्लिओपात्राने ज्युलियस सीझर याच्याशी विवाह केला. त्यानंतर रोमन गव्हर्नर अँटनी याच्याशी तिचे असलेले प्रेमसंबंध प्रसिद्ध होते. क्लिओपात्रा ही तिच्या अनेक पुरुषांसोबत असलेल्या संबंधामुळे विशेष प्रसिद्ध होती. म्हणूनच तत्कालीन अनेक ग्रीक संदर्भकारांनी तिचे वर्णन ‘पुरुषांना भुरळ घालणारी भ्रष्ट स्त्री’ असे केले आहे. असे असले तरी अनेक हे विवाह किंवा संबंध म्हणजे राज्य टिकवून ठेवण्यासाठीच्या तिने केलेल्या प्रयत्नांचा भागच आहेत, असे अनेक अभ्यासक मानतात.

महत्त्वाकांक्षी क्लिओपात्रा थे फिलोपेटर
वास्तविक क्लिओपात्रा कशी होती याचे चित्रण ग्रीक-रोमन साहित्याच्या माध्यमातून उभे केले जाते. उपलब्ध माहितीनुसार क्लिओपात्रा ही सुंदर नव्हती तर आकर्षक होती. आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि दुसऱ्यावर छाप पाडण्याची विलक्षण कला तिच्याकडे होती. आणि हेच आकर्षक व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर ती रोजच्या आयुष्यात करीत असल्याचे दाखले मिळतात.

आणखी वाचा: विश्लेषण : प्राचीन भारताची समृद्धी सांगणारी हनुमानाची कंबोडियन विवाहकथा! हनुमान जयंती 2023

क्लिओपात्राची सौंदर्यसाधना
क्लिओपात्रा ही रोजच्या आयुष्यात आपले सौंदर्य चिरतरुण ठेवण्याकरिता अनेक माध्यमांचा वापर करत होती. काही संदर्भ हे ग्रीक व रोमन साहित्यात सापडतात. तर काही काळाच्या ओघात दंतकथांच्या माध्यमातून चालत आलेले आहेत. क्लिओपात्रा हिला परफ्यूमचे वेड होते हे सत्य आहे. तिने तिच्या राज्यात परफ्यूमची फॅक्टरी सुरू केली होती. या फॅक्टरीमध्ये औषधी वनस्पती, फुलांच्या पाकळ्या, पाने किंवा बिया गरम वनस्पती तेलात (ऑलिव्ह ऑइल) मिसळून सुगंधी तेले तयार केली जात. हे मिश्रण आठवडाभर तेलात भिजवून त्यानंतर गाळून घेण्यात येत होते. किंबहुना भारतातून इजिप्तमध्ये सुगंधी तेलाची या काळात निर्यात झाली होती, याचे पुरावेही उपलब्ध आहेत.

पापण्यांसाठीही रंग वापरणारी राणी
इतकेच नाही तर ज्युलियस सीझर याच्या केस गळण्याच्या तक्रारीवर उपाय म्हणून तिने वेगवेगळे प्रयोग केल्याचे संदर्भ सापडतात. तिच्या सौंदर्यप्रसाधनांविषयीची माहिती तत्कालीन इजिप्त येथील भित्तिचित्रांमधून मिळते. क्लिओपात्रा हिला डोळ्यांच्या पापण्यांसाठीसाठी गडद हिरवा व काळा रंग वापरण्याची आवड होती. हिरव्या कॉपर मॅलाकाइट आणि ब्लॅक लीड सल्फाइडचा वापर ती हे रंग मिळविण्याकरिता करीत असे. तर कारमाइन बीटल्सपासून बनवलेला लाल रंग ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी वापरत होती. दंतकथांनुसार इजिप्तची राणी क्लिओपात्राने गाढवाच्या दुधात अंघोळ करून तिचे सौंदर्य आणि त्वचेचे तारुण्य राखले होते. तिच्याकडे सुमारे ७०० गाढवांचा कळप होता व त्वचेची कांती वाढविण्यासाठी ती मगरीच्या मलमूत्राचा वापर करत होती. परंतु या दंतकथांची पुष्टी अद्याप झालेली नाही.

इतिहासात ज्या स्त्रियांनी आपल्या स्वकर्तृत्वाने पराक्रम केला, त्या यादीत क्लिओपात्रा हिचे नाव आवर्जून घेतले जाते. ती सुंदर होती की नाही किंवा ती त्यासाठी काय वापर करत होती, हे जाणून घेणे गरजेचे असले तरी क्लिओपात्रा ही स्वतंत्र बुद्धिमत्ता असलेली कुशल राजकारणी स्त्री होती, हाच तिचा परिचय इतिहासावर सर्वाधिक ठसा उमटवणारा ठरावा!