सध्याच्या युगात आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. यासाठी यूपीआयची फार मदत होते. यूपीआयमुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता लाखो रुपयांचा व्यवहार एका क्षणात करता येतो. काही दिवसांपूर्वी रिझव्हा बँक ऑफ इंडियाने यूपीआय लाईट लॉन्च केले आहे. याच पार्श्वभूमीवर यूपीआय आणि यूपीआय लाईट नेमकं काय आहे? त्याचा सामान्याना काय फायदा होणार हे समजून घेऊया.

हेही वाचा >>> विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणारे ‘हायब्रीड दहशतवादी’ नेमके आहेत तरी कोण? इतर दहशतवाद्यांपेक्षा हे वेगळे कसे ठरतात?

यूपीआय म्हणजे काय?

यूपीआय म्हणजे यूनिफाईट पेमेंट्स इंटरफेस. आजकाल प्रत्येकजण याचा वापर करतोय. यूपीआयची निर्मिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने केलेली आहे. यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही दोन बँकांमध्ये पैसे पाठवता येतात. हा आर्थिक व्यवहार करताना तुमच्याकडे एक स्मार्टफोन, इंटरनेट सेवा, अॅप तसेच व्हर्च्युअल आयडी असणे गरजेचे आहे. यूपीआयमार्फत व्हर्च्यूअल आयडीच्या मदतीने किंवा बँक खाते क्रमाकं, आयएफएससी कोड, आधार क्रमांक यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार करता येतो. यूपीआयमुळे एकाच स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना अनेक बँक खाती वापरता येतात.

हेही वाचा >>> विश्लेषण: तुम्ही Windows वापरताय? ‘ब्लॅकबाइट’ ठरू शकतो मोठा धोका; Anti Virus मधूनच कम्प्युटरमध्ये करतो शिरकाव

यूपीआयचा वापर कसा करावा?

यूपीआयचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या बँकेने तुम्हाला यूपीआयची सुविधा वापरण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. एनपीसीआयने साधारण १०० सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँकांना यूपीआय प्रणालीशी जेडलेले आहे. बँक खात्यासोबतच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये यूपीआयला सपोर्ट करणारे एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. भीम अॅप, फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे यासारखी अनेक अॅप्स यूपीआयला सपोर्ट करतात. त्यानंतर तुम्हाला या अॅप्सवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वारंवार वगळले का जाते? पुढील स्पर्धेत भारताला याचा किती फटका?

यूपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी यूपीआय पिन बंधनकारक

यूपीआयवर नोंदणी करताना तुम्हाला अॅपमध्ये चार किंवा सहा अंकी पीन तयार करावा लागतो. आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला हा पीन क्रमांक प्रत्येक वेळी द्यावा लागतो. क्षणार्धात होणारे आर्थिक व्यवहार, सुलभ हाताळणी यामुळे आजकाल यूपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहारासाठी २ लाख रुपयांची मर्यादा आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : गांबियामध्ये ६६ लहान मुलांचा मृत्यू, WHO ने भारतातील कोणत्या खोकल्याच्या औषधांबाबत इशारा दिला?

यूपीआय लाईट काय आहे?

मागील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआय लाईट सेवा सुरू केली. हे ‘वन डिव्हाईस व्हॅलेट’ आहे ज्यामुळे यूपीआय पीनशिवाय छोटे आर्थिक व्यवहार करता येतील. यूपीआय लाईटचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अॅपमधील व्हॅलेटमध्ये काही पैसे टाकावे लागतील. त्यानंतर या व्हॅलेटमधील पेसै तुम्ही यूपीआय लाईटच्या माध्यमातून वापरू शकता. सध्यातरी यूपीआय लाईटची सुविधा भीम अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सध्यातरी कॅनरा बँका, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांचे ग्राहक भीम अॅपच्या माध्यमातून यूपीआय लाईटची सुविधा वापर करू शकतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग पुन्हा मुंबई महापालिकेकडे…हे रस्ते खड्डेमुक्त होतील का?

यूपीआय लाईट ही सुविधी कमी किमतीचे व्यवहार करण्यासाठी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त २०० रुपयार्यंतचे व्यवहार या माध्यमातून करता येतील. या व्यवहारांसाठी यूपीआय पीनची गरज भासणार नाही. सध्यातरी यूपीआय यूपीआय लाईटच्या माध्यमातून क्रेडिट झालेले सर्व पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात जातील.