आता प्रवाशांना विमानतळावर चांगली सुविधा मिळणार आहे. आज १५ ऑगस्ट २०२२ पासून वाराणसी आणि बंगळुरू या देशातील दोन विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मते या डिजी यात्रेमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे चेक इन मध्ये जाणारा त्यांचा वेळ वाचणार आहे. मात्र, डिजी यात्रा म्हणजे नेमकी काय? आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- विश्लेषण : २१ तोफांची सलामी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या ATAGS या नव्या तोफेचे महत्व काय?

क इनची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्यास मदत

डिजी यात्रेद्वारे विमानतळांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे प्रवाशांची तपासणी केली जाईल. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘डिजी यात्रा’ सुविधेबाबत माहिती दिली आहे. याद्वारे प्रवाशांची डिजीटल ओळख होईल आणि चेक इनची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

डिजी यात्रा म्हणजे नेमकं काय?

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या मते, डिजी यात्रा हे मोबाईल वॉलेट आधारित ओळख प्लॅटफॉर्म आहे. जे कोणत्याही प्रवाशाच्या तपशीलाची पडताळणी करण्यात मदत करेल. हे खूपच कमी पैशात काम करेल आणि प्रवाशांना त्यांचे वैयक्तिक तपशील जतन करण्यास देखील मदत करेल. डिजी यात्रा फाउंडेशन (DYF) अंतर्गत सर्व प्रवाशांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आणि विमानतळ चेक-इन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘डिजी यात्रेची मदत होणार आहे. यापूर्वी चेक इनसाठी प्रवाशांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागायचे. मात्र, ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना चेक इन करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.

हेही वाचा- विश्लेषण : पिन कोड म्हणजे काय? ही प्रणाली कसे काम करते? जाणून घ्या सर्वकाही

डिजी यात्रेसाठी मोबाईलवरून नोंदणी करता येईल

विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवाशांना मोबाईलद्वारेही डिजी यात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. मोबाइल विमानतळावर स्थापित डिजी यात्रा क्यूआर कोड स्कॅन करेल, त्यानंतर संबंधित अनुप्रयोग मोबाइलवर अपलोड केला जाईल. प्रवाशांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर इत्यादींचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर डिजी मशिनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्याने प्रवाशाचा चेहरा स्कॅन केल्यानंतर गेट उघडेल. एकदा डिजी यात्रेची नोंदणी झाल्यानंतर, प्रवासी कोणत्याही डिजी यात्रेने सुसज्ज विमानतळावरून प्रवास करताना त्यांचे चेहरे स्कॅन करून प्रवेश करू शकतील.

बंगळुरू आणि वाराणसी विमानतळावर

डिजी यात्रेच्या माध्यमातून प्रवाशाच्या बोर्डिंग पासशी संबंधित माहिती डिजीटल स्कॅन केली जाणार आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि कॉन्टॅक्टलेस होईल. ही नवी सुविधा प्रथम बंगळुरू आणि वाराणसी विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे. यानंतर ही सुविधा देशातील इतर विमानतळांवरही वेगळ्या टप्प्यात लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा- विश्लेषण: ७५ वर्षात रुपया किती घसरला? आज एक डॉलर ८० रुपयांच्या जवळ, जाणून घ्या आत्तापर्यंतचा इतिहास

या विमानतळांवरही डिजी यात्रेची सुविधा उपलब्ध होणार

बंगळुरू आणि वाराणसी विमानतळांव्यतिरिक्त आणखी ५ विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळामध्ये पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबादच्या विमानतळांचा समावेश आहे. मार्च २०२३ पासून या सर्व विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digi yatra paperless or boarding pass air travel face recognition system on indian airport dpj
First published on: 15-08-2022 at 18:48 IST