उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी आईस्क्रीम, कुल्फी असे थंड पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. आईस्क्रीम तर अगदी सगळ्याचं आवडतं त्यामुळे उन्हाळ्यात त्याची मागणी वाढते. परंतु, हे बर्फाचे थंड पदार्थ खरोखरच तुम्हाला थंडावा देतात का? तर याच उत्तर नाही असं आहे. याखेरीज आईस्क्रीममुळे तुम्हाला कडक उन्हात थंडावा जाणवतो, पण त्याचे अतिसेवन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांनाही जन्म देऊ शकते.

आईस्क्रीम थंडावा देत नाही?

खरं तर, आईस्क्रीम तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करते. थंड पदार्थ शरीर गरम कसं करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, यामागे कारण आहे. जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा तुमचे शरीर ते पचवण्याचे काम करते. ही प्रक्रिया ऊर्जा वापरते आणि तेव्हा शरीराचे तापमान वाढवते. काही अन्नपदार्थ पचण्यासाठी जास्त ऊर्जा वापरली जाते तर काहींना कमी उर्जा वापरली जाते. जसे की जास्त चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असलेले अन्न पचण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा
Benefits Of Eating Ghee With Black Pepper Daily Morning after waking up How much ghee is okay to eat in a day Ayurveda experts Study
तुपात काळ्या मिरीची पावडर मिसळून खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतील? रोज किती व कसे खावे मिश्रण?

आईस्क्रीम खाताना तुम्हाला थंडपणा जाणवतो पण त्यात फॅटचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच तुमच्या शरीराला ते पचण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे तुमच्या शरीरात उष्णता वाढते आणि ते गरम होते. याचा अर्थ असा की, आईस्क्रीम खाताना ते कितीही थंड वाटत असलं तरी ते शरीराला थंडावा देत नाही तर, उलट शरीरात उष्णता निर्माण करतं.

आइस्क्रीम खाण्याचे फायदे

  • उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने ताजेतवाने वाटते, थंडावा जाणवतो.
  • चॉकलेट आईस्क्रीम खाल्ल्याने चॉकलेटमध्ये असलेल्या पोषक तत्वांचे अनेक फायदे होतात.
  • आईस्क्रीममध्ये दूध, ड्रायफ्रूट्स, चेरी देखील असतात, ज्यामुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
  • आईस्क्रीम खाल्ल्याने मन प्रसन्न होते, तणाव दूर होतो.
  • जर तुम्हाला अल्सरचा त्रास होत असेल तर आईस्क्रीम खाल्ल्याने जळजळ आणि वेदना कमी होतात.

आइस्क्रीमचं अतिसेवन ठरू शकतं घातक

  • आईस्क्रीममध्ये दूध, चॉकलेट, अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स, चेरी इत्यादींचा वापर केला जातो, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत, परंतु अधिक आइस्क्रीम खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
  • आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज, फॅट असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • आइस्क्रीममध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या अतिसेवनामुळे पोटात चरबी जमा होऊ लागते. तथापि, कर्बोदकांमधे ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे, म्हणून तुम्ही आईस्क्रीमचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
  • आइस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. आइस्क्रीम खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जर एखाद्याला उच्च रक्तदाब, जास्त वजन असेल, तर दररोज खूप जास्त आइस्क्रीम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
  • एका संशोधनानुसार, सॅच्युरेटेड फॅट आणि साखरयुक्त आहारामुळे संज्ञानात्मक कौशल्ये आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. हे फक्त एक कप आईस्क्रीम खाऊन देखील होऊ शकते.
  • आईस्क्रीममध्ये भरपूर साखर असते, ज्याचे सेवन केल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्यांनी आईस्क्रीमचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
  • आइस्क्रीममध्ये फॅट जास्त असते, जे पचायला जास्त वेळ लागतो. सहसा यामुळे सूज येणे, अपचनाची समस्या उद्भवते. रात्री आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते लवकर पचत नसल्याने चांगली झोप येत नाही.