Digital pan card guide explains the complete process to download digital pan card online from the income tax portal: सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड (PAN Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र ठरले आहे. कार खरेदी, बँक व्यवहार, डीमॅट खाते किंवा ५० हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट करण्यासाठी पॅन नंबर देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्येक वेळी मूळ कार्ड किंवा त्याची झेरॉक्स प्रत सोबत बाळगणे कठीण होते. यावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे ‘डिजिटल पॅन कार्ड’ (e-PAN). हे कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये सुरक्षित राहते आणि सर्व सरकारी व आर्थिक व्यवहारांसाठी पूर्णपणे वैध आहे.

झेरॉक्सऐवजी डिजिटल पॅन कार्ड

थोडक्यात आपल्याला नेहमीच आपले पॅन कार्ड तसेच त्याची झेरॉक्स कॉपीसुद्धा जवळ बाळगावी लागते. यावर पर्याय म्हणजे आपण आपले डिजिटल पॅन कार्ड घेऊ शकता व हे पॅन कार्ड आपण कुठेही मेल अथवा व्हॉट्सअॅपवर गरज असेल तेव्हा देऊ शकता यासाठी फिजिकल पॅनकार्ड व त्याची झेरॉक्स प्रत जवळ ठेवण्याची गरज नाही. विशेष म्हणजे नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट २०२५ नुसार १ एप्रिल २०२६ पासून पुढील सर्व व्यवहारांना उदा:बँक खाते /डी-मॅट,एनपीएस खाते उघडताना तसेच इन्श्युरन्स पॉलिसी नव्याने घेताना /जमीन खरेदी/ विक्री/ कार विक्री करताना रु.२ लाखापुढील सेवा वस्तूची खरेदी रोखीने करताना तसेच रु.५०००० पुढील कॅश डिपॉझिट करताना पॅन नंबर देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे अशा प्रत्येक वेळी पॅन कार्डची झेरॉक्स प्रत देण्याऐवजी डिजिटल पॅन कार्ड देणे खूप सोपे आहे.

प्रत्येक वेळी सोबत झेरॉक्स ठेवण्याची गरज नाही आणि म्हणून आजकाल आपल्याकडे डिजिटल पॅन कार्ड (ई -पॅन कार्ड ) असणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने डिजिटल पॅन कार्ड म्हणजेच ई -पॅन कार्ड कसे मिळते हे आज आपण पाहू.

How to download digital pan card online | Income tax e filing portal e PAN card | डिजिटल पॅन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची पद्धत | ई-पॅन कार्डचे फायदे आणि नियम
डिजिटल पॅन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत (Image- Gemini)

डिजिटल पॅन कार्ड (ई -पॅन कार्ड ) कसे मिळवाता येते ?

  • डिजिटल पॅन कार्ड मिळविणे आता खूप सोपे झाले आहे. ही प्रक्रिया इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत ई -फायलींग पोर्टल वरून करता येते. व ती अशी आहे.
  • इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई -फायलिंग पोर्टलवर (eportal.incometax.gov.in) या पोर्टलवर जा.
  • लॉग-इन करा व यासाठी तुमचा युजर आयडी (जो तुमचा पॅन नंबर असतो. आपण या आधी रजिस्टर नसाल तर रजिस्टर नाऊ हा पर्याय निवडून नव्याने रजिस्टर करा)
  • लॉग-इन झाल्यावर डॅश बोर्डवर माय प्रोफाईल वर क्लिक करून प्रोफाईल सेटींग्ज मध्ये डाउन लोड ई-पॅन क्लिक करा.
  • त्यांनतर आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी एन्टर करून व्हेरिफिकेशन करा .
  • यांनतर तुमचे डिजिटल पॅन कार्ड पीडीएफ स्वरूपात मिळेल ते उघडून सेव्ह करा आणि हवी असल्यास प्रिंट देखील घेऊन ठेवा. पीडीएफ फाईल उघडण्यासाठी पासवर्डची गरज असते, हा पासवर्ड सामान्यतः आपली जन्म तारीख (dd/mm/yyyy) या स्वरूपात असतो.

विशेष म्हणजे यासाठी केवळ काही मिनिटंच लागतात व ३० दिवसांपर्यंत कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. जर ३० दिवसांनंतर डाउनलोड केले तर रु. ८.२६ इतके नाममात्र शुल्क द्यावे लागते.

तुम्ही प्रथमच पॅन कार्डची मागणी करत असाल तर या पद्धतीने डिजिटल पॅन कार्ड मिळते का?

नाही. यासाठी आपल्याला एनएसडीएल (protean) किंवा युटीआय -टीएसएल या मान्यता प्राप्त एजन्सी द्वारेअर्ज करावा लागतो. इथे आधारकार्ड आधारीत ई -साईन सुविधा वापरून लगेचच डिजिटल पॅन कार्ड मिळू शकते.

डिजीटल पॅन कार्ड (ई -पॅन कार्डचे ) फायदे काय?

  • १) त्वरित उपलब्धता : फिजिकल कार्डप्रमाणे ८-१० दिवस थांबावे लागत नाही. काही मिनिटांतच पोर्टलवर डाउनलोड करता येते.
  • २)पूर्णपणे पेपरलेस : कागदी अर्ज, फोटो व सही यांची गरज पडत नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असते .
  • ३) सहजपणे कुठेही घेऊन जाता येते, कारण आपण ते मोबाईल/ लॅपटॉप तसेच क्लाउड मध्ये ठेवू शकतो व हवे तेव्हा मेल किंवा व्हाट्सअप वर शेअर करू शकतो. प्रिंट ठेवण्याची आवश्यकता नसते.
  • ४) कार्ड हरवण्याची भीती नाही: फिजिकल कार्ड हरवले अथवा चोरीस गेल्यास नवीन कार्ड मिळविण्यासाठी पैसे व वेळ लागतो.
  • ६)सुरक्षितता: आपल्या डिजिटल पॅन कार्डला जन्म तारीख किंवा विशिष्ट पासवर्ड असल्याने अन्य कोणी पीडीएफ उघडू शकत नाही.
  • ७) डिजिटल असल्याने पर्यावरणपूरक असते. कारण यात प्लास्टिक, कागद, शाई यांचा वापर होत नाही.
  • ८) डिजिटल पॅन वरील क्यू आर कोड स्कॅन करून याची सत्यता पडताळून पाहता येते.

डिजिटल पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्ड सारखेच सर्व सरकारी व आर्थिक व्यवहारांसाठी वैध आहे का?

होय , प्राप्तिकर कायद्यानुसार डिजिटल (ई -पॅन ) कार्ड फिजिकल पॅन कार्डसारखेच सर्व सरकारी व आर्थिक व्यवहारांसाठी वैध आहे

डिजिटल (ई -पॅन ) कार्ड सुरक्षित आहे का ?

डिजिटल पॅन कार्ड वापरणे निश्चितच सोयीचे आहे व सुरक्षितसुद्धा आहे. तथापि, आपले डिव्हाईस किंवा ई -मेल हॅक झाला तर क्यू आर कोडचा दुरुपयोग होऊ शकतो. यासाठी आपले डिजिटल पॅन कार्ड केवळ ई -फाईलिंग पोर्टलवरूनच डाऊनलोड करावे. आपला मोबाईल तसेच ई -मेलचा पीन व पासवर्ड स्ट्रॉन्ग असेल याची दक्षता घ्यावी. क्यूआर कोड सार्वजनिक ठिकाणी शेअर करणे टाळावे. तसेच पॅन डिजिटल फाईल इनक्रिप्टेड फोल्डर मधे ठेवावी.

थोडक्यात असे म्हणता येईल की, आता प्रत्येकाने आपले पॅन कार्ड डिजिटल करून घ्यावे; कारण डिजिटल पॅन कार्ड वापरणेच सोयीचे व हितावह आहे.