scorecardresearch

Premium

विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?

How Do Dogs Get signs of Earthquake: जरी प्राण्यांना भूकंपाची चाहूल आपल्याआधी लागत असली तरी ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो?

Earthquake How Dogs and Cats Get The signs of natural Calamities Before Humans
प्राण्यांना माणसांपेक्षा काही क्षण आधीच जमिनीच्या पृष्ठभागाखालील हालचाल जाणवू शकते. (फोटो: Pixabay)

How Do Dogs Get signs of Earthquake: काही दिवसांपूर्वी भारत आणि नेपाळमध्ये ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे एक घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच भूकंपामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जिल्ह्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर भारतात दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, लखनऊ, बरेली आणि इतर उत्तरेकडील शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घराचे छप्पर, घरातील फर्निचर अक्षरशः थरथरत होते असा अनुभव प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.भारतात भूकंपामुळे मृत्यू किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

एकूणच या दोन दुर्घटनांतर भूकंपाविषयी अनेक प्रश्न समोर येत आहेत, आणि त्यातील सर्वाधिक विचारली जाणारी शंका म्हणजे प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते का? भूकंप होण्याच्या काही क्षण आधी ते असामान्यपणे वागू लागतात. असे का होते? यासंदर्भात काही अभ्यासकांचे दावे आज आपण जाणून घेणार आहोत.

kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
ashwagandha
Health Special: पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर अश्वगंधाचा उतारा
madhu chopra
Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”
300 years Later Ganesh Chaturthi Surya Shani Rajyog To Bring More Power Money Love To These Lucky Zodiac Signs Bhavishya
३०० वर्षांनी गणेश चतुर्थीला ‘या’ राशींच्या मंडळींची झोळी धन- धान्य- सुखाने भरणार? बाप्पा देणार बक्कळ पैसा

पशु वैद्यांच्या तज्ज्ञांच्या हवाल्याने डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. भूकंप जमिनीच्या पृष्ठभागावर जाणवण्यापूर्वी जमिनीतील कंपनीचा अंदाज प्राण्यांना येऊ शकतो. डॉ. रीटा गोयल यांच्या माहितीनुसार, प्राण्यांना याच गुणांमुळे भूकंपाची माहिती आपल्याआधी मिळते, याशिवाय प्राणी बहुतांशवेळाजमिनीवर झोपतात. त्यांचा जमिनीशी थेट संपर्क आहे. म्हणूनच प्राण्यांना माणसांपेक्षा काही क्षण आधीच जमिनीच्या पृष्ठभागाखालील हालचाल जाणवू शकते.

काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की प्राण्यांना त्यांच्या ‘फर’ (शरीरावरील केस) मधून मोठ्या खडकांच्या दाबामुळे तयार होणाऱ्या हवेचा दाब जाणवू शकतो. परिणामी भूकंपाच्या आधी क्रिस्टल्सच्या क्वार्टरमधून बाहेर पडलेल्या वायूंचा वास सुद्धा त्यांना आधी येऊ शकतो.

महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरी प्राण्यांना भूकंपाची चाहूल आपल्याआधी लागत असली तरी आपण त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो? तर प्राणी मित्र व अभ्यासकांच्या माहितीनुसार जर घरातली मांजरे, कुत्री अचानक अस्वस्थ वाटू लागली, विनाकारण दुःखी किंवा घाबरलेली दिसू लागली तर हा भूकंपाचा संकेत असू शकतो. अर्थात यावरून कोणताही निकष काढता येणार नाही पण जर आपल्याला प्राण्यांच्या वागणुकीत अत्यंत सूचक व तीव्र बदल दिसून आले तर हे आपत्तीचे लक्षण असू शकते.

विश्लेषण: तणावाग्रस्त व्यक्तीचा वास कसा असतो? कुत्र्यांना कशी लागते ताण व आजाराची चाहूल?

प्राण्यांना माणसांआधी आपत्तीची चाहूल लागते याचे एक उदाहरण म्हणजे, इटलीत २००९ साली भूकंपाच्या काही क्षण आधी तलावातील बेडूक बाहेर आले होते तर जपान मध्ये २०११ साली भूकंप येण्याआधी समुद्रातील ओरफिश किनाऱ्यालगत आढळले होते. या घटनेनंतर जपानी नागरिक या माश्यांना मेसेजर फ्रॉम सी गॉड मानतात. या दोन्ही घटनांना योगायोग मानले जाऊ शकते कारण प्राण्यांना आपल्याआधी आपत्तीची चाहूल लागते याबाबात उदाहरणे समोर असली किंवा संशोधन सुरु असले तरी अद्याप याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Earthquake how dogs and cats get the signs of natural calamities before humans svs

First published on: 14-11-2022 at 20:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×