देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या छापेमारीसंदर्भातील दोन प्रकरणं चांगलीच चर्चेत आहेत. यामधील पहिलं प्रकरण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरांवरील छापेमारी. ईडीला राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली आहे तर अर्पिता यांच्या दोन वेगवगेळ्या फ्लॅटमध्ये ५० कोटींहून अधिक रक्कम सापडलीय. अर्पिता यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिनेही ईडीला सापडले आहेत. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता यांचा शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंध असल्याचा दावा या छापेमारीनंतर केला जातोय.

नक्की पाहा >> Photos: ४७ कोटी ९० लाखांची कॅश सापडलेल्या ‘त्या’ प्रकरणाला नवं वळण? “पार्थ चॅटर्जींना सोडणार नाही, त्यांनी माझ्या पत्नीचा अपमान…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन बहुचर्चित प्रकरणांची वृत्तवाहिन्यांपासून ते समाजमाध्यमांपर्यंत सगळीकडेच तुफान चर्चा दिसून आली. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आता लोकांकडून नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे अशापद्धतीचे प्रश्नही सर्च केले जात आहेत. घरात किती रोख रक्कम ठेवता येते अथवा किती सोन्याचे दागिने घरात ठेवावेत यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटची मदत घेत असल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

घरी किती पैसे ठेवता येतात?
आपल्या इच्छेप्रमाणे घरी पैसे ठेवण्याची मूभा भारतीय नागरिकांना आहे. मात्र हे पैसे नेमके कोणत्या माध्यमातून आले यासंदर्भातील सविस्तर माहितीबद्दल तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली तर त्याची उत्तरं संबंधितांनी देणं आणि त्यासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ तपास यंत्रणांना एखाद्या घरामध्ये छापेमारीदरम्यान एक कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अशावेळी ही रक्कम कुठून आली किंवा या रक्कमेच्या कमाईचा स्त्रोत काय हे संबंधित व्यक्तींनी तपास यंत्रणांना सांगणं बंधनकारक असतं. जर या पैशांसंदर्भातील पुरावे आणि योग्य माहिती देता आली नाही किंवा ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रकरणाच्या तपासात व्यक्ती दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला एकूण रक्कमेच्या १३७ टक्क्यांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

नक्की वाचा >> “तीन कोटी रोख देऊन संजय राऊत यांनी अलिबागमध्ये…”; ईडीचा मोठा खुलासा; छापेमारीत हाती लागली महत्त्वाची कागदपत्रं

किती सोनं घरात ठेवता येतं?
आयकर विभागाच्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवता येतं याबद्दल जाणून घेऊयात. या नियमांनुसार लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही वेगवगेळे प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे.

लग्न झालेली माहिला – ५०० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेऊ शकते
अविवाहित माहिला – २५० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवण्यास परवानगी
कुटुंबातील पुरुष – १०० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवता येते

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?

वर नमूद करण्यात आलेली मर्यादा ही कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. जर कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारं सोनं घरात छापेमारीदरम्यान सापडलं तर आयकर अधिकाऱ्यांना ते सोनं जप्त करण्याचा अधिकार असतो. शिवाय, कौटुंबिक चालीरीती आणि परंपरा यांसारख्या गोष्टींच्याआधारे जास्त प्रमाणात सोने ठेवण्यास परवानगी द्यावी की नाही हे छापेमारीदरम्यान उपस्थित असणाऱ्या मूल्यांकन अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र या अटी आणि शर्थीअंतर्गतही अगदीच कमी प्रमाणात सूट दिली जाते.

नक्की वाचा >> विश्लेषण : संजय राऊत गोत्यात आले, ते पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

वरील सोन्यासंदर्भातील मर्यादा या प्रत्येक करदात्या व्यक्तीला लागू आहेत. मात्र एकाच घरात अनेक कुटुंब राहत असतील तर घरातील प्रत्येक पात्र सदस्यानुसार त्या घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवण्यास परवानगी आहे हे निश्चित केलं जातं. मात्र संयुक्तपणे करदात्यांच्या नावे लॉकर्स असतील तर हा संभ्रम टाळता येतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed recovers rs 11 lakh from sanjay raut rs 50 crore from arpita mukherjee know how much cash gold you can keep at home without fearing income tax raids scsg
First published on: 04-08-2022 at 09:34 IST