Elon Musk Twitter Deal : एव्हाना एलॉन मस्क हे नाव जगभरातल्या बहुसंख्य नागरिकांसाठी परिचित झालं आहे. कायमच काहीतर हटके गोष्टींच्या संदर्भात त्यांच्या नावाची चर्चा होत असते. टेस्ला कंपनीचे कार्यकारी अधिकारी असलेले एलॉन मस्क हे मध्यंतरीच्या काळात ट्विटर खरेदीच्या करारामुळे चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात हा करार बारगळला आणि ट्विटर विरुद्ध मस्क असा खटलाच न्यायालयात उभा राहिला. ४४ अब्ज डॉलर्सचा हा करार मोडल्याप्रकरणी ट्विटरनं मस्क यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यानंतर हल्लीच खटला मागे घेतल्यास ट्विटरसोबत पुन्हा करार करण्यास इच्छुक असल्याचं मस्क यांनी सांगितलं. यानंतर आता आणखीन एका नव्या संकल्पनेच्या संदर्भात मस्क यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण मस्क यांना ‘सुपर अॅअ‍ॅप’ बनवायचं आहे. नेमका काय आहे हा प्रकार?

चर्चेला मस्क यांचं ‘ते’ ट्वीट कारणीभूत!

एलॉन मस्क ट्विटरच्या करारामधून अजूनही पुरते मोकळे झालेले नसताना त्यांनी ‘सुपर अ‍ॅप’तयार करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘एव्हरीथिंग अ‍ॅप’च्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं म्हटल्यामुळे या नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. “ट्विटर खरेदी करणं हे ‘एव्हरीथिंग अ‍ॅप'(सर्वकाही एकाच अॅपमध्ये) तयार करण्याच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने घडवून आणू शकेल”, असं त्या ट्वीटमध्ये मस्क यांनी म्हटलं आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?

‘एव्हरीथिंग अ‍ॅप’ ही संकल्पना बहुतेक वेळा ‘सुपर अ‍ॅप’ या नावानेही चर्चेत असते. ही संकल्पना आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने बहुश्रुत आहे. जगभरातल्या टेक विश्वातील नामांकित कंपन्यांनी या संकल्पनेचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सुपर अ‍ॅप’ हा नेमका काय प्रकार आहे?

‘सुपर अ‍ॅप’ हा प्रकार अनेक पद्धतीने ओळखला जातो. एलॉन मस्क याला ‘एव्हरीथिंग अ‍ॅप’ असं म्हणतात. याला ‘स्विस नाईफ ऑफ मोबाईल अ‍ॅप्स’ असंही म्हणतात. याचा साधा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे अनेक गोष्टी किंवा सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे मोबाईल अ‍ॅप. यामध्ये मेसेजिंग (व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम इ.), सोशल नेटवर्किंग (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ.), ऑनलाईन पेमेंट (जीपे, फोनपे, पेटीएम इ.), ई-कॉमर्स (अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट इ.) अशा प्रकारच्या सर्व सेवा एकाच अॅपमध्ये उपलब्ध केल्या जातात. ‘या प्रकारचे मोबाईल अ‍ॅप आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कारण या भागात राहाणाऱ्या बहुतांश नागरिकांसाठी मोबाईल फोन हेच इंटरनेट सेवेचा लाभ घेण्याचं एकमेव साधन आहे”, असं निरीक्षण न्यूयॉर्क विद्यापीठातील प्राध्यापक स्कॉट गॅलोवे यांनी नमूद केलं आहे.

सध्या असे कोणते ‘सुपर अ‍ॅप’ वापरात आहेत?

एका आकडेवारीनुसार, चीनमधील WeChat हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सर्वाधिक वापरलं जात आहे. दर महिन्याला या अ‍ॅपचे एक बिलियन युजर्स नोंद होत आहेत. चीनमधील लोकांमध्ये हे मोबाईल अ‍ॅप सर्वात लोकप्रिय ठरलं आहे. या मोबाईल सुपर अ‍ॅपच्या मदतीने युजर्स कॅब बुक करू शकतात, त्यांच्या मित्रांना पैसे पाठवू शकतात किंवा दुकानात ऑनलाईन पेमेंटही करू शकतात. याचप्रमाणे आशियाच्या काही भागात Grab हे मोबाईल सुपर अ‍ॅपही लोकप्रिय असून त्या माध्यमातून ऑनलाईन जेवणाच्या ऑर्डर, कॅब बुक करणे, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?

एलॉन मस्क यांना ‘सुपर अ‍ॅप’ का बनवायचं आहे?

जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेत एलॉन मस्क यांनी ‘सुपर अ‍ॅप’चा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार बोलून दाखवला आहे. या वर्षी जून महिन्यात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान एलॉन मस्क यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. “WeChat सारखं कोणतंही अ‍ॅप आशियाच्या बाहेर इतर देशांना वापरासाठी उपलब्ध नाही. चीनमध्ये तर तुम्ही WeChatवर जगता. त्यामुळे अशा प्रकारचं अ‍ॅप बाहेरच्या जगासाठी तयार करण्याची मोठी संधी आहे”, असं ते म्हणाले.

ट्विटरवर आणखीन पर्याय उपलब्ध होणार?

ट्विटरवर भविष्यात आणखीन नवनवे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचे संकेत एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी साधलेल्या या संवादामध्ये देण्यात आले आहेत. २३७ मिलियन युजर्सवरून किमान एक बिलियन युजर्सपर्यंत ट्विटरला नेण्याचं लक्ष्य असल्याचं एलॉन मस्क म्हणाले होते. मस्क यांनी अनेकदा त्यांच्या जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा करताना ट्विटरवर डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.