अ‍ॅपलला मोठा धक्का देत, युरोपियन युनियन सदस्य राष्ट्रांनी ७ जून २०२२ रोजी एकमत केले की मोबाइल, टॅब्लेट आणि कॅमेरा यांचे मोबाइल चार्जिंग पोर्ट समान असेल. जगातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कंपनी अधिकृत निर्णयाद्वारे आपल्या उपकरणांमध्ये कोणते चार्जिंग पोर्ट लावायचे हे ठरणार आहे. युरोपियन युनियनच्या कायदा निर्मात्यांनी एक तात्पुरता करार केला आहे ज्यामध्ये मोबाइल डिव्हाइस उत्पादकांना २०२४ पासून या प्रदेशात विकल्या जाणार्‍या उपकरणांसाठी मानक यूएसबी-सी टाईप चार्जिंग पोर्ट समाविष्ट करणे अनिवार्य आहे. याचा संपूर्ण जागतिक स्मार्टफोन बाजारावर परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषक म्हणतात.

समान पोर्टचा चार्जर याचा अर्थ काय ?

  • नवीन नियमांनुसार, युरोपियन देशांमधील ग्राहकांना प्रत्येक वेळी नवीन डिव्हाइस खरेदी करताना वेगळ्या चार्जिंग डिव्हाइस आणि केबलची आवश्यकता भासणार नाही.
  • ते त्यांच्या सर्व लहान आणि मध्यम आकाराच्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी एकच चार्जर वापरू शकतात.
  • २०२४ च्या शरद ऋतूपर्यंत, यूएसबी टाइप-सी हे एकच चार्जर सर्व मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांसाठी वापरले जाईल असं मान्य केलं गेलं.
  • मोबाईल फोन, टॅब्लेट, ई-रीडर, इअरबड्स, डिजिटल कॅमेरा, हेडफोन आणि हेडसेट, हँडहेल्ड व्हिडीओगेम कन्सोल आणि वायर्ड केबलद्वारे चार्ज करण्यायोग्य पोर्टेबल स्पीकर अशी उत्पादने बनवणाऱ्यांनी युएसबी टाइप-सी पोर्टसह सुसज्ज असणे आवश्यक आहे .
  • कायदा लागू झाल्यानंतर ४० महिन्यांपर्यंत लॅपटॉपलाही युएसबी टाइप-सी पोर्ट असणे गरजेचे आहे.
  • वेगवान चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या डिव्हाइसेससाठी चार्जिंगचा वेगही सुसंगत केला जाईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही सुसंगत चार्जरसह त्यांचे डिव्हाइस समान वेगाने चार्ज करता येईल.
  • युरोपियन संसदेने एका निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांना नवीन उपकरणांच्या चार्जिंग फीचर्सबद्दल स्पष्ट माहिती प्रदान केली जाईल, ज्यामुळे ते वापरत असलेले चार्जर सुसंगत आहेत की नाही हे पाहणे त्यांना सोपे होईल.
  • खरेदीदारांना नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्जिंग डिव्हाइससह किंवा त्याशिवाय खरेदी करायची आहेत की नाही हा देखील त्यांचा निर्णय असेल.
  • युरोपियन संसदेनुसार, या नवीन जबाबदाऱ्यांमुळे चार्जरचा पुन्हा वापर होईल आणि ग्राहकांना अनावश्यक चार्जर खरेदीवर वर्षाला २५० दशलक्ष युरोपर्यंत बचत करण्यात मदत होईल. विल्हेवाट लावलेले आणि न वापरलेले चार्जरचा वार्षिक अंदाजे ११,००० टन ई-कचरा तयार होतो.
  • या योजनेमुळे सर्व कंपन्यांना – विशेषत: अ‍ॅपलच्या फोन, टॅब्लेट, ई-रीडर आणि डिजिटल कॅमेरे यांना युएसबी-सी चार्जर वापरण्यास भाग पाडेल, असं सांगण्यात आले आहे.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
cigarette, cigarette ban, Britain,
विश्लेषण : ब्रिटनची वाटचाल संपूर्ण सिगारेटबंदीकडे… काय आहे नवा धूम्रपान बंदी कायदा?
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?