scorecardresearch

विश्लेषण : बॉलिवूडच नाही, हॉलिवुडमध्येही घराणेशाहीवरून वाद; ‘नेपो बेबी’ म्हणत स्टार कीड्स होतायत ट्रोल! वाचा नेमकं घडतंय काय?

चित्रपटच नव्हे तर शास्त्रीय संगीतातदेखील प्रत्येक घराण्याचे शिष्य ती परंपरा पुढे नेत असतात.

विश्लेषण : बॉलिवूडच नाही, हॉलिवुडमध्येही घराणेशाहीवरून वाद; ‘नेपो बेबी’ म्हणत स्टार कीड्स होतायत ट्रोल! वाचा नेमकं घडतंय काय?
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

‘घराणेशाही’ ‘नेपोटीझम’ हे शब्द आपल्याला नवे नाहीत. गेली दोन वर्ष या शब्दांवरून बॉलिवूडमध्ये बरीच उलथापालथ झाली. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेकांनी टीका केली. मात्र हा प्रकार केवळ आपल्याकडे नसून हॉलिवूडमध्येदेखील यावरून आता एका वाद निर्माण होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एका प्रसिद्ध मीडिया हाऊसने ‘द इयर ऑफ द नेपो बेबी’ यावर एक एक विस्तृत लेख लिहिला. ज्यात सिंडी क्रॉफर्डची मुलगी काया गेर्बर, रॉबर्ट डाउनी सीनियरचा मुलगा रॉबर्ट डाउनी ज्युनियर, फिल कॉलिन्सची मुलगी लिली कॉलिन्स, रीझ विदरस्पूनचा मुलगा डेकॉन रीझ फिलिप, डॉन जॉन्सनची मुलगी डकोटा जॉन्सन यासारख्या लोकप्रिय कलाकारांना घराणेशाहीची बाळ असे संबोधले गेले.

रॉबर्ट डाउनी ज्युनियर आता जगभरात ओळखला जातो हे नाव आता सर्वपरिचित आहे. टिमोथी चालमेटने प्रशंसनीय भूमिकांमध्ये अभिनय केला आहे. लिली कॉलिन्स या स्टार किड्सनी जरी आपल्या प्रतिभेने नाव लौकिक कमावले असले तरी त्यांना घराणेशाहीचा टॅग पडलाच आहे. अशा स्टार किड्सना केवळ घराणेशाहीचा ठपका लावणे हे चुकीचे आहे.

घराणेशाही आज प्रत्येक क्षेत्रात आहे, अगदी छोट्या मोठ्या उद्योगांमध्येदेखील घराणेशाही अस्तित्वात असते, आज किराणा मालाच्या दुकानातदेखील मालक स्वतःच्या मुलालाचनंतर दुकान चालवायला देतो. क्वचित कधी कधी मालकाला अपत्य नसेल तर तो उद्योग दुसऱ्याला चालवण्यास देतो आणि त्याचा नफा स्वतःकडे ठेवतो, मनोरंजन क्षेत्रात हा प्रकार ठळकपणे दिसून येतो. चित्रपटच नव्हे तर शास्त्रीय संगीतातदेखील प्रत्येक घराण्याचे शिष्य ती परंपरा पुढे नेत असतात.

विश्लेषण: उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे कारवाई होणार? याबाबत कायद्यात शिक्षेची काय आहे तरतूद?

बॉलिवूड हॉलीवूडच नव्हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्टार्सचा नावाचा, प्रसिद्धीचा त्यांच्या मुलांना फायदा होतो. चिरंजीवीचा मुलगा राम चरण, निर्माता अल्लू अरविंदचा मुलगा अल्लू अर्जुन, एनटी रामाराव यांचा मुलगा एनटी रामाराव जूनियर, ही काही उदाहरणे बघू शकतो जी आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीची नाव म्हणून घेतली जातात.

घराणेशाची मुद्दा जरी आज गाजत असला तरी यावर पहिल्यांदा अभिनेत्री कंगना रणौत हिने भाष्य केले होते. कॉफी विथ करण कार्यक्रमात तिने करण जोहरला घराणेशाहीचा जनक म्हणून संबोधले होते. २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर, बॉलिवूडच्या दिग्गजांवर आरोप करण्यात आला की ज्यांनी स्वतःहून ते तयार केले इतर कलाकरांना फारशी संधी दिली नाही.

विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

आता गेल्या महिनाभरापासून हॉलिवूडमध्ये ही चर्चा रंगत आहे. दोन दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेली अभिनेत्री केट हडसनने अलीकडेच या चर्चेला उत्तर देताना म्हटले आहे की घराणेशाही बद्दल मला काही फरक पडत नाही. मी माझ्या मुलांकडे बघतेआम्ही एक कथा सांगणारे कुटुंब आहोत. ते आपल्या रक्तात नक्कीच आहे. लोक त्यांना हवे ते म्हणू शकतात, परंतु ते बदलणार नाही. मला असे वाटते की इतर उद्योग आहेत जेथे ते सामान्य आहे. केट हडसन ही गायक बिल हडसन आणि अभिनेता गोल्डी हॉन यांची मुलगी आहे. ‘नेपो-बेबीज’ टॅगमध्ये करण्यासाठी हडसनप्रमाणे इतर अनेक कलाकार सामील झाले आहेत. जेमी ली कर्टिस आणि लिली-रोज डेप यांनीही या टॅगवर टीका केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 18:48 IST

संबंधित बातम्या