मागील दोन वर्षांपासून जगभरात करोनाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. यादरम्यान करोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटनं करह माजवला आहे. अशातच आता सुपरबगने अनेकांची चिंता वाढवली आहे. सुपबगमुळे दरवर्षी १० दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होईल, अशी अंदाज चीनमधील शात्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच मांसाहार करणाऱ्यांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे शात्रज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, हे सुपरबग नेमकं काय आहे? आणि मांसाहार करणाऱ्यांना धोका कसा आहे? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: रक्ताने काढलेली चित्रं का ठरतायत प्रेमाचं प्रतीक? विक्रीत प्रचंड वाढ होताच सरकारने काय घेतला निर्णय?

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

सुपरबग नेमकं काय आहे?

सुपरबग हा एक जीवाणू ( Bacteria) आहे. मानवी शरीरामध्ये प्रतिजैविकांच्या (Antibiotic) अतिवापरामुळे हे सुपरबग तयार होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गावर प्रतिजैविके घेतल्यानंतर सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. आयसीएमआरच्या माहितीनुसार, न्यूमोनिया (Pneumonia) आणि सेप्टिसिमियाच्या (Sepsis) उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम (Carbapenem ) ही औषध आता सुपरबगवर परिणामकारक राहिलेली नाहीत. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे.

मांसाहार करणाऱ्यांना सुपरबगचा धोका?

मागील काही वर्षात प्राणी लवकर मोठे व्हावेत, त्यांचे वजन वाढावे यासाठी त्यांना प्रतिजैविके (Antibiotic ) दिली जातात. ही प्रतिजैविके प्राणांबरोबर मानवाच्या शरीरावरही वाईट परिणाम करतात. अतिप्रमाणात मांसाहार केल्याने ( विशेषत: चिकन) हीच प्रतिजैविके मानवाच्या शरीरात जाऊन त्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ही मानवाचे शरीर प्रतिजैविके प्रतिकारक ( Antibiotic Resistant ) म्हणून त्यामुळे कोणत्याही औषधांचा परिणाम होणार नाही. अशा स्थितीत छोटा संसर्गही मानवासाठी जीवघेणा ठरू शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ओमायक्रॉनचा एक्सबीबी १.५ (XBB.1.5) किंवा क्राकेन हा उपप्रकार किती घातक?

भारतातही होतो प्रतिजैविकांचा वापर

ऑक्टोबर २०१८ मध्ये लंडनमधील ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात प्राण्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिजैविके दिली जातात. विशेष म्हणजे भारतात जी औषधं प्रतिजैविके म्हणून प्राण्यांना दिली जातात, त्या औषधांवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. प्राण्यांना दिली जाणारी औषधं केवळ प्राण्यांसाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे, असे या अहवालात सांगण्यात होते.

प्रतिजैनिकं म्हणून कोणती औषधं दिली जातात?

प्राण्याचे वजन वाढावे आणि त्यांनी वाढ लवकर व्हावी, यासाठी त्यांनी टायलोसिन हे औषध जातं. १९९८ मध्ये, कोंबडी आणि शेळ्यांवर टायलोसिनच्या वापरावर युरोपियन युनियनकडून बंदी घालण्यात आली होती. या औषधामुळे एरिथ्रोमाइसिनचा (Erythromycin) प्रभाव कमी होतो, असं युरोपियन युनियनकडून सांगण्यात आलं होतं. तसेच २००६ मध्ये युरोपियन युनियने प्राण्यांच्या विकासाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिजैविकावर बंदी घातली होती.

हेही वाचा – विश्लेषण: अमेरिकेत आता फार्मसीच्या दुकानात मिळणार गर्भपाताची गोळी; गर्भपाताचा मुद्दा तिथे का गाजतोय?

आशियातील सर्वच देशांमध्ये होतो प्रतिजैविकांचा वापर?

जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने २०१९ मध्ये प्रतिजैविकांच्या वापरासंदर्भात एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार १५५ पैकी ४५ देशांत कोंबड्यांना प्रतिजैविकं दिले जात असल्याचं पुढे आलं होतं. यामध्ये आशिया खंडातील भारतातसह जवळपास सर्वच देशांचा समावेश होता. तसेच प्राण्यांना प्रतिजैविकं देणं बंद करावं, असे आवाहनही या संघटनेकडून करण्यात आले होते.