सध्या राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळेच जण वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. अभिनेते आणि भाजपाचे माजी खासदार परेश रावल सध्या अडचणीत सापडले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रचार करत असताना भाषण करताना त्यांनी एक विधान केले ज्यामुळे बंगाली भाषिक नाराज झाले आहेत. इतकं की हे प्रकरण आता पोलि‍सांपर्यंत गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय?

परेश रावल दिग्गज अभिनेते आहेतच गेली अनेकवर्ष ते बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. गुजरातच्या वलसाड परिसरात भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी परेश रावल उभे होते आणि यावेळीस त्यांनी महागाई, बेरोजगारी, बेकायदेशीर विस्थापित लोकांबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे ते चर्चेत आले. भाषण करताना ते म्हणाले, “गुजराती जनता महागाई सहन करेल, पण बांग्लादेशी आणि रोहिंग्या यांना सहन करू शकत नाही. गॅस सिलेंडर घेऊन तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार आहात का?” असं विधान रावल यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर बंगाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली गेली.

विश्लेषण: मेसेजिंगची तिशी! १९९२ ला पाठवलेला जगातील पहिला SMS काय होता? जाणून घ्या ‘संदेश’वहनाचा इतिहास!

परेश रावल यांनी माफी मागितली

सोशल मीडियावर लोक व्यक्त होत असल्याने याविषयी परेश रावल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. परेश यांनी ट्वीट करत त्यांनी बाजू मांडली आहे. ते म्हणतात, “मासे खाणं हा मुद्दा अजिबात नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली फक्त अवैध बांग्लादेशी आणि रोहिंग्या यांनाच संबोधून म्हणालो आहे. तरी मी तुमचं मन आणि भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

विश्लेषण: ड्रायव्हिंग करताना तुफान वेगाने गाडी चालवण्याची आपली इच्छा का होत असते? काय आहेत वैज्ञानिक कारणं?

FIR :

पश्चिम बंगालच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेता मुहम्मद सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात कलकत्ताच्या तलतला येथील पोलिस चौकीत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम १५३ (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे) १५३ A ( मुद्दाम किंवा इच्छेने दंगल घडवून आणणे किंवा चिथावणी देणे) ५०४ ( शांततेचा जाणूनबुजून भंग करणे) ५०५ ( कोणत्याही वर्गाला किंवा व्यक्तींच्या समुदायाला दुसर्‍या वर्ग किंवा समुदायाविरुद्ध गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे) भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत ही कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. यानंतर पोलीस सह आयुक्त सीपी मुरलीधर शर्मा म्हणाले, “आम्ही त्यांना समन्स बजावले आहे आणि त्यांना १२ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained actor politician paresh rawal controversy on remark for bengalis spg
First published on: 07-12-2022 at 17:50 IST