युरोपियन युनियनने अ‍ॅपलला मोठा धक्का दिला आहे. युरोपियन युनियन देशांनी मंगळवारी एकमत केले की मोबाइल, टॅब्लेट आणि कॅमेरा यांचे मोबाइल चार्जिंग पोर्ट समान असेल. जगातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कंपनी अधिकृत निर्णद्वारे आपल्या उपकरणांमध्ये कोणते चार्जिंग पोर्ट लावायचे हे ठरणार आहे. युरोपियन युनियनच्या कायदा निर्मात्यांनी एक तात्पुरता करार केला आहे ज्यामध्ये मोबाइल डिव्हाइस उत्पादकांना २०२४ पासून या प्रदेशात विकल्या जाणार्‍या उपकरणांसाठी मानक यूएसबी-सी टाईप चार्जिंग पोर्ट समाविष्ट करणे अनिवार्य आहे.

हा प्रस्ताव का मांडण्यात आला?

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

युरोपियन कमिशनने यापूर्वी सांगितले होते की, युरोपीयन देशांमधील ग्राहकांकडे सरासरी तीन मोबाईल फोन चार्जर आहेत, त्यापैकी दोन ते नियमितपणे वापरतात. असे असूनही, ही ३८ टक्के ग्राहकांनी किमान एकदा तरी समस्या अनुभवल्याचा अहवाल दिला. उपलब्ध चार्जर वेगळे असल्याने ते त्यांचे मोबाईल फोन चार्ज करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन नियमांचा काय परिणाम होऊ शकतो?

सर्वात ठळकपणे, नवीन नियम आयफोन निर्मात्या अ‍ॅपलला त्यांच्या उपकरणांवर यूएसीबी-सी पोर्ट करण्यास भाग पाडतील. हे, गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅपल स्वतः लाइटनिंग केबलपासून दूर जात आहे. यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट वापरणारे मॅकबुक आणि आयपॅड याने आधीच सादर केले आहेत. तसेच, अशी अफवा आहे की अ‍ॅपल एका पोर्ट-लेस आयफोनवर काम करत आहे जो केवळ वायरलेस चार्जर वापरून चार्ज केला जाईल.

२०२४ पासून आयफोनच्या कनेक्टरमध्ये बदल होणार

युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे अ‍ॅपलला २०२४ पासून युरोपमध्ये विकल्या जाणार्‍या कोणत्याही आयफोनचा कनेक्टर बदलावा लागेल. यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होईल, असा विश्वास युरोपियन कमिशनला आहे. आयफोनला लाइटनिंग केबलने चार्ज केले जाते, तर अँड्रॉइड चालवणारे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यूएसबी-सी टाईप कनेक्टर वापरावे लागतात. २०१९ च्या आयोगाच्या अभ्यासानुसार, २०१८ मध्ये मोबाइल फोनसह विकल्या गेलेल्या निम्म्या चार्जर्समध्ये यूएसबी मायक्रो-बी कनेक्टर होते, तर २९ टक्के  यूएसबी-सी टाईप कनेक्टर होते आणि २१ टक्के लाइटनिंग कनेक्टर होते.

वेगवेगळ्या चार्जरचा वापर

बेल्जियम गेल्या दशकापासून सर्व कंपन्यांसाठी सारखेच मोबाइल चार्जिंग पोर्टसाठी समर्थन करत आहे. दुसरीकडे, आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांनी तक्रार केली की त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात.

युरोपियन युनियनचे उद्योग प्रमुख, थियरी ब्रेटन म्हणाले की, “या करारामुळे ग्राहकांसाठी सुमारे २५० दशलक्ष युरोची बचत होईल. त्यामुळे वायरलेस चार्जिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उदय होईल.”