पंजाब पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंहच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नुकतंच तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये कॅनडात स्थित असणाऱ्या नॅशनल कबड्डी फेडरेशनच्या (NKF) सनोवर ढिल्लोनचाही समावेश आहे. अनेक स्पर्धांमध्ये युकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप सिंहची १४ मार्चला कबड्डी सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिल्लोन गुंडाच्या माध्यमातून संदीप सिंहच्या मेजर कबड्डी लीग फेडरेशनकडून (MKLF) खेळणाऱ्या खेळाडूंवर NKF कडून खेळण्यासाठी दबाव आणत होता. संदीपच्या यशामुळे NKF ला अपयशी म्हणून पाहिलं जात होतं.

यानिमित्ताने या कबड्डी फेडरेशन्स, त्यांची स्थानिक ओळख, गुंडांशी संबंध, खेळाडूंना धोका आणि ग्रामीण खेळात गुंतलेली भूमिका काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

पंजाबमध्ये खेळल्या जाणार्‍या या कबड्डी स्पर्धा किंवा चषक काय आहेत? आणि ते किती लोकप्रिय आहेत?

कबड्डी हा खेळ भारतीय उपखंडाच्या इतिहासाइतकाच जुना आहे. हा खेळा प्राचीन काळापासून पंजाबच्या ग्रामीण भागात खेळला जात आहे. आधी मनोरंजनाच्या उद्देशाने खेळला जाणार हा खेळ आता मनोरंजनासोबतच व्यावसायिक हेतूने खेळला जात. कबड्डी स्पर्धा पंजाबमध्ये मुख्यतः हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत खेळवले जातात. गाव पातळीवरील कबड्डी समित्या, कबड्डी क्लब किंवा कबड्डी फेडरेशनद्वारे या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

बहुतेक प्रमुख स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयोजित केल्या जातात. लोकांचं मनोरंजन करण्यासोबतच तरुण निरोगी राहावेत तसंच अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करणं हा या खेळाचा मुख्य हेतू असते. पण आता हा खेळ अनेकांसाठी उदरनिर्वाहाचं साधन ठरत आहे.

कबड्डी स्पर्धा या फक्त पंजाबमधील खेडेगावात नाही तर परदेशातही अतिशय लोकप्रिय असून च्यांची आतुरतेने वाट पाहत असता. या सामन्यांचं ऑनलाइन प्रक्षेपण केलं जातं ज्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळतो.

सध्या, यातील बहुतेक स्पर्धा कबड्डी फेडरेशनद्वारे आयोजित केल्या जात आहेत. यूके, अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेले तसंच येथील काही पंजाबींनी या फेडरेशन सुरु केल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आणि मार्चपर्यंत संपणाऱ्या स्पर्धा भारतात संपल्यानंतर, अनेक संघ वर्षाच्या उर्वरित महिन्यात इतर देशांमध्ये आयोजित स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी परदेशात जातात.

कबड्डी स्पर्धा भरवण्यात कबड्डी फेडरेशनची भूमिका काय?

कबड्डी हा संघटित खेळ नाही. कबड्डीला व्यावसायिक रूप देण्यासाठी कबड्डी फेडरेशन सुरु करण्याची प्रथा सुमारे दोन दशकांपूर्वी सुरू झाली. पंजाबमध्ये सध्या चार फेडरेशन आहेत – उत्तर भारत कबड्डी फेडरेशन २० वर्षांपूर्वी स्थापन झाली; गेल्या १५ वर्षांपासून सक्रिय असलेली पंजाब कबड्डी अकादमी असोसिएशन; पंजाब कबड्डी असोसिएशन जी एक दशकापूर्वी स्थापन झाली होती परंतु ती फारशी सक्रिय नाही; आणि मेजर कबड्डी लीग फेडरेशनची स्थापना २०१९ मध्ये यूके-स्थित आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप सिंग यांनी केली होती.

याचप्रमाणे पंजाबींनी वेगवेगळ्या देशांमध्ये अशा अनेक फेडरेशन सुरु केल्या आहेत. प्रत्येक फेडरेशनमध्ये अनेक संघ असतात, जे त्यांच्याशी संबंधित व्यक्ती किंवा समूहाच्या मालकीचे असतात. उदाहरणार्थ मेजर लीग आणि नॉर्थ इंडिया फेडरेशनसोबत अनुक्रमे १२ आणि १४ संघ जोडलेले आहेत.

गाव पातळीवरील कबड्डी समित्या अनेकदा संघ पाठवण्यासाठी अशा फेडरेशनपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी पंच आणि स्कोअरर यासारखे तांत्रिक सहाय्य पुरवतात. फेडरेशन खेळाडूंच्या डोप चाचण्या घेण्यासाठी प्रयोगशाळा देखील पुरवतात. अनेक स्पर्धांमध्ये आठ संघ सहभागी असतात आणि बर्‍याचदा हा कार्यक्रम दिवसभराचा असतो. एक सामना सुमारे ३० मिनिटांचा असतो आणि संघातील खेळाडूंची संख्या १० ते २० पर्यंत असते.

या फेडरेशनसाठी नियम काय आहेत?

Societies Act अंतर्गत नाव नोंदणी करून कोणीही फेडरेशनची स्थापना करु शकतं. या फेडरेशन कबड्डीसाठी राष्ट्रीय क्रीडा संस्था असणाऱ्या Amateur Kabaddi Federation of India (AKFI) शी संलग्न नाहीत. AKFI हा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ (IKF), आशियाई कबड्डी महासंघ (AKF) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA) यांच्याशी संलग्न असून भारत सरकारच्या मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

पंजाबींनी येथे आणि परदेशात स्थापन केलेल्या फेडरेशन अदखलपात्र असल्या तरी राज्यात तसंच उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात मदत करतात. आयोजकांकडून स्पर्धेत संघ सहभागी करण्यासाठी फेडरेशनला पैसे दिले जातात. फेडरेशन स्वतःचे कमिशन बाजूला ठेवून खेळाडू आणि विजेत्या तसंच पात्र संघांना पैसे देतात. परदेशात डॉलरमध्ये पैसे मिळत असल्याने खेळाडू आणि फेडरेशनला तिथे जास्त पैसे कमावण्याची संधी असते.

या खेळात किती गोष्टी दाव्यावर असतात, कितपत धोका असतो?

नामांकित खेळाडूंसह चांगले संघ असणाऱ्या अफेडरेशन जास्त फी घेतात. याला व्यावसायिक बाजू असतेच मात्र याशिवाय पंजाबी समुदायातील फेडरेशनच्या प्रमोटर्सचा आदर आणि स्थानदेखील वाढवते. फेडरेशन्समध्ये व्यावसायिक स्पर्धा खूप आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक असणाऱे इंग्लंड कबड्डी फेडरेशन यूकेचे वरिष्ठ पदाधिकारी बलविंदर सिंग यांनी संदीप सिंग खेळाडूंच्या हक्कांसाठी लढत असल्याचं सांगितलं होतं.

खेळ अंमली पदार्थाच्या वापरापासून मुक्त व्हावा यासाठी संदीपने ‘Drug Abuse Prevention Code’ आणला. तसंच त्यांच्या डोपिंग चाचण्या सर्वोच्च स्तराच्या होत्या आणि WADA (World Anti-doping Agency) अनुरूप होत्या.

“इतर फेडरेशनदेखील डोपिंगविरोधी चाचण्या घेत असल्याचा दावा करतात, परंतु अशा चाचण्यांची फारशी विश्वासार्हता नाही,” असं बलविंदर सांगतात. संदीप खेळाडूंसाठी विमा योजना सुरू करण्याच्या बाजूने होते. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंना संदीपच्या नेतृत्वाखालील महासंघात खेळायचे होते. कबड्डी व्यवसायात गुंतलेल्या काही पंजाबींना हे फारसं पटलं नव्हतं. शेवटी त्याची हत्या करण्यात आली.