युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराने सांगितले की, रशियन सैन्याशी झालेल्या भीषण युद्धानंतर युक्रेनने चेर्नोबिल अणुउर्जा प्रकाल्पावरील नियंत्रण गमावले आहे. सल्लागार मिहाइलो पोडोलियाक यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की युक्रेनियन अधिकाऱ्यांना चेर्नोबिल प्लांटमधील सद्य परिस्थितीबद्दल माहिती नाही. रशियन सैन्याने केलेल्या पूर्णपणे मूर्ख हल्ल्यानंतर, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित आहे हे सांगणे अशक्य आहे, असे पोडोलियाक यांनी सांगितले. पण रशिया ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेला हा प्रकल्प इतका महत्तावाच का आहे, जाणून घेऊया…

युक्रेनमध्ये जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग

Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

चेर्नोबिल बेलारूस ते युक्रेनची राजधानी कीव या सर्वात लहान मार्गावर आहे. अशा स्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याला ते ताब्यात घेणे आवश्यक होते. चेर्नोबिलबद्दल, पाश्चात्य लष्करी विश्लेषक म्हणतात की रशिया बेलारूसचा सर्वात सोपा मार्ग वापरत आहे. बेलारूस आणि रशिया खूप जवळचे मित्र आहेत. या देशाची सीमा युक्रेनला लागून आहे. येथे मोठ्या प्रमाणात रशियन सैनिक आणि शस्त्रे आहेत.

अमेरिकेचे माजी लष्करी प्रमुख जॅक कीन म्हणाले की, चेर्नोबिलला लष्करी महत्त्व नाही परण ते बेलारूस ते कीव या सर्वात लहान मार्गावर येते. जे युक्रेनियन सरकारला उलथून टाकण्यासाठी रशियाचे मुख्य धोरणात्मक लक्ष्य असू शकते.

सुरक्षा प्रयोगादरम्यान अणुभट्टीत स्फोट आणि किरणोत्सर्ग

१९८६ सालच्या एप्रिल महिन्यात एका सुरक्षा प्रयोगादरम्यान चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोट झाला होता. स्फोटानंतर लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे ५६ कर्मचारी मृत्युमुखी पडले. अणुभट्टीच्या गाभ्यात मोठा स्फोट झाल्याने याची तीव्रता वाढली होती. स्फोटानंतर संपूर्ण युरोपमध्ये किरणोत्सर्ग पसरला होता.

किरणोत्सर्गाचा युरोपच्या बहुतांश भागांवर परिणाम होऊ लागला होता आणि रेडिएशन अमेरिकेपर्यंत पोहोचले होते. स्फोटानंतर, त्यातून किरणोत्सर्ग रोखण्यासाठी ते संरक्षणात्मक उपकरणाने झाकले गेले आणि संपूर्ण प्लांट बंद झाला. अणुभट्टीत स्फोट होऊन आजूबाजूच्या शेकडो किलोमीटरच्या परिसरात मोठी आण्विक वाफांची गळती झाली होती. किरणोत्सर्गी स्ट्रॉन्टियम, सीझियम आणि प्लुटोनियमचा प्रामुख्याने युक्रेन आणि शेजारील बेलारूस, तसेच रशिया आणि युरोपचा काही भाग प्रभावित झाला. या आपत्तीमुळे होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मृत्यूंची संख्या जगभरात किमान ९३,००० लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला.

या भयानाक घटनेनंतर Livescience.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अपघातानंतर रेडिएशनचा प्रभाव २६०० स्क्वेअर किलोमीटरपर्यंत होता. पुढील २४ हजार वर्षे या ठिकाणी कोणीही मनुष्य राहू शकत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले होते. आता ते आण्विक कचरा साठवण्याचे केंद्र आहे. मोठ्या प्रमाणात अणुइंधन येथे ठेवले जाते. गेल्या वर्षी एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की या प्लांटमध्ये अजूनही इंधन धुमसत आहे. ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो.

हल्ला झाल्यास मोठी आपत्ती

सध्या युक्रेन आणि रशियाच्या आण्विक प्रकल्पातील २२ हजार पोती अणु कचरा चेर्नोबिल अणु प्रकल्पात ठेवण्यात आला आहे. येथे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास मोठी आपत्ती ओढवू शकते. युक्रेनच्या सायंटिफिक अँड टेक्निकल सेंटर फॉर न्यूक्लियर अँड रेडिएशन सेफ्टीचे प्रमुख दिमित्रो गुमेन्युक यांनी सांगितले की, या ठिकाणी एकच भूसुरुंग स्फोट झाला तर मोठा अनर्थ घडू शकतो. रेडिएशन सर्वत्र पसरेल. मग ते हाताळणे कठीण होईल.

जर रशियन क्षेपणास्त्रे किंवा तोफगोळे चेर्नोबिल अणुप्रकल्पावर पडले,  तर पुन्हा 1९८६ सारखी दुर्घटना घडू शकते. ब्रिटनच्या शेफिल्ड विद्यापीठातील अणुतज्ज्ञ नील हयात यांनी सांगितले की, चेरनोबिलच्या खोली क्रमांक ३०५/२ मधील परिस्थिती या क्षणी भट्टी हळूहळू गरम होत असल्यासारखी आहे.

सोव्हिएत युनियनकडून प्रकरण रेटले

सोव्हिएत अधिकाऱ्यांनी सुरुवातीला आपत्तीची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला होता. ते झाकण्याची मागणी केली आणि स्फोट झाल्याचे स्वीकारले नाही. पण या घटनेने सुधारणावादी सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांची प्रतिमा डागाळली, जे सोव्हिएत समाजातील त्यांच्या मोकळेपणासाठी ओळखले जाते. या आपत्तीला काही वर्षांनी सोव्हिएत युनियनच्या पतनात हातभार लावला गेला.

युक्रेनचे चार अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षितपणे कार्यरत आहेत आणि चेरर्नोबिलमधील उर्वरित कचरा आणि इतर सुविधांवर कोणताही परिणाम झालेला नाही, युक्रेनच्या आण्विक नियामकाचा हवाला देत अणु वॉचडॉगने गुरुवारी सांगितले. पण युक्रेनच्या इतर अणुभट्ट्या अपवर्जन झोनमध्ये नाहीत आणि त्यात अणुइंधन आहे जे जास्त प्रमाणात किरणोत्सर्गी आहे. त्यांच्या आजूबाजूला लढण्याचा धोका खूप जास्त आहे.

चेर्नोबिलमध्ये थेट नरसंहार नसला तरी ती जग हादरवून टाकणारी घटना होती. सोव्हिएत रशियात झालेली ही घटना, त्यामुळेच जागतिक पातळीवर खूप महत्त्वाची होती.