एप्रिल महिन्यात विदर्भातील काही भागात विशेषतः वर्धा, चंद्रपूरमध्ये आकाशातून काही प्रकाशमय गोष्टी-वस्तू या जमिनीच्या दिशेने पडत असल्याचं अनेकांनी बघितलं होतं. त्याचा व्हिडीओ हा तात्काळ राज्यभर नाही तर देशात-परदेशातही व्हायरल झाला होता. हे तुकडे म्हणजे चीनने कृत्रिम उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे असल्याचं नंतर स्पष्ट झालं. नेमकी अशीच घटना शनिवारी रात्री मलेशिया जवळ घडली. यानिमित्ताने पुन्हा एकदा उपग्रह प्रक्षेपणामुळे तयार होणार अवकाश कचरा आणि चीनचे उपग्रह प्रक्षेपण हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

नक्की काय झाले ?

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

तिआनगोंग (Tiangong) नावाचे सुमारे १०० टन वजनाचे अवकाश स्थानक चीन उभारत आहे. या अवकाश स्थानकाचे विविध भाग हे चीन रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात सुमारे ३९० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केले जात आहेत. याच अवकाश स्थानकाचा १७ मीटर लांबीचा आणि तब्ब्ल २३ टन वजनाचा Wentian नावाचा दुसरा भाग चीनने २४ जुलैला Long March 5B या चीनच्या सर्वात शक्तीशाली रॉकेटच्या सहाय्याने यशस्विरित्या नियोजत उंचीवर प्रक्षेपित केला.

Long March 5B हे रॉकेट तब्बल ६४० टन वजनाचे असून त्याच्या पहिल्या टप्प्यात चार छोट्या रॉकेटचे प्रज्वलन होते ज्याचे वजन हे प्रत्येकी २१ टन आहे. साधारण ८० किलोमीटर उंची गाठल्यावर हे रॉकेटचे तुकडे मुख्य रॉकेटपासून वेगळे होतात आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जमिनीकडे खेचले जात वातावरणाशी घर्षण होत नष्ट होतात. नेमक्या या भागाचे काही तुकडे हे वातावरणात काही दिवस राहिले आणि मग जळत पृथ्वीवर मलेशियाच्या पूर्व भागात समुद्रात कोसळले. हे तुकडे कोसळत असतांना वातावरणाशी घर्षण होत त्याचे ज्वलन होतांना बघायला मिळाले. याचे व्हिडीओ आणि फोटो हे तात्काळ जगभर व्हायरल झाले. सुरुवातीला अशनी पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हे रॉकेटचे तुकडे-अवशेष असल्याचं स्पष्ट झालं. रविवारी रात्रीपर्यंत चीनने प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे हे तुकडे असल्याचं शिक्कामोर्तब झालं. अशा तुकड्यांना अवकाश कचरा म्हणून ओळखलं जातं.

अवकाश कचऱ्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे का ?

उपग्रह प्रक्षेपणाच्या वेळी विविध उंचीवर रॉकेटचे भाग मागे रहातात, उपग्रहाचा कार्यकाल संपल्यावर तो तसाच पृथ्वीभोवती फिरत रहातो अशा सर्व वस्तूंना अवकाश कचरा म्हटलं जातं.

अनेकदा रॉकेटचा तुकडा हा कमी उंचीवर असल्याने बहुतांश वेळा पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतोच. पण रॉकेटचा तुकडा हा मोठा असेल तर तो वातावरणात नष्ट न होता, पृथ्वीभोवती काही दिवस फिरतो आणि मग जमिनीवर कोसळतो. त्याचा आकार तुलनेत लहान असल्याने आणि वेग जास्त असल्याने त्याचा शोध घेणेही अवघड असते. त्यामुळे अनेकदा घटना घडण्याच्या काही तास आधी किंवा घटना घडत असतांना अशा रॉकेटच्या तुकड्याची नोंद केली जाते. चीनच्या रॉकेटच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे.

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेल्या अवकाश कचऱ्याचा ठावठिकाणा लावता येतो, त्यावर लक्ष ठेवता येते. असं असलं तरी अवकाश कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने आणि तुलनेत जमिनीवरुन शोध घेणारी यंत्रणा मर्यादीत असल्याने अवकाशातील या कचऱ्यांवर लक्ष ठेवणे आव्हानात्मक आहे.

अवकाश कचऱ्याच्या नियंत्रणासाठी कोणते नियम आहेत ?

घनकचरा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे तयार होणार कचरा अशा या कचऱ्याची वर्गवारी करत सर्व देशांमध्ये विविध नियम निश्चित करण्यात आले आहेत. पण अवकाश कचऱ्याबाबत सर्वसमावेशक, जगाने मान्य केलेला असा कोणताही नियम नाही. मुळातच अवकाश उद्योगात आजही कमी देशांचा सहभाग असल्याने अनेकांना तर या कचऱ्याची व्याप्तीही माहित नाही. त्यामुळे अशा कचऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे, त्याची विल्हेवाट लावण्याचे कोणतेही सक्तीचे नियम नाहीत. जे काही मोजके देश उपग्रह प्रक्षेपण करतात ते त्यांच्या परीने अवकाश कचऱ्याबाबत काळजी घेत असतात. असं असलं तरी तो होऊच नये किंवा कमीत कमी व्हावा यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. रॉकेटचा तुकडा अवकाशात राहिल्यावर तो जमिनीवर पडू नये, आकाशातच नष्ट व्हावा यासाठी त्या रॉकेटच्या भागावर सुरुवातीपासून ठेवण्यात आलेल्या छोट्या रॉकेटच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवले आणि मग त्याला कोसळवले तर त्यामुळे जमिनीवर हानी होणार नाही, मात्र अशी काळजी घेण्याची तसदी फारसे कोणीही घेत नाही.

१९७९ मध्ये अमेरिकेतील नासाची ७६ टन वजनाची स्कायलॅब नावाची प्रयोगशाळा अनियंत्रित होत ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात निर्जन भागात कोसळली होती. त्या भागाची मालकी असलेल्या स्थानिक प्रशासनाने कचरा टाकला म्हणून तेव्हा ४०० डॉलर्सचा दंड नासाला ठोठावला होता.

सोव्हिएत युविनयचा एक नादुरुस्त झालेला कृत्रिम उपग्रह Kosmos 954चे अवशेष हे कॅनडाच्या उत्तर भागात १९७२ च्या सुमारास कोसळले होते. यामध्ये किरणोत्सारी पदार्थ होते. तेव्हा कॅनडा आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार रशियाने दंड म्हणून कॅनडाच्या चलनात ३ दशलक्ष एवढी रक्कम भरली होती.

असं असलं तरी गेल्या काही वर्षात कृत्रिम उपग्रहांचा वापर वाढला आहे, मागणी वाढली आहे, त्यामुळे उपग्रह प्रक्षेपणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अवकाश कचऱ्याचे प्रमाणही वाढत असल्याचं दिसून येत आहे.