विश्लेषण : हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची मागणी का होत आहे? भाग्यलक्ष्मी मंदिराचा काय संबंध?

चारमिनारला लागून असलेले भाग्यलक्ष्मी मंदिर हे या वादाच्या केंद्रस्थानी आहे

demand to rename Hyderabad as Bhagyanagar
(फोटो सौजन्य – PTI)

हैदराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाची राजधानी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पुन्हा एकदा याची आठवण करुन दिल्याने हैदराबादचे नाव बदलले जाणार का चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

“बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते मारले जात असून ते देशहिताच्या पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. हैदराबाद हे भाग्यनगर आहे. भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची घोषणा दिली होती. आम्ही आता सत्तेत आहोत त्यामुळे लढत नाही. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

हैदराबादबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यामुळे भाग्यनगरचे नामकरण करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. डिसेंबर २०२० मध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शहरातील नगरपालिका निवडणुकीपूर्वी हैदराबादच्या भेटीवर भाग्यलक्ष्मी मंदिराला भेट दिली होती. या मंदिराच्या नावावरून या शहराला भाग्यनगर असे नाव देण्याची मागणी होत आहे.

‘केसीआर’ यांची मोदींकडे पाठ, यशवंत सिन्हांचे मात्र स्वागत ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विरोधकांवर तीव्र टीका

भाग्यनगरचा उल्लेख कुठून आला?

१८१६ मध्ये अॅरॉन अॅरो स्मिथ या ब्रिटिश नागरिकाने हैदराबादचा नकाशा तयार केला. त्या नकाशात हैदराबादचे नाव ठळक अक्षरात लिहिले होते, त्याखाली भाग्यनगर आणि गोलकोंडा असे लिहिले होते. म्हणजेच पूर्वी या शहराला हैदराबाद तसेच गोलकोंडा आणि भाग्यनगर असे म्हटले जात असे. नानिशेट्टी शिरीष यांच्या ‘गोलकोंडा, हैदराबाद आणि भाग्यनगर’ या पुस्तकातही हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हैदराबादचे नाव नाव भाग्यनगर का असू नये?

हैदराबादमधील निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही शहराचे नाव बदलण्याची मागणी करत होते. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, काही लोक मला विचारत होते की हैदराबादचे नाव भाग्यनगर ठेवता येईल का? मी म्हणालो का नाही?.

भाग्यलक्ष्मी मंदिर कुठे आहे?

भाग्यलक्ष्मी हे लक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. हे मंदिर प्रसिद्ध चारमिनारला लागून आहे. हे चारमिनारच्या आग्नेय-पूर्व मिनारजवळ आहे. हे मंदिर ८०० वर्षे जुने असल्याचे लोक सांगतात. हे १९व्या शतकातील मंदिर असल्याचेही सांगितले जाते.

नामांतराचा अंतिम निर्णय केंद्राकडून ; भाजपच्या भूमिकेमुळे नामांतरांच्या श्रेयवादाचा खेळ रंगला

हे मंदिर किती जुने आहे?

हे मंदिर किती जुने आहे याचा इतिहास माहीत नाही. काही लोकांच्या मते हे मंदिर १९६० मध्ये बांधले गेले होते. आज जी मूर्ती दिसते ती तेव्हाच स्थापन झाल्याचे सांगितले जाते. तर चारमिनार १५९१ मध्ये बांधले गेले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चारमिनारचे संरक्षण करते.

मोहम्मद कुली कुतुबशहाची राजधानी गोलकोंडा येथे पाण्याअभावी प्लेग आणि कॉलरा रोग पसरला. तेव्हा त्यांनी या रोगाच्या अंतासाठी प्रार्थना केली आणि मशीद बांधण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर शेकडो वर्षे जुने असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हे मंदिर एका खांबावर उभे आहे. १९६० च्या दशकात हा स्तंभ भगवा रंगाचा होता. काहींनी या वर्षीपासूनच आरती करण्यास सुरुवात केली. राज्य मार्ग परिवहन बस या खांबावर आदळल्याने त्याचे नुकसान झाले. त्यानंतर बांबूपासून बनवलेले छप्पर रातोरात तयार करण्यात आले. त्याच्या खाली मूर्ती ठेवण्यात आली होती.

प्रस्ताव पाठविणे म्हणजे नामांतर नाही, केंद्र सरकार नामांतर करेल

काँग्रेस नेते मोहम्मद शब्बीर अली हे तेलंगणा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. ते म्हणाले की, त्या घटनेपासून मंदिराचा परिघ प्रत्येक उत्सवानंतर वाढतच गेला, जोपर्यंत न्यायालयाने २०१३ मध्ये पोलिसांना विस्तार थांबवण्याचे निर्देश दिले नाहीत.

मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

चारमिनार परिसरात हिंदू व्यापारी आणि व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. दररोज लोक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. दिवाळीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते. या दिवशी पूजा केल्याने भाग्य प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

दुसरीकडे, हिंदू राजकीय संघटना देवीचे नाव भाग्यनगरशी जोडतात. हैदराबाद पूर्वी भाग्यनगर म्हणून ओळखले जात होते, असा हिंदूवादी संघटनांचा दावा आहे. कुतुबशाही शासकांनी गोलकोंडाहून हैदराबादला त्यांची राजधानी म्हणून घोषित केले. त्याचे नाव बदलून पुन्हा हैदराबाद करण्यात आले.

भाजपा शहराचे नाव बदलण्याची मागणी का करत आहे?

भाग्यनगरचे नाव भाग्यलक्ष्मी मंदिराशी जोडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाला राज्याची सत्ता मिळाल्यास या मंदिराचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल, असे संकेत नेत्यांच्या वक्तव्यावरून मिळत आहेत. २०२० मध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अनेक नेत्यांनी या भागाला भेट दिली होती.

हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये राजकीय गोंधळ उडाला असताना, भाजपाच्या तेलंगणा युनिटचे प्रमुख संजय कुमार यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांना भाग्यलक्ष्मीसमोर शपथ घेण्याचे आव्हान दिले. भाग्यनगरमध्ये निवडणुकीची चर्चा वारंवार सुरू आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीदरम्यान भाग्यलक्ष्मी मंदिरावरून पुन्हा एकदा राजकीय गदारोळ सुरु आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained demand to rename hyderabad as bhagyanagar abn

Next Story
विश्लेषण : ऋषी सुनक यांची जागा घेणारे ब्रिटिश मंत्री नाधिम झहावी कोण आहेत?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी