दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने चिंता वाढवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकाराची २३ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ओमायक्रॉनच्या प्रवेशानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा भीती वाढली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशभरात निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि लोकांना जीव गमवावा लागल्याने तिसऱ्या लाटेच्या भीतीने लोक भयभीत झाले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, खबरदारी न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. दरम्यान, ओमायक्रॉनवर लसीच्या बूस्टर डोसबाबतही वाद सुरू झाला आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) मुलांचे लसीकरण आणि लसीकरण झालेल्या लोकांना कोविड-१९ लसीचे अतिरिक्त डोस देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे. भारताच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे अध्यक्ष एन के अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ञ पॅनेलने अतिरिक्त करोना लसीचे डोस आणि मुलांचे लसीकरण या दोन्हीसाठी सर्वसमावेशक धोरण आणणे अपेक्षित आहे.

DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

कोविड-१८ लसीचा अतिरिक्त डोस म्हणजे काय?

एक अतिरिक्त डोस, ज्याला मूळतः तिसरा डोस म्हणतात, मध्यम किंवा गंभीरपणे कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेल्या लोकांना दिला जातो. तिसरा डोस हा शब्द दोन MRNA लसींच्या अतिरिक्त डोससाठी वापरला जात होता, पण हा शब्द आता अतिरिक्त डोस आहे कारण ज्या लोकांना जॉन्सन अँड जॉन्सनची एक डोस लस मिळाली आहे त्यांना देखील समान डोस मिळू शकतो. ते देखील त्यांच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आधारित डोससाठी पात्र असू शकतात.

कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये लसीच्या दोन डोसांनंतर लसीकरणानंतर पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त डोस नवीन करोना व्हायरस विरूद्ध त्यांचे संरक्षण करु शकतो.

बूस्टर शॉट म्हणजे काय?

बूस्टर शॉट हे दुसरे तिसरे काही नसून एखाद्या विशिष्ट रोगकारक विरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे साधन आहे. हे मूळ लसीसारखेच असू शकते, त्यामुळे अधिक अँटीबॉडीज तयार करून संरक्षणाचे प्रमाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे.

लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळालेले संरक्षण कालांतराने कमी होऊ लागते, त्यानंतर बूस्टर शॉटचा अतिरिक्त डोस देण्यात येतो. सामान्यतः, पहिल्या डोसपासून प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या कमी झाल्यानंतर बूस्टर डोस मिळणार आहे. बूस्टर डोस लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन तयार केले आहे. बूस्टर डोस मेमरी सेल्सना व्हायरस स्ट्राइक झाल्यावर पुन्हा कनेक्ट होण्यासाठी महत्त्वपूर्ण सिग्नल देत असतो.

मग, दोघांमध्ये काय फरक आहे?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झालेले असते तेव्हा व्हायरसपासून संरक्षण कालांतराने कमी होते म्हणून एक बूस्टर डोस दिला जातो. तर, मध्यम ते गंभीरपणे कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना अतिरिक्त डोस दिला जातो. या अतिरिक्त डोसचा उद्देश लसीकरण केलेल्या लोकांचा त्यांच्या सुरुवातीच्या लसीकरणातील प्रतिसाद सुधारण्यासाठी असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की अशा लाभार्थ्यांना तिसरा डोस दिल्याने त्यांना सामान्य, निरोगी लोकसंख्येप्रमाणेच रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळू शकेल.

तिसरा डोस रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या लोकांना दिला जातो, ज्यामध्ये कर्करोगाचे रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपण झाले आहे त्यांचा समावेश असू शकतो. हे फक्त त्या व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते.

त्यांना देण्यात येणाऱ्या डोसमध्ये फरक आहे का?

अतिरिक्त कोविड डोस हा लसीचा संपूर्ण डोस असेल, पण सध्या दिल्या जाणाऱ्या बूस्टर शॉट्सचे प्रमाण कमी आहे, कारण तिसरा डोस केवळ परिणामकारकता श्रेणी वाढवणारा आहे.

तज्ज्ञांनी असेही सुचवले आहे की, अपेक्षित दुष्परिणामांमध्ये काही फरक असू शकतो. बूस्टर शॉट्ससह उच्च तीव्रतेची किंवा दुसर्‍या डोससह उद्भवू शकणार्‍या लक्षणांची जाणीव आहे. मात्र, तिसरा डोस किती गंभीर किंवा सुरक्षित असू शकतो हे अद्याप अज्ञात आहे.