एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला पूर्णपणे बरे करणारे औषध अजूनही सापडलेले नाही. एचआयव्ही या विषाणूचा शरीरातील प्रसार रोखण्यासाठी काही औषधं उपलब्ध आहेत. मात्र याच औषधांचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे एचआयव्ही बाधित लोक मागील दिवसांपासून नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या दिल्लीमधील कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत. आम्हाला औषधांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी मागणी या रुग्णांकडून केली जात आहे. देसभरात जवळपास ५० हजार रुग्णांना औषध तुटवड्याचा फटका बसतोय, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: मनी लाँडरिंग कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला? जाणून घ्या

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

एचआयव्ही ग्रस्त रुग्णांचे आंदोलन का सुरु आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या कार्यालयासमोर एचआयव्ही बाधित लोकांकडून निदर्शन केले जात आहे. एचआयव्ही बाधितांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची केंद्र सरकाराने निविदा काढली होती. मात्र ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. याच कारणामुळे मार्च महिन्यापासून औषधांचा तुटवडा भासत आहे. यामध्ये प्रामुख्याने dolutegravir-50mg ची कमतरता भासत आहे. परिणामी २१ जूनपासून रुग्ण निदर्शन करत आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: वर्सोवा-विरार सागरी मार्ग केंद्र सरकारकडे का जातोय?

एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणाऱ्या हरिशंकर यांनी या औषध तुटवड्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. “मागील पाच महिन्यांपासून औषधांचा तुटवडा भासत आहे. या तुटवड्यामुळे दिल्लीसह इतर राज्यातील रुग्णांना वेळेवर औषधं मिळत नाहीयेत. संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणं झालेलं आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. आता राजधानी दिल्लीमध्येही हा औषध तुटवडा जाणवत आहे. याच कारणामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे हरिशंकर यांनी सांगितले आहे. NACO कडून औषध पुरवठ्यांमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे देशभरात जवळपास ५० हजार रुग्णांना औषध मिळत नसल्याचेही हरिशंकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताची परकीय गंगाजळी वास्तव की आभासी?

याच औषध तुटवड्यावर दिल्लीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतक्रिया दिली आहे. “NACO कडून औषध पुरवठा करण्यास समस्या निर्माण झाली आहे. मात्र मार्च महिन्यात NACO ने स्थानिक पातळीवर जवळपास ३ लाख डोस खरेदी केले होते. आता आम्ही आणखी काही डोसेसची ऑर्डर दिलेली आहे. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत ही औषधं आमच्याकडे येण्याची शक्यता आहे.” असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच अशा परिस्थितीतही आम्ही रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा व्हावा याची खबरदारी घेतली आहे, असा दावाही या अधिकारनेय केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताची ध्वज संहिता काय आहे? केंद्र सरकारने यामध्ये नेमके कोणते बदल केले आहेत

तर दुसरीकडे या औषध तुडवड्यावर रुग्णांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत आम्हाला औषधांचा वेळेवर पुरवठा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही, असे जय प्रकार नावाच्या रुग्णाने सांगितले आहे. “देशभरातील प्रत्येक रुग्णाला जोपर्यंत औषधांचा पुरवठा वेळेवर आणि सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरुच ठेवणार आहोत. रोजंदारीने कामाला जाणाऱ्या रुग्णांना प्रत्येक पाचव्या दिवशी रुग्णालयात येणे परडवत नाही. त्यामुळे आगाऊ औषधे दिली जावीत,” अशी भूमिका जय प्रकाश नावाच्या रुग्णाने मांडली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: आखाती देशांमध्ये भारतीय मजूर मृत्युमुखी का पडतायत?

कोणत्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे?

फस्ट आणि सेकंड लाईन ट्रिटमेंटसाठी वापरले जाणारे dolutegravir या औषधाचा भारतभरात तुटवडा निर्माण झाला आहे. dolutegravir या औषधाचा एचआयव्हीग्रस्तांवर उपचार करण्यासाठी NACO ने शिफारस केलेली आहे. HIV पॉझिटिव्ह असलेल्या प्रौढ, तसेच वयात आलेल्या आणि ६ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या (२० वजन) रुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते. तसेच, एचआयव्हीग्रस्त बालकांना दिल्या जाणाऱ्या nevirapine सायरप या औषधाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना “एका एचआयव्हीग्रस्त बालकाला तीन दिवसांनी एक्सपायर होणारे nevirapine सायरप देण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत नवीन औषधे आली तर आम्ही या छोट्या बाळाला ते देऊ. अन्यथा सध्या दिलेले औषधच वापरावे लागेल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे,” असे दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या एका रुग्णाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार एचआयव्हीग्रस्तांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणारे एक किंवा त्यापेक्षा अधिक औषधांचा तुटवडा देशातील जवळपास १२ राज्यामध्ये निर्माण झाला आहे. एचआयव्हीवर अद्यापतरी रामबाण उपचार किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. मात्र एचआयव्ही विषाणूचा शरीरातील प्रसार रोखणे तसेच त्याला कमजोर करण्यासाठी काही औषधे दिली जातात. नियमित औषध घेतल्यानंतर रुग्णाची प्रतिकार शक्ती कायम राहण्यास मदत होते. तसेच मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाणही कमी होते. नियमित औषध घेतल्याने आयुर्मानदेखील कमी होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. मात्र सध्या औषधांचाट तुटवडा निर्माण झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.