GPS – जीपीएस हा सध्या एक परावलीचा शब्द झाला आहे. GPS शिवाय घरी फूड डिलिव्हरी जलद होणार नाही , वाहने रस्ता चुकतील इतकं आपण GPS वर अवलंबून आहोत. अमेरिकेने विकसित केलेली GPS प्रणाली ही सध्या हातातल्या मोबाईलचा आणि बहुतेक सर्वच वाहनांचा एक अविभाज्य अंग झालेली आहे.असं असतांना भारतानेच विकसित केलेली GPS प्रमाणेच काम करणारी NavIC या दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्याचा केंद्र सरकारर्फे आग्रह केला जात आहे. एवढंच नाही तर स्मार्ट फोनमध्ये त्याचा समावेश पुढील वर्षापासून करण्याच्या हालचालाही सुरु झाल्या आहेत.

NavIC दिशादर्शक प्रणाली म्हणजे काय?

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
loksatta analysis car t cell therapy effective treatment on blood cancer
विश्लेषण : ब्लड कॅन्सरवर प्रभावी ठरू शकते स्वदेशी उपचार प्रणाली? ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ काय आहे?

NavIC म्हणजे Navigation with Indian Constellation , भारतीय उपखंडातील दिशादर्शन असा त्याचा सर्वसाधारण अर्थ घेता येईल. ही प्रणाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ने स्वबळावर विकसित केली आहे. ज्याप्रमाणे GPS प्रणाली काम करते त्याचप्रमाणे NavIC हे भारतीय उपखंडाच प्रभावीपणे काम करत आहे. NavIC कार्यान्वित होण्यासाठी एकुण आठ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. २००६ ला प्रकल्पावर कामाला सुरुवात झाली, २०११ पासून टप्प्याटप्प्याने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.२०१८ ला NavIC दिशादर्शक प्रणाली पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. भारताच्या सीमेपासून साधारण १५०० किलोमीटर अंतरापर्यंत जमीन, पाणी आणि अर्थात हवेत ही प्रणाली दिशादर्शनाचे अचूक काम करु शकते.

देशाची संरक्षण यंत्रणा पुर्ण क्षमेतेने सध्या NavIC दिशादर्शक प्रणालीचा वापर करत आहे. मात्र नागरी वापरासाठी याचा मर्यादीत वापर केला जात आहे. काही प्रमाणात सार्वजनिक बस वाहतुकीसाठी, मच्छिमारांना अलर्ट करण्यासाठी असलेल्या यंत्रणेत या प्रणालीचा वापर केला जात आहे. आता स्मार्टफोनमध्ये वापर हा पुढचा टप्पा असणार आहे.

NavIC ची इतर दिशादर्शक प्रणालींशी तुलना

NavIC ही दिशादर्शक प्रणाली ही दक्षिण आशियापुरती मर्यादित आहे. तर GPS ने पुर्णजग व्यापलं आहे. जगातील अशी एकही जागा नाही की जिथे GPS चे सिग्नल मिळू शकत नाहीत. अमेरिकेच्या GPS प्रमाणे रशियाची GLONASS प्रणाली आणि चीनची Beidou प्रणाली कार्यरत आहे. QZSS ही जपानची दिशादर्शक प्रणाली अशिया-पॅसिफिक पुरती मर्यादीत आहे. युरोपातील देशांनी २०१६ पासून Galileo प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे. असं असतांना २०१८ पासून पुर्ण क्षमेतेने कार्यरत झालेली NavIC प्रणाली ही अचुकतेच्या बाबतीत GPS च्या तोडीस तोड असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. २०२१ ला NavIC प्रणालीच्या बाबतीत एक धोरण जाहीर करत त्याच सर्वसमावेश वापरासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.

NavIC ला प्रोत्साहन का दिलं जात आहे?

विविध गोष्टींबाबत आत्मनिर्भर – स्वयंपुर्ण व्हायचा प्रयत्न केला जात आहे, तसे धोरण केंद्र सरकाने आखले आहे, त्याचप्रमाणे GPS वरील अवलंबित्व पुर्णपणे कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. संरक्षण क्षेत्राच्या वापरानंतर आता नागरी सेवांमध्येही जास्तीत जास्त प्रमाणात NavIC चा वापर केला जावा, देशातील विविध उद्योगांनी- विभागांनी यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आता पावले सरकारकडून उचलायला सुरुवात झाली आहे.

NavIC प्रणालीचा सहजतेने वापर होण्यासाठी तशी उपकरणे ही भारतीय उद्योगांकडून विकसित करण्याचा प्रयत्न आता सुरु झाला आहे.