जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशात सर्व प्रकारच्या भांडवली लाभावर कर लागतो. भांडवली लाभावरचा कर दोन प्रकारचा असतो. पहिला दीर्घकालीन भांडवली लाभ कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आणि दुसरा अल्पकालीन भांडवली लाभ कर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स) असतो. सोने नेहमीच लोकांसाठी आवडीचा मालमत्ता वर्ग राहिला आहे. अशावेळी सोने विक्री केल्यानंतर जो भांडवली लाभ मिळतो त्यावर कर लागतो. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की सोन्यावरील भांडवली लाभ कराबाबत काय नियम आहेत आणि हा कसा वाचवला जाऊ शकतो.
सोन्यामध्ये तीन वर्षांचा कालावधी हा शॉर्ट टर्मच्या अंतर्गत येतो. तर, तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गुंतवणूक केल्यास ते दीर्घकालीन भांडवली लाभाच्या अंतर्गत येते. शॉर्ट टर्म गेन म्हणजे खरेदी केल्यानंतर तीन वर्षांच्या आत सोने विक्री केल्यावर भांडवली लाभ उत्पन्नाचा भाग होतो. तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येतात, त्यानुसार त्यावर कर लागतो.




दीर्घकालीन भांडवली लाभावर २० टक्के कर –
जर तीन वर्षानंतर विक्री करत असाल तर भांडवली लाभ हा दीर्घ मुदतीच्या अंतर्गत येतो आणि यावर २० टक्के कर लागतो. दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर ‘इंडेक्सेशन’ चा देखील लाभ मिळतो. काही प्रकरणांमध्ये दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावर करात सूट देण्यात आली आहे. ही सूट प्राप्तिकर कायदा सेक्शन ५४ एफ च्या अंतर्गत देण्यात आली आहे.
निवासी मालमत्ता खरेदी करून वाचवू शकता कर –
नियमानुसार जर तीन वर्षानंतर सोन्याची विक्री करतात आणि संपूर्ण रक्कमेच्या मदतीने निवासी मालमत्ता खरेदी केली जाते किंवा नवीन घर बनवलं जातं. तर एकही रुपया कर लागणार नाही. यासाठी निश्चित अंतिम मुदत देखील आहे. विक्री केल्यानंतर दोन वर्षांच्या आत तयार असलेले घर खरेदी करावे लागेल. घर बांधण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला जाईल.
उर्वरीत रक्कम भांडवली लाभ खात्यात जमा करा –
जर संपूर्ण पैशांचा वापर निवासी मालमत्ता खरेदीसाठी किंवा घर बनवण्यासाठी होत नसेल, तर करदात्याने कोणत्याही सरकारी बँकेत भांडवली लाभ खाते उघडले पाहिजे आणि उर्वरीत सर्व रक्कम त्यामध्ये जमा करता येते. या पैशांचा वापर घर तयार करणे किंवा खरेदी करण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या आत पुन्हा करता येऊ शकतो.