संदीप नलावडे

भारतासह बहुतेक देशांमध्ये पारपत्र (पासपोर्ट) हा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून वापरला जातो. पारपत्र आणि व्हिसा यांच्याद्वारे तुम्ही परदेशी प्रवास करू शकता. पारपत्र हा असा दस्तावेज आहे की तो अन्य देशांत तुमची ओळख पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कोणत्या देशाचे पारपत्र अधिक प्रभावी आणि कोणत्या देशाचे पारपत्र कमकुवत आहे हे ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’द्वारे समजू शकते. लंडनस्थित या संस्थेने तयार केलेल्या या यादीत भारत थोडीफार प्रगती करत ८५व्या स्थानावर पोहोचला आहे. पण जपान, दक्षिण कोरिया, स्कँडेनेव्हियन देश या क्रमवारीत सातत्याने वरच्या स्थानावर आढळून येतात. या हेन्ली पारपत्र निर्देशांकाचा आढावा..

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ काय आहे?
जागतिक नागरिकत्व आणि निवासी सल्लागार असलेली ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ ही लंडनमधील संस्था दरवर्षी राष्ट्रनिहाय पारपत्राचे महत्त्व अधोरेखित करते. कोणत्या देशाच्या पारपत्राद्वारे व्हिसामुक्त प्रवास करता येतो, कोणत्या देशाचे पारपत्र अधिक देशांमध्ये चालत नाही याची यादी तयार केली जाते. हा निर्देशांक ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ (आयएटीए)कडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर तयार केला जातो. देशांच्या व्हिसा धोरणातील बदलांनुसार हेन्ली पारपत्र निर्देशांक दर तीन महिन्यांनी तयार केला जातो. यात २२७ गंतव्य स्थाने आणि १९९ देशांच्या पारपत्रांचा समावेश असतो. हेन्ली पासपोर्ट निर्देशांक १९९ विविध पारपत्रांच्या व्हिसामुक्त प्रवेशाची तुलना २२७ प्रवासाच्या स्थळांशी करते. व्हिसा आवश्यक नसल्यास त्या पारपत्रासाठी एक गुण दिला जातो.

कोणत्या देशाचे पारपत्र अधिक प्रभावी?
हेन्ली पारपत्र निर्देशांकात जपान सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे. जपानी पारपत्र असल्यास १९३ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. दुसऱ्या स्थानी सिंगापूर व दक्षिण कोरिया आहेत. त्यांचे पारपत्र असल्यास १९२ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतो. त्यानंतर जर्मनी व स्पेन (१९० देश), फिनलंड, इटली, लग्झेमबर्ग (१८९ देश), ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन (१८८ देश), फ्रान्स, आर्यलड, पोतुर्गाल, ब्रिटन (१८७ देश), बेल्जियम, चेक प्रजासत्ताक, अमेरिका, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्र्झलड (१८६) येतात. त्यांचे पारपत्र अधिक प्रभावी असून अधिकाधिक देशांमध्ये त्यांना व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो.

कोणत्या देशाचे पारपत्र सर्वात कमकुवत?
हेन्ली पारपत्र निर्देशांकावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, अफगाणिस्तानचे पारपत्र सर्वाधिक कमकुवत आहे. या देशाच्या पारपत्राद्वारे केवळ २७ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येतो. इराक (२९ देश), सीरिया (३० देश), पाकिस्तान (३२ देश), येमेन (३४ देश), सोमालिया (३५ देश), नेपाळ (३८ देश), उत्तर कोरिया (४० देश), बांगलादेश, लिबिया (४१ देश), श्रीलंका, सुदान (४२ देश) या देशांचे पारपत्रही कमकुवत मानले जाते. या देशांच्या पारपत्रांद्वारे कमी देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो.

भारताचे पारपत्र किती प्रभावी?
हेन्ले पारपात्र निर्देशांकानुसार जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारताची स्थिती तुलनेने फार चांगली नाही. भारत या यादीमध्ये ८५ व्या स्थानावर आहे. जुलै २०२२ च्या निर्देशांकानुसार भारत ८७ व्या स्थानावर होता. यंदाच्या यादीत भारताने दोन क्रमांकाने वरचे स्थान मिळविले असले तरी इतर अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे. भारताचे पारपत्रधारक जगभरातील फक्त ५९ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात. वाढत्या स्थलांतरामुळे भारतीय पारपत्रधारकांनी सर्बियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश गमावला आहे. १ जानेवारीपासून भारतीय पारपत्रधारकांना सर्बियामध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या देशाने पूर्वी ९० दिवसांसाठी व्हिसामुक्त प्रवासाची परवानगी दिली होती. भारतीय पारपत्रधारक भूतान, इंडोनेशिया, मकाव, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, केनिया, मॉरिशस, झिम्बॉब्वे, युगांडा, इराण आणि कतार यांसारख्या ५९ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. काही देशांमध्ये भारतीयांना ‘व्हिसा- ऑन- अरायव्हल’ बहाल केला जातो. उदा. इराण, कतार, जॉर्डन, ओमान, फिजी, सर्व कॅरेबियन देश. भारताचे महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात, अर्थकारणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागल्याचे बोलले जात असले, तरी २०१८ पासून हेन्ली पारपत्र निर्देशांक क्रमांक ८० ते ८७ मध्ये स्थिरावलेला दिसून येतो. व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकणाऱ्या देशांची संख्याही ५५ ते ६०च्या पलीकडे जाऊ शकलेली नाही.