एस. एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा मोहरा बदलला. भारतीय प्रेक्षकांना हॉलिवूड तोडीचे अ‍ॅक्शन सीन्स या चित्रपटातून पाहायला मिळाले. राजामौली यांची प्रत्येक कलाकृती भवदिव्य असते. ‘बाहुबली’ चित्रपटातील व्हीएफएक्स, संगीत, मोठमोठाले सेट पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. ‘बाहुबली’ चित्रपटात महिष्मती असे एक काल्पनिक साम्राज्य दाखवले होते. दिग्दर्शक मणिरत्नमदेखील असाच एका ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. या चित्रपटात मात्र इतिहासात होऊन गेलेलं चोल साम्राज्य त्यांनी दाखवलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ असं या चित्रपटाचे नाव असून यात अनेक मातब्बर कलाकार आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटात दाखवलेल्या ‘चोल’ साम्राज्याबद्दल जाणून घेऊयात..

भारतातला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या देशात अनेक राजेमहाराजे होऊन गेले, त्यांचे वंशज आजही इतिहासातले दाखले देतात. ज्या प्रमाणे मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे फडकवले, कुशल न्यायव्यवस्था राज्यता राबवली त्याच पद्धतीचे चोल साम्राज्य हे दक्षिण भारतात पसरलं होत. इतिहासकारांच्या मते चोल साम्राज्य हे दक्षिणेतील सर्वात जास्त काळ टिकलेले साम्राज्य आहे. सम्राट अशोकाच्या काही अशोक स्तंभावर या साम्राज्याचे संदर्भ आहेत. ९ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत या साम्राज्याने भरभराट केली. या साम्राज्यात पहिला राज राज चोल त्याचा पुत्र पहिला राजेंद्र चोळ यांनी सैन्य, आरमार, आर्थिक, सांस्कृतिक यासर्व बाबींमध्ये साम्राज्याला संपन्न केले. यांच्याकाळात साम्राज्य दक्षिणेपासून ते अगदी थेट आग्नेय आशियापर्यंत पोहचले होते. यांच्याकाळात श्रीलंकेतील काही भाग, मालदीवसारखी बेटं आपल्या ताब्यात घेतली. राज राज चोल सर्वात पराक्रमी राजा म्हणून ओळखला गेला आहे. राज राज चोल याच्या कार्यकाळात साम्राज्याविस्तार मोठ्या प्रमाणावर झाला.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

चोल साम्राज्य :

दक्षिण भारतातील आजही जी भव्यदिव्य मंदिर उभी आहेत ती याच चोळ साम्राज्यात बांधली गेली आहेत. या साम्राज्या स्थापना ८५० च्या आसपास विजयालयामध्ये झाली. परांतक नावाचा एक पराक्रमी राजा होता, परंतु त्याला शेवटच्या दिवसांत अनेक पराभवांना सामोरे जावे लागले होते. चोल साम्राज्याचा पाया डळमळीत होऊ लागला. राज राज चोल हा राजा उदयास आला आणि त्याने सगळी सूत्र हातात घेऊन साम्राज्याची केवळ भरभराटच केली नाहीतर साम्राज्य वाढवण्यात त्याचा मोठा हात होता. तंजावर मधील ‘बृहदीश्वर’ मंदिर राज राजने बांधले होते. १० व्या शतकात बांधलेले हे विशाल मंदिर आजही तसेच आहे. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट आहे.

विश्लेषण : अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ म्हणजे इतिहास, पौराणिक कथा, आणि वाद यांना जोडणारा एकमेव दुवा

सक्षम असे नौदल :

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार भक्कम होते त्याचपद्धतीने राज राज चोळ याने आपले नौदल हे काळाच्या पुढचे होते. नौदलात अतिशय कुशल खलाशी होते. सुव्यवस्थित, आवश्यक शस्त्रास्त्रांनी ते सुसज्ज होते. त्याच पद्धतीने या साम्राज्यात विविध कला, विद्या, धर्माला आश्रय दिला गेला होता. इतिहासातील नोंदणीनुसार या साम्राज्यातील राजा हा मंत्री आणि राज्य अधिकारी यांच्या सल्ल्याने राज्य करत असे. संपूर्ण राज्य अनेक मंडळांमध्ये विभागले गेले होते. जाहीर सभा घेणं हे यांच्या राजवटीतलं एक मुख्य काम होत. या राजवटीत उत्तम अशी सिंचन व्यवस्था करण्यात आली होती. शिल्पकला याच राजवटीत भरभराटीस आली.

विश्लेषण : नितीश-लालू सोनिया गांधींना भेटल्यानंतर महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेशमधील ‘कुर्मी’ समाज चर्चेत का? वाचा…

साम्राज्याचा शेवट :

राज राज चोल त्याच्या पुत्रानंतर चोल साम्राज्याला ओहोटी लागली. चोल व चालुक्य यांच्यात सातत्याने युद्ध होत राहिली. १३ वय शतकाच्या सुरवातीला दक्षिण भारतात इतर साम्राज्य उदयास येऊ लागली होती. पांड्य वंशाने हळूहळू साम्रज्य काबीज करण्यास सुरवात केली. चोल साम्राज्याचा तिसरा राजेंद्र या अखेरच्या राज्याचा पराभव पांड्यानी केला आणि अखेर या साम्राज्याचा शेवट झाला. इतिहासकारांच्या मते काही कौटुंबिक कारणांमुळेदेखील चोल साम्राज्य संपुष्टात आले असं म्हंटल जात आहे.

दिग्दर्शक मणिरत्नम यांनी एक प्रकारचे शिवधनुष्य पेलेल आहे. ऐतिहासिक चित्रपट बनवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे.