पृथ्वीवर संचार करणारे डायनासोर हे सहा कोटी वर्षांपूर्वी एका लघुग्रहाच्या धडकेमुळे नष्ट झाले असा एक जगमान्य सिद्धांत आहे. अशा विविध आकारांच्या लघुग्रहांची पृथ्वीशी टक्कर अनेकदा झाली असून अशा काही घटना गेल्या काही वर्षांमध्येही घडल्याची नोंद आहे. तेव्हा असाच एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर? अशा धडकेची टांगती तलवार ही खगोल अभ्यासक शास्त्रज्ञ आणि अवकाश विषयात रुची असणाऱ्यांचा मनावर कायम आहे. एखादा लघुग्रह किती विध्वंस करु शकतो हे गेल्या काही वर्षात विविध चित्रपटांच्या माध्यमातून, माहिती पटांतूनही दाखवत या घटनेचे गांभीर्य समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

तेव्हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता किती, पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा माग काढणे शक्य आहे का, अशी टक्कर टाळता येणे शक्य आहे याचे उत्तर नासाच्या ‘DART Mission’ मधून मिळणार आहे.

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

‘DART’ मोहिम नक्की काय आहे?

DART म्हणजे Double Asteroid Redirection Test (DART). दोन लघुग्रहांच्या बाबतीत आखलेली मोहिम असंही म्हणता येईल. पृथ्वीपासून काही कोटी किलोमीटर अंतरावरुन जास्तीत जास्त ८०० मीटर व्यास असलेला ओबडधोबड आकाराचा Didymos नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी काहीसा समांतप पण लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत आहे. या Didymos भोवती चक्क १६० मीटर व्यासाचा Dimorphos नावाचा लघुग्रह हा एखाद्या चंद्राप्रमाणे फिरत आहे. मात्र सूर्याभोवती परिक्रमा करतांना हे दोन्ही लघुग्रह फुगडी घातल्यासारखे एकमेकांभोवती फिरत असतात. तर या लहानग्या Dimorphos वर नासाचे DART नावाचा उपग्रह हा प्रचंड वेगाने आदळणार आहे. या टकरीतून लहानग्या Dimorphos ची दिशा आणि वेग किती बदलला जातो, फरक पडतो याचा अभ्यास केला जाणार आहे.

मोहिमेचा नक्की फायदा काय?

पृथ्वीच्या दिशेने भविष्यात एखादा लघुग्रह किंवा चक्क धुमकेतू भविष्यात येणार असेल तर त्याला रोखणे, नष्ट करणे किवा किमान त्याची दिशा बदलणे शक्य आहे का याचा चाचपणी ही DART Mission च्या माध्यमातून केली जाणार आहे. भविष्यातील पृथ्वीवर येणारे संभाव्य टाळण्याचा एक भाग म्हणून DART Mission कडे बघितले जात आहे. अर्थात मोठा लघुग्रह असेल तर आणखी काय पर्याय असू शकतात याचाही विचार या मोहिमेच्या निमित्ताने केली जाणार आहे.

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता किती आहे?

सर्वसामान्यांना एक गोष्ट नक्की माहित असेल की मंगळ आणि गुरु ग्रहाच्यामध्ये विविध आकाराचे लघुग्रह आहेत. असं असलं तरी पृथ्वीच्या कक्षेशी समांतर पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारे असंख्य लघुग्रह आहेत. त्यांना Near-Earth object या नावाने ओळखले जाते. अशा लघुग्रहांचा आकार काही मीटरपासून एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर Near-Earth object मधील लघुग्रहांची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेत आली तर हे लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता जास्त आहे. याचीच चिता शास्त्रज्ञ-अभ्यासकांना आहे. एवढंच नाही तर सूर्यमालेत किंवा बाहेरून आलेला एखादा धुमकेतू, मोठा लघुग्रह हाही पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी असंख्य लघुग्रह हे दररोज पृथ्वीवर आदळत असतात. मात्र यांचा आकार लहान असल्याने ते पृथ्वीच्या वातावरणाच जळून नष्ट होतात. रात्री आकाशात काही वेळेला तारे पडतांना दिसतात ते हेच लघुग्रह.

अशा विविध लघुग्रहांचा माग किंवा त्यावर लक्ष ठेवण्याचे काम नासासह जगभरातील काही संस्था करत आहेत. त्यामुळे कोणता लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे, कोणता नवीन आढळला हे वेळोवेळी जाहीर केले जाते. पुढील काही वर्ष तरी ज्ञात लघुग्रहाकडून पृथ्वीला धोका नाहीये.

२४ नोव्हेंबर २०२१ ला ‘नासा’ने DART नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. येत्या २६ सप्टेंबराला पृथ्वीपासून सुमारे एक कोटी १० लाख किलोमीटर अंतरावर असतांना हा उपग्रह Dimorphos वर आदळणार आहे. ही टक्कर होण्यापूर्वी DART उपग्रह काही छोटे उपग्रह याच भागात सोडणार आहे, हे उपग्रह टक्करीची ताजी छायाचित्रे पृथ्वीकडे-नियंत्रण कक्षाकडे पाठवणार आहे. यामुळे टक्कर झाल्यावर लहानगा लघुग्रह Dimorphos चा वेग आणि दिशा यात किती बदल झाला आहे याची नोंद करणार आहे. तेव्हा ही टक्कर कशी होते, याचे परिणाम होतात याची उत्सुकता खगोलप्रेमींमध्ये आहे.