बापू बैलकर

वाहनांसाठी हायब्रीड किंवा संमिश्र इंधनाचा वापर करीत ही वाहने बाजारात आणायची हीच ती योग्य वेळ असल्याचा दावा करीत होंडा मोटर्स व टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनी काही प्रवासी कार बाजारात आणल्या आहेत. यात टोयोटाने कॅमरी व वेलफायर तर होडा मोटर्सने होंडा सीटी ही आपली प्युअर हायब्रीड कार बाजारात आणली आहे. 

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

इंधनाचे दर वाढतच राहिल्याने वाहन उत्पादकांनी मायलेजसाठी परवडणाऱ्या वाहनांचे नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सीएनजी वाहनांसह विद्युत वाहने बाजारात येत आहेत. मात्र विद्युत वाहनांत दुचाकी वगळता चारचाकी वाहनांचा पर्याय निवड करण्यास अजूनही खरेदीदार कचरत आहेत. त्यामुळे आता आणखी एक पर्याय वाहन उत्पादक कपन्यांनी दिला आहे, तो हायब्रीड कारचा.

हायब्रीड कार हा तसा नवीन प्रकार नाही. यापूर्वीही हायब्रीड कार बाजारात येत होत्या. पण त्या मायक्रो किंवा माइल्ड हायब्रीड स्वरूपात होत्या. त्यातील बॅटरीचा उपयोग कार चालू्, बंद करण्यापुरता किंवा पिकअप व टॉर्क जनरेट करण्यापुरता होत होता. मात्र आता प्युअर हायब्रीड कार बाजारात येत आहेत. या कार बॅटरी व पारंपरिक इंधन या दोन्हींवर चालतात. बॅटरी म्हणजे ईव्ही मोडवर काही मर्यादा आहेत, पण पूरक म्हणून त्या चांगले मायलेज देणाऱ्या ठरत आहेत.

भारतात काय स्थिती?

भारतात सध्या टोयोटा, एमजी, बीएमडब्ल्यू, व्हाॅल्व्हो, लेक्सस, पोर्श कंपन्यांच्या कार हायब्रीड बाजारात आहेत. या कार मायक्रो किंवा माइल्ड हायब्रीड प्रकारातील असून त्या महागड्या आहेत. असे असतानाही या कारची मागणी वाढत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने गेल्या महिन्यात आर्थिक वर्ष २०२० च्या आतापर्यंतच्या कामगिरीवर आधारित जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २७,२६,०४७ प्रवासी वाहनांची विक्री झाली. यात १,१५,०३२ इतक्या हायब्रीड कार तर १७,८०२ बॅटरीवरील विद्युत कारची विक्री झाली आहे. म्हणजे ‘ईव्ही पेक्षा ‘एचईव्ही’ म्हणजे हायब्रीड कारला मागणी असल्याचे दिसत आहे. यातही प्युअर हायब्रीड कारचा समावेश नाही. नुकत्याच बाजारात आलल्या टोयोटाच्या कॅमरी या ४३ लाखांच्या प्युअर हायब्रीड कारला मागणी वाढली असून ८३१ कार विकल्या गेल्या आहेत. गेल्या महिन्यात होंडाने त्यांची होंडा सीटी ही प्युअर हायब्रीड कार बाजारात आणली असून ती २० लाखांत २६.५ च्या मायलेज देत आहे. मारुतीनेही पुढील आपल्या काळात हायब्रीड कार बाजारात येतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या इंधन प्रकारातील कारबाबत मोठी उत्सुकता वाढली आहे.

प्युअर हायब्रीड म्हणजे काय?

सध्या वाढत असलेले इंधनाचे दर व वाहनांपासून होणारे प्रदूषण यावर एक पर्याय म्हणून प्युअर हायब्रीड कारकडे पाहिले जात आहे. प्युअर हायब्रीड, म्हणजेच सेल्फ चार्जिंग तंत्राद्वारे पेट्रोल इंजिन आणि विद्युत मोटर अशा दोघांचा मेळ आहे. ही कार बॅटरीवर आणि मोटरवरही चालते. बॅटरी ही स्वयंसिद्ध (सेल्फचार्ज) होते. त्यामुळे जास्तीत जास्त मायलेजसह पिकअप व टॉर्कही ती उत्पन्न करते. यात महत्त्वाचा भाग आहे तो बॅटरी रिजनरेशन. या कार बॅटरीवर सुरू होतात. त्यामुळे कोणताही आवाज करीत नाहीत. बॅटरीवर ती अगदी ४० ते ५० कि.मी. प्रतिलिटरचा वेग धारण करीत तीन ते चार किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. त्यानंतर ती आपोआप इंजिनवर चालते. क्लच व ब्रेकिंग वारंवार केल्यानंतर बॅटरी सेल्फचार्ज होतात व ती पुन्हा ईव्ही वर जाते. हा बदल होताना अगदी नकळत होत असतो.

मायलेजसाठी योग्य पर्याय?

आतापर्यंत हायब्रीड कारमध्ये वापरण्यात येत असलेल्या बॅटरीचा वापर कार चालू-बंद करण्यापुरता किंवा पिकअप व टॉर्क जनरेट करण्यापुरता होत होता. आता प्युअर हायब्रीड कार बॅटरी व पारंपरिक इंधन या दोन्हींवर चालतात. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेच्या अभ्यासानुसार या कार पारंपरिक इंधनाच्या तुलनेत ४० ते ४५ टक्केपेक्षा जास्त इंधनदृष्ट्या परवडणाऱ्या असतील. होडा सीटी ही हायब्रीड कार २६.५ तर कॅमरी २३ प्रतिलिटर किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला असून प्रत्यक्ष राईडमध्येही तो जवळपास जाणारा ठरतो.

या कार महागड्या असतात?

हायब्रीड कार या महागड्या असतात अशी एक खरेदीदारांची भावना आहे व ते खरेही आहे. पण तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे आता परवडणाऱ्या किमतीतही हायब्रीड कार खरेदी करणे शक्य होणार आहे. होंडाने नुकतीच बाजारात आणलेली होंडा सीटी ही हायब्रीड कार २० लाखांच्या आत मिळत आहे. पुढील काळात यापेक्षा कमी किमतीत कार उपलब्ध होतील. स्वस्त कार देणारी मारुती सुझुकीही हायब्रीड कार निर्मिती करणार असल्याने परवडणाऱ्या कारचे पर्यायही बाजारात उपलब्ध होतील.

प्रदूषणाचे काय?

वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे विद्युत कार हा पर्याय समोर आला आहे. हायब्रीड कारमध्ये पारंपरिक इंधनाचाही वापर होणर असल्याने प्रदूषणाचा प्रश्न कसा सुटेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र हायब्रीड कार ४० टक्के बॅटरीवर व ६० टक्के इंधनावर चालेल असे गृहीत धरले तर पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा किमान ३० टक्के प्रदूषण या कारमुळे कमी होईल असा आंदाज आहे. होंडाने तर ही कार कार्बन न्यूट्रल (बंद) करणे आणि आदळल्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य करेल असा दावा केला आहे.

ईव्ही कारला पर्याय ठरेल का?

बॅटरीवर चालणाऱ्या कार या बॅटरीशवाय चालू शकत नाहीत. आतापर्यंत बाजारात आलेल्या विद्युत कार धाव ४०० ते ५०० किमी एका चार्जिंगमध्ये प्रवास करू शकतात. पण प्रत्यक्ष किती अंतर कापेल याची भीती अद्याप मिटलेली नाही. चार्जिंग केंद्रे अजूनही पुरेशी उपलब्ध नसल्याने गाडी मध्येच बंद पडली तर काय हा मोठा प्रश्न आहेच. मात्र हायब्रीड कारमध्ये पारंपरिक इंधन असलेल्या पेटोल, डिझेलसह विद्युत मोटरचाही वापर केलेला असतो. त्यामुळे ही कार चालवताना हे प्रश्न अजिबात पडणार नाहीत असा कार निर्मात्यांचा दावा आहे. प्रत्यक्ष राईडमध्येही ही अडचण आलेली नाही आणि प्रदूषणाची मात्राही हायब्रीड कारमुळे कमी होत असेल तर हा पर्याय ठरू शकतो.