शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) मंगळवारी सुवर्ण मंदिराच्या केंद्रीय शीख संग्रहालयात पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा मारेकरी असलेल्या दिलावर सिंग याचा फोटो लावण्यात आला आहे. शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था एसजीपीसीने अकाल तख्तचे माजी मुख्य पुजारी ग्यानी भगवान सिंग यांचेही चित्र लावले आहे.
दिलावर सिंग हा पंजाब पोलिसांच्या तीन हवालदारांपैकी एक होता ज्यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांना मारण्याची योजना आखली होती. दोन्ही फोटोंचे अनावरण अॅडव्होकेट हरजिंदर सिंग, अध्यक्ष, एसजीपीसी आणि ग्यानी जगतार सिंग, अतिरिक्त मुख्य ग्रंथी, सचखंड श्री हरमंदर साहिब यांच्या हस्ते करण्यात आले. पंजाबचा माजी पोलीस अधिकारी दिलावर सिंग याने कंबरेला स्फोटकांचा पट्टा बांधला होता, ज्यामुळे ३१ ऑगस्ट १९९५ रोजी संध्याकाळी पंजाब नागरी सचिवालयात तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि अन्य १६ जणांचा मृत्यू झाला होता.
कोण होता दिलावर सिंग?
दिलावर सिंग हा पंजाब पोलिसांच्या तीन हवालदारांपैकी एक होता, ज्या बाबर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या संपर्कात येऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांना ठार मारण्याची योजना राबवली होती. दिलावर सिंग, बलवंत सिंग राजोआना आणि लखविंदर सिंग यांनी बीकेआयच्या सूचनेनुसार बेअंत सिंग यांची हत्या केली.
विश्लेषण : सुवर्ण मंदिरात हार्मोनियम वाजवण्यावरुन वाद का निर्माण झाला?
बलवंत सिंग राजोआना फाशीच्या शिक्षेची वाट पाहत आहे, तर लखविंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिलावर सिंग अविवाहित होते आणि त्याचे आई-वडील कॅनडात आहेत. त्याचा भाऊ चमकौर सिंग एसजीपीसीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होता.
२०१२ मध्ये त्याला कौमी शहीद का घोषित करण्यात आले?
अकाल तख्तने २३ मार्च २०१२ रोजी दिलावर सिंगला कौमी शहीद घोषित केले होते. त्याच दिवशी राजोआनाला जिंदा शहीद (जिवंत शहीद) घोषित करण्यात आले होते. हे पाऊल बलवंतसिंग राजोआनाला ३१ मार्च, २०१२ रोजी निश्चित करण्यात आलेल्या फाशीची शिक्षा टाळण्यासाठी मोहिमेचा एक भाग होता. अखेरीस, राजोआना याची फाशीची शिक्षा राज्यभर पसरलेल्या मोठ्या निषेधानंतर पुढे ढकलण्यात आली आणि ती अजूनही रखडलेली आहे. अकाल तख्तच्या मान्यतेने दल खालसासह शीख संघटनांनी दिलावर सिंग यांचे चित्र संग्रहालयात बसवण्याची मागणी केली होती.
विश्लेषण : ‘टिब्बेयां दा पुत्त’ आणि सिद्धू मुसेवाला… काय आहे कनेक्शन?
१० वर्षांचा विलंब का?
एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग म्हणाले, “शहीद भाई दिलावर सिंग यांनी तत्कालीन सरकारने शीखांवर केलेले अत्याचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवले होते. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आत्मबलिदानाचा निर्णय घेणे शक्य नाही आणि जेव्हा जेव्हा समाजावर अत्याचार होतात तेव्हा शिखांनी नेहमीच बलिदान देऊन इतिहास घडविला आहे.
फोटो लावण्यास झालेल्या विलंबाचे स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले की, हे बसवण्याची हालचाल संगरूर पोटनिवडणुकीच्या अगोदर झाली आहे ज्यात बलवंत सिंग राजोआना यांची बहीण कमलदीप कौर एसजीपीसी नियंत्रित करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाकडून निवडणूक लढवत आहे.
यामागचे राजकारण
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, फोटो लावण्यास उशीर होण्यामागील एक कारण म्हणजे दिलावर दाढी कापायचा. याशिवाय एसएडी आणि भाजपाची युतीही अडसर ठरली. आता शिरोमणी अकाली दल दिलावरच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना संगरूरमध्ये कमलदीप कौरसाठी प्रचार करण्याची विनंती करत आहे आणि हा फोटो मतपेढीला खूश करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.