आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय झाला. मात्र या सामन्यामध्ये आर अश्विन ज्या पद्धतीने बाद झाला त्याची सगळीकडेच चर्चा होत आहे. तो फलंदाजी करत असताना अचानक तंबुत परतल्यामुळे रिटायर्ड आऊट हा प्रकार नेमका काय आहे ? अश्विनने रिटायर्ड आऊटचा निर्णय का घेतला ? क्रिकेटमध्ये काय नियम आहे ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय आणि आतापर्यंतचा रिटायर्ड आऊटचा इतिहास.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय ?

रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट यामध्ये फरक आहे. रिटायर्ड आऊट हा डावपेचाचा एक भाग आहे. सामना जिंकायचा असेल तर योग्य फलंदाजाला मैदानात उतरवण्यासाठी रिटायर्ड आऊटचा उपयोग केला जातो. रिटायर्ड आऊटच्या माध्यमातून फलंदाज तंबुत परतला तर त्याला परत फलंदाजी करता येत नाही. क्रिकेटच्या नियमानुसार एखादा फलंदाज पंचाच्या आणि विरोधी संघाच्या कर्णधाराच्या परवानगीशिवाय तंबूत परतला तर त्याला रिटायर्ड बाद ठरवले जाते. तर दुसरीकडे रिटायर्ड हर्टमध्ये फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतो.

हेही वाचा >>> चेन्नईच्या सततच्या पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले जाडेजा नाही तर ‘हा’ खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार

अश्विन रिटायर्ड आऊट का झाला ?

लखनऊविरोधातील सामन्यात राजस्थानची ६७ धावांवर चार बळी अशी दयनीय स्थिती झाली होती. अशा बिकट परिस्थितीत अश्विन मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याने आपल्या खेळीमध्ये २३ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या विकेटसाठी फलंदाजीसाठी येणारा रियान पराग अश्विनपेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने खेळू शकेल असा विचार संघाने केला. याच कारणामुळे १९ व्या षटकात अश्विन रिटायर्ड आऊट म्हणून तंबूत परतला.

हेही वाचा >>> आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

याआधी फलंदाज रिटायर्ड आऊट झालेले आहेत ?

आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊटचा प्रकार पहिल्यांदाच झाला. याआधी आयपीएलमध्ये एकही खेळाडू रिटायर्ड आऊट झालेला नाही. मात्र क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार अनेकवेळा घडलेला आहे. २०१० मध्ये नॉर्थंट्सविरुद्ध खेळत असताना पाकिस्तानी फलंदाज शाहीद आफ्रिदी रिटायर्ड आऊट झाला होता. त्याने १४ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९ साली भुतान आणि मालदीव्स यांच्यातील टी-२० सामन्यात सोनम तोबगे हा फलंदाज रिटायर्ड आऊट झाला होता. त्याने २४ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा >>> केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

बांगलादेश प्रिमियर लिग २०१९ मध्ये कुमिला वॉरियर्स विरुद्ध चत्तोग्राम चॅलेंजर्स या सामन्यात कुमिला वॉरियर्स संघातील सुंझामुल इस्लाम हा फलंदाज रिटायर्ड आऊट झाला होता. बीबीएल २०२२ लीगमध्ये सिडनी सिक्सर्सने रिटायर्ड आऊटच्या रणनीतीचा उपयोग केला होता. त्यावेळी जॉर्डन सिक्ल जखमी झाल्यामुळे तंबुत परतला होता. त्याऐवजी जे लेंटन फलंदाजीसाठी आला होता.

हेही वाचा >>> चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे विराट संतापला, आरसीबीने तर सांगितला थेट नियम, MI vs RCB सामन्यात पंचाची पुन्हा चूक?

अश्विन रिटायर्ड आऊट झाल्यानंतर राजस्थानने काय स्पष्टीकरण दिलं ?

अश्विन रिटायर्ड आऊट झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय संघाचा होता, असं त्याने म्हटलंय. “आम्ही वेगवळे डावपेच आखत असतो. सामन्याआधीच आम्ही रिटायर्ड आऊटबद्दल विचार करत होतो. परिस्थितीनुसार रिटायर्ड आऊटचा निर्णय घेण्यासंबंधी आम्ही आधीच विचार केलेला होता. अश्विनला रिटायर्ड आऊट करण्याचा संघाचा निर्णय होता,” असं संजू सॅमसनने म्हटलंय. तर राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीदेखील संजू सॅमसनच्या मताशी सहमती दर्शवली आहे. अश्विन आणि संघाने एकत्रितरित्या हा निर्णय घेतला होता, असं संगकारा यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained r ashwin retired out in ipl 2022 know all about retired out rule prd
First published on: 11-04-2022 at 21:44 IST