युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये आपला सर्वात धोकादायक बीएमपीटी टर्मिनेटर टँक तैनात केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रशियन लष्कराने युद्धपातळीवर या रणगाड्याला मान्यता दिली होती. आता रशियन सैन्याने युक्रेनच्या एका भागात आपली नवीन आवृत्ती बीएमपीटी-७२ तैनात केले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा टर्मिनेटर टँक, इतर चिलखती वाहनांसह, युद्धभूमीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

टर्मिनेटर रणगाडे उर्वरित रणगाड्यांसह युक्रेनमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सीमावर्ती भागातही ते गस्त घालत आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार बीएमपीटी टर्मिनेटर टँक तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टर्मिनेटर टँक २०२२ च्या सुरुवातीस रशियन सैन्यात औपचारिकपणे तैनात करण्यात आले होते. रशियाने २०१७ मध्ये सीरियातील युद्धग्रस्त भागात ते तैनात केले होते. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी सीरियातील हेम्मिम विमानतळावर रशियन चीफ ऑफ स्टाफ जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांची भेट घेतली तेव्हा छायाचित्रांमध्ये हे रणगाडे दिसले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained russia terminator tank support system abn
First published on: 24-05-2022 at 19:57 IST